वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायतसरकारी कामे

ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे ऑनलाईन कसं पाहायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती – Measurement Book & Mustroll Detail

ग्रामपंचायत मध्ये मनरेगा अंतर्गत वैयक्तिक तसेच सार्वजनिक कामांच्या माध्यमातून जसं की शेततळं बांधणंफळबागेची लागवड या कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. पण, रोजगाराची हमी मिळाल्यानंतर तुमच्या गावात मनरेगाअंतर्गत कोणती कामं सुरू आहेत, त्यांचं स्टेटस काय आहे, हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. या लेखामध्ये आपण  ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे ऑनलाईन कसं पाहायचं? याची सविस्तर माहिती पाहूया.

मनरेगाचं पेमेंट कसं पाहायचं?- Measurement Book & Mustroll Detail:

सर्व प्रथम खालील लिंक वर क्लिक करून महात्मा गांधी नॅशनल रुरल इम्प्लॉयमेंटची वेबसाइट (नरेगा) ची वेबसाइट ओपन करा.

https://nrega.nic.in/Homepanch_new.aspx

नरेगाची वेबसाइटओपन केल्यानंतर Panchayats(GP/PS/ZP) या पर्यायावर क्लिक करा.

Panchayats(GP/PS/ZP)

त्यानंतर एका नवीन पेजवर तुम्हाला Gram Panchayats, Panchayat Samiti आणि Zilla Panchayats हे तीन पर्याय तुम्हाला दिसतील.

यांतील Gram Panchayat या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

Gram Panchayat

त्यानंतर एक नवीन रकाना तुमच्यासमोर ओपन होईल. यांतील दुसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे (जनरेट रिपोर्ट्स) Generate Reports – Job Card, Job Slip , MSR Register , Pending Works, UC यावर क्लिक करायचं आहे.

Generate Reports

मग तुमच्यासमोर देशातल्या सगळ्या राज्यांची नावं ओपन होतील. यांतील महाराष्ट्र (MAHARASHTRA) या नावावर क्लिक केलं की, Gram Panchayat Module नावाचं नवीन पेज तुम्हाला तिथे दिसेल.

आता इथे सुरुवातीला फायनान्शियल ईयरमध्ये आर्थिक वर्ष निवडायचं आहे, त्यानंतर जिल्हातालुका आणि मग गाव निवडायचं आहे.

हे सगळं निवडून झालं की मग Prossed यावर क्लिक करायचं आहे.

REPORTS

यानंतर Gram Panchayat Reports नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर R1, R2, R3, R4, R5, R6 असे रकाने दिलेले असतील.

यातील R1. Job Card/Registration या रकान्यातील Job card/Employment Register या पाचव्या क्रमाकांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

Job card/Employment Register

यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या ग्रामपंचायतीत मनरेगाचे जितके जॉब कार्ड रेजिस्टर आहे, नोंदणी झालेली आहे ते तिथं येतील. महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्डसाठी नोंदणी अर्ज कसा करायचा ? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे.

इथं जॉब कार्डचा नंबर आणि ते कुणाच्या नावावर आहे, हेसुद्धा दिसेल. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचं जॉब कार्ड पाहायचं आहे त्या व्यक्तीच्या नावासमोरील जॉब कार्ड नंबरवर क्लिक करायचं आहे.

जॉब कार्ड रेजिस्टर

जॉब कार्ड :

त्यानंतर संबंधित व्यक्तीचं जॉब कार्ड ओपन होईल. यावर सुरुवातीला संबंधितांचं नाव, पत्ता, ही माहिती दिलेली असेल.

Job card

त्यानंतर Requested Period of Employment या रकान्यात या व्यक्तीनं रोजगारासाठी कधी विनंती केली ते दिलेलं असेल.

Requested Period of Employment

Period and Work on which Employment Offered मध्ये या व्यक्तीला रोजगार कधी ऑफर करण्यात आला आणि त्या कामाचं नाव काय आहे, याची माहिती दिलेली असते.

Period and Work on which Employment Offered

Period and Work on which Employment Given मध्ये कालावधी आणि काम ज्यावर रोजगार दिला, याची माहिती दिलेली असते.

Period and Work on which Employment Given

मनरेगाचं पेमेंट पाहण्यासाठी तुम्हाला ज्या कामासाठी रोजगार मिळाला, त्या कामाचं जे नाव आहे, (Work Name) त्याच्यावर क्लिक करायचं आहे.

यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. ज्यात हे काम कधी सुरू करण्यात आलं आहे, त्याचं स्टेटस काय आहे इत्यादी माहिती सांगितलेली असेल.

यानंतर पुढे असलेल्या Distinct Number of Muster Rolls used(Amount) या रकान्यात हजेरी पट क्रमांक दिलेली असतील.

या हजेरी पट क्रमांकावर क्लिक केलं की, हजेरीपट क्रमांकावरील काम, त्याचा दिनांक आणि नाव तिथं दाखवलं जाईल.

Distinct Number of Muster Rolls used(Amount)

त्यानंतर Measurement Book Detail या रकान्यात या कामासाठी रोजगार मिळालेल्या व्यक्तींची नावं, त्यांना किती दिवसांची मजुरी केली , प्रतिदिन किती रुपये मजुरी मिळाली आणि एकूण मजुरीची रक्कम संबंधितांच्या नावासमोर दिलेली असेल. त्यानंतर पुढे Status या रकान्यात मजुरीची रक्कम खात्यावर जमा झाली हे नमूद केलेलं असेल.

Measurement Book Detail

Status समोर Credited असं नमूद असेल तर मजुरीची रक्कम खात्यात जमा झाली असा त्याचा अर्थ होतो. पुढे A/c Credited Date या रकान्यात संबंधितांच्या खात्यात ते पैसे किती तारखेला जमा झाले, याची माहिती दिलेली असते.

हेही वाचा – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणा-या मजुरांना मस्टर बंद होण्याच्या 8 दिवसाच्या आत मजूरी मिळणार, शासन निर्णय जारी

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Exit mobile version