वृत्त विशेषसरकारी योजना

पांढरे रेशन कार्डधारकांनाही आयुष्यमान अंर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. याच्या तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्डधारकांनाही महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.

पांढरे रेशन कार्डधारकांनाही आयुष्यमान अंर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार !

शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यासाठी सर्व जिल्हापुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांना रेशन कार्डचे आधारशी जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यामध्ये २०२३ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानुसार, आरोग्य विमा योजनेचा लाभ हा शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांनाही देण्यात येणार आहे.

शुभ्र शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत.

हेही वाचा – आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड (PMJAY Card) ऑनलाईन आधारकार्डने कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
```html
Join Now
Join Now

One thought on “पांढरे रेशन कार्डधारकांनाही आयुष्यमान अंर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार !”

  • मिलिंद अभिमान गेडाम

    Good

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.