नोकरी भरतीजिल्हा परिषदमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

जिल्हा परिषद गट-क आरोग्य भरतीचे वेळापत्रक जाहीर २०२२ – Zilla Parishad Group-C Recruitment

मार्च, २०१९ महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गाच्या पदभरतीबाबत दि. १० मे, २०२२ च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत तसेच, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती (DATA) व परिक्षा शुल्क अनुक्रमे मे. न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. व उप आयुक्त ( आस्थापना ), विभाग आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.

जिल्हा परिषद गट-क आरोग्य भरतीचे वेळापत्रक जाहीर २०२२ – Zilla Parishad Group-C Recruitment:

सदर पदभरती घेण्याच्या अनुषंगाने तसेच या बाबतच्या परिक्षा पारदर्शक व निः पक्षपाती पणे पार पाडण्याच्या दृष्टीने अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या अध्यक्षेते खाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता. याबाबत सर्व जिल्हा परिषदांशी सल्लामसलत करून आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील पदभरती बाबत परिक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात येऊन शासनास सादर करण्याबाबत अध्यक्ष, राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांना कळविण्यात आले होते.

>

अध्यक्ष, राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांनी शासनास सदर परिक्षेचे संभाव्य वेळापत्रक तसेच कृती आराखडा सादर केला आहे. सदर शिफारशींस अनुसरून माहे मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अत्यारितील गट क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती बाबत सर्व जिल्हा परिषदांना परीक्षेबाबतचे संभाव्य वेळापत्रक तसेच इतर सुचना कळविण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

जिल्हा परिषद गट-क भरतीचे वेळापत्रक:

शासन परिपत्रक – मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती करण्याकरीता परिक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम ( वेळापत्रक ) पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

अ.क्र. कालबद्ध कार्यक्रम कालावधी  दिनांक
1 बिंदू नामावली अंतिम करणे ०२ आठवडे  २७ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर २०२२
2 विभागीय स्तरावरून कंपनीची निवड करणे  ०१ आठवडा  १६ सप्टेंबर २०२२ अखेर
3 निवड झालेल्या कंपनीने में न्यास कंपनी कडून डेटा हस्तांतर करून घेणे  ०१ आठवडा  १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२२
4 निवड झालेल्या कंपनीने संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीस कळविणे  ०१ आठवडा  २३ सप्टेंबर २०२२ ते २७ सप्टेंबर २०२२
5 जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परिक्षेच्या आयोजना संदर्भात कार्यवाही करणे  ०१ आठवडा  २८ सप्टेंबर २०२२ ते ०४ ऑक्टोबर २०२२
6 जिल्हा निवड समितीने शासनाकडून निवड झालेल्या कंपनीमार्फत पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधीत उमेदवारांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देणे  ०५ दिवस ०५ ऑक्टोबर २०२२ ते १० ऑक्टोबर २०२२
7 परिक्षेचे आयोजन ( ऑनलाईन पद्धतीने Computer ( 9 Based Test ) आरोग्य पर्यवेक्षक ( सकाळी ११.०० ते ०१.०० वाजता ) औषध निर्माता – ( दुपारी ०३.०० ते ०५ .०० वाजता ) – आरोग्य सेवक ( पुरूष ), आरोग्य सेविका ( सकाळी ११.०० ते ०१.०० वाजता ) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ( दुपारी ०३.०० ते ०५.०० वाजता )  १५ ऑक्टोबर २०२२ १६ ऑक्टोबर २०२२
8 लेखी परिक्षेनंतर Answer Key प्रसिध्द करणे/उमेदवारांना Objection filing साठी ३ दिवसांचा वेळ देणे/अंतिम निकाल जाहीर करणे/पात्र उमेदवारांची यादी जाहिर करणे व त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश देणे ०५ आठवडे १७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२२

मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने उपरोक्त वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी. सदर वेळापत्रक आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच, कार्यालयातील दर्शनी भागात सर्वांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करावे. सदर विषयाचे गांभिर्य तसेच तातडी लक्षात घेऊन उपरोक्त सुचनांचे तसेच, सामान्य प्रशासन विभाग व ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयातील सूचनांचे/पात्रतेच्या निकषांचे व शासन पत्रान्वये दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. यात कसूर केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येवून शिस्तभंगविषयक कार्यवाही येईल, याबाबत आपल्या अधिनस्त सर्व संबंधितांना जाणीव करून द्यावी, असे निर्देश शासन निर्णयाद्वारे दिले आहेत.

ग्राम विकास विभाग शासन निर्णय: माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील पदभरती बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती – SSC Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.