नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

मृद व जलसंधारण विभाग पदभरती जाहीर – Water Conservation Department Recruitment 2022-23

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्या खालील जलसंधारण अधिकारी, ( स्थापत्य ) गट-” ब ” ( अराजपत्रित ) या संवर्गातील ( एस -१४ : ३८६०० १२२८०० ) ६७० पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून यासाठी कालबध्द कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरवून देण्यात येत आहे.

मृद व जलसंधारण विभाग पदभरती जाहीर – Water Conservation Department Recruitment 2022-23:

सदर ६७० पदे भरण्यासाठी आयुक्त, मृद व जलसंधारण यांनी नियुक्ती प्राधिकारी म्हणून खालील वेळापत्रकाप्रमाणे कालमर्यादेत कार्यवाही करतील.

विषयकालमर्यादा
निवड समितीने जाहिरात प्रसिध्द करणेदि. ३१.१२.२०२२
अर्ज मागविणे, छाननी करणे व परिक्षेचे ओळखपत्र पाठविणेदि. ०१.०१.२०२३ ते दि. ३१.०१.२०२३
परीक्षा आयोजित करण्याचा कालावधीदि. १५.०३.२०२३ ते दि. ३०.०४.२०२३
निकाल व त्यानुसार निवडसूची जाहीर करणेदि. १५.०५.२०२३ ते दि. ३१.०५.२०२३
नियुक्ती आदेश निर्गमित करणेदि. ०१.०६.२०२३ वा तत्पूर्वी

सामान्य प्रशासन विभागाने ६७० पदांच्या भरतीसाठीचे प्रवर्गनिहाय आरक्षणास बिंदूनामावली सादर करण्याच्या अटीवर मान्यता दिलेली आहे. सामान्य प्रशासन विभागाने या ६७० पदांच्या भरतीकरीता मान्यता दिलेल्या प्रवर्गनिहाय आरक्षणाचा तक्ता या पत्रासोबत जोडला आहे.

सदरहू रिक्त पदे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या ऑनलाईन परिक्षा प्रणाली, टि.सी.एस. आयओएन ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ) व आय.बी. पी. एस. ( इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ) द्वारे ऑनलाईन परिक्षा पध्दतीने भरण्यात यावीत. संबंधित कंपनीशी चर्चा करुनच अर्ज मागविण्याचे दिनांक व परिक्षेचा दिनांक सुनिश्चित करावा.

सदर पदे भरण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग, राजपत्र, जलसंधारण अधिकारी, ( स्थापत्य ) गट- “ ब ” ( अराजपत्रित ) सेवाप्रवेश नियम, दिनांक २१.०९.२०२१ नुसार विहित केलेली शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात यावी.

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. ३ व ४ येथील अनुक्रमे दि.०४.०५.२०२२ व दि. २१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपध्दतीचे तसेच अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे. भरती प्रक्रियेसाठी जाहिरातीचे प्रारुप सोबत जोडण्यात येत आहे. उर्वरित प्रचलीत अटी व शर्ती आपल्या स्तरावरुन समाविष्ट करण्यात याव्यात. कृपया यास सर्व प्राधान्य देऊन भरती प्रक्रियेची सदरहू कार्यवाही विहित कालमर्यादेत वा त्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी. या दरम्यान सामान्य प्रशासन विभागाद्वारे भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे आदेश / सूचना लागू राहतील.

मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय: मृद व जलसंधारण विभागातील क्षेत्रिय आस्थापनेवरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – वन विभाग भरती सुधारित वेळापत्रक जाहीर – MahaForest Recruitment 2022-23

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.