वृत्त विशेषजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन २०२२-२३ – मेंढीपालनास २.५ लाखापर्यंत अनुदान !

या योजने अंतर्गत राज्यातील भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील अर्जदारांकडुनऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज महामंडळाच्या महामेष संकेतस्थळावरुन तसेच Android Mobile मध्ये Google Play Store वरुन महामेष App द्वारे करण्यात यावे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदाराने योजने अंतर्गत विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन २०२२-२३ – Mahamesh Yojana:

योजनेचे ठळक वैशिष्ठे:

 1. राज्यात मेंढी पालन व्ययसायास प्रोत्साहन देण्यासाठी.
 2. योजना मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यासाठी.

योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ:

 • स्थायी आणि स्थ्यलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसाठी २० मेंढ्या +१ मेंढ्यानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप.
 • सुधारित प्रजातीच्या मेंढ्याचे ७५% अनुदानावर वाटप करणे.
 • मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.
 • मेंढी पालनसाठी संतुलित खास उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.
 • हिरव्या चाऱ्याला मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान.
 • पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान.

पात्रता:

 • सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल.
 • लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे. लाभधारकांची निवड करताना महिलांकरिता ३०% व अपंगांकरिता ३% आरक्षण.
 • या योजने अंतर्गत भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील बचत गटांना / पशुपालक उत्पादक कंपन्याना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल.
 • ज्या लाभधारकांना या आधी महामेष योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा लाभधारकांना यामध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही.
 • पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.
 • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
 • स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेढ बांधण्याकरिता स्वतःची जागा असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतीनिधी नसावा.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन २०२२-२३ मध्ये राबविणे बाबत मार्गदर्शक सूचना:

(अ) शासन निर्णय क्रमांक पवित्रा १०१७/ प्र. क्र. ६५/पदुम-३ दिनांक- ०२/०६/२०१७ नुसार, – राजे यशवंतराव होळकर महामेष योजना या नावाने मुख्य घटकांसह नवीन योजना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यात राबविणेकरिता मान्यता देण्यात आलेली आहे.

(ब) सदर योजनेसाठी प्राप्त झालेल्या निधीमधून नवीन लाभधारक निवड प्रक्रिया राबवून लाभधारक निवड करावयाचे आहे. या करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया राबविणे, त्यानुसार लाभधारक निवड प्रक्रिया राबविणे तसेच योजनेची अंमलबजावणी करावयाच्या कार्यवाही बाबत खालीलप्रमाणे नियमावली निर्गमित करण्यात येत आहे:-

सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्याना लागू असून या योजनेमध्ये खालील ६ मुख्य घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

(1) स्थायी आणि स्थलांतरित मेंढीपालन करणाऱ्या मेंढीपालकांना पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप करणे.

(2) सुधारित प्रजातींच्या नर यांचे ७५% अनुदानावर वाटप करणे (केवळ या योजने अंतर्गत वरील मेंदी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थीकरिता).

(3) मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान. ( केवळ या योजनेअंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थीकरिता).

(4) मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान (केवळ या योजने अंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वतःच्या या आहेत अशा लाभार्थीकरिता).

(5) कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान.

(6) पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान.

अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती:

 • योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती पायाभूत संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या वरील संकेतस्थळावर तसेच Android Mobile मधील Google Play store वर Mahamesh App व्दारे करण्यात यावे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत अर्ज मागविणे व लाभधारक निवड बाबत सुधारित वेळापत्रक:

अ. क्र.प्रक्रियापासूनपर्यन्त
१.अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधीदिनांक १५/११/२०२२दिनांक ०७/१२/२०२३
२.जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिति मार्फत प्राथमिक लाभधारक निवडदिनांक ०१/०२/२०२३दिनांक ०७/०२/२०२३
३.प्राथमिक निवड झालेल्या लाभधारकांनी कागदपत्रे अपलोड करावयाचा कालावधीप्राथमिक निवड झाल्यापासूनदिनांक २०/०२/२०२३
४.प्राथमिक निवड झालेल्या लाभधारकांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांनी करावयाची छाननीदिनांक २४/०२/२०२३
५.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे मार्फत कागदपत्रांची छाननीदिनांक २५/०२/२०२३दिनांक ०२/०३/२०२३
६.जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती मार्फत कागदपत्रांची पडताळणी व त्यानुसार अंतिम निवड यादी घोषित करणेदिनांक ०३/०३/२०२३दिनांक ०८/०३/२०२३

हेल्पलाइन: फोन नंबर: 020-25657112, ईमेल- mdsagpune@gmail.com

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

मार्गदर्शक सूचना: राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन २०२२-२३ मध्ये राबविणे बाबत मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM); शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.