सरकारी कामेकृषी योजनाजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

E-Peek Pahani Rabi Season : रब्बी हंगामातील पीक पेरा नोंदणीची सुविधा ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वर उपलब्ध !

महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन-२ द्वारे रब्बी हंगामातील (Peek Pahani Rabi Season) पीक नोंदणीची प्रक्रिया सुरु झालेली आहे. या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड/कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे, तसेच चुकीची पीक पाहणी 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार आहे.

ज्यांना रब्बी हंगामातील पीक पेराची नोंदणी (Peek Pahani Rabi Season) ७/१२ वर करावयाची असल्यास ई-पीक पाहणी मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा, ॲप मध्ये नोंदणी करा, पीक माहिती भरा व स्वयं घोषणा करून सबमिट करा. तसेच आपण भरलेली माहिती ४८ तासात आपल्या सातबारावर येणार, माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता पीक पेराची नोंद करणे झाले आणखी सोपे व सहज ते पण आपल्याच मोबाईलद्वारे त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी बांधव दररोज ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून पिकांची नोंद करत आहे.

रब्बी हंगामातील पीक पेरा नोंदणीची सुविधा ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वर उपलब्ध  – E-Peek Pahani Rabi Season:

महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी घेऊन आले आहे ई-पीक पाहणी मोबाईल ॲप. अधिक माहितीसाठी आपले गावचे तलाठी किंवा कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. तसेच काही शंका असल्यास ०२० – २५७१२७१२ या क्रमांकावर कॅाल करून सुद्धा तुम्ही तुमच्या शंकांचे निवारण करू शकता.

ई – पीक पाहणी कालावधी:

शेतकऱ्यांनी करावयाची पिक पाहणी
हंगामकालावधी
खरीप1 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर
रब्बी15 नोव्हेंबर ते 31 जानेवारी
उन्हाळी15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल
तलाठी स्तरावर करावयाची पिक पाहणी
हंगामकालावधी
खरीप16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर
रबी1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी
उन्हाळी16 एप्रिल ते 15 मे

ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करा (E Peek Pahani App):

ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/E-Peek Pahani App

ई-पीक पाहणी संबंधीत खालील महत्वपूर्ण लेख वाचा !

  1. ई-पीक पाहणी ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
  2. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार !
  3. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची माहिती कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
  4. ई-पीक पाहणी ॲपद्वारे कायम पड/चालू पड क्षेत्राची माहिती कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
  5. ई-पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
  6. ई-पीक पाहणी पीक नोंदणी सारांश अहवाल ऑनलाईन कसा पाहायचा? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
```html
Join Now
Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.