वृत्त विशेषकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

महाडीबीटी अंतर्गत शेततळे अनुदान योजना

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे (Shettale Subsidy Scheme, समाविष्ट विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एक शेततळ्याकरीता महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. तसेच विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी प्रत्येकी 75 हजार रुपयाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.

महाडीबीटी अंतर्गत शेततळे अनुदान योजना – Shettale Subsidy Scheme:

शेततळ्याकरीता (Shettale Subsidy Scheme) मागणी अर्ज महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन भरल्यानंतर लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड होईल. ऑनलाईन अर्ज हा मोबाईल, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून महाडीबीटी संकेतस्थळावर करता येणार आहे. यासाठी 23 रुपये 60 पैसे शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे.

सोडतीतून निवड झालेल्या शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे महाडीबीटीवर विहीत मुदतीत अपलोड करावे लागेल.

आवश्यक कागदपत्रे:

लाभार्थी पात्रता:

  • अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक.
  • अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्टया योग्य असणे आवश्यक.
  • अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थी निवड:

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडती नुसार लाभ देण्यात येईल.

शेततळयासाठी आकारमान:

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयासाठी कमाल मर्यादा रुपये 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील.

शेततळयाच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाचा रक्कम निश्चीत करण्यात आली आहे. तथापि देय अनुदानाची कमाल रक्कम 75 हजार रुपये इतकी राहील. रक्कम 75 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरिक्त खर्च संबधित लाभार्थ्याने स्वत: करणे अनिवार्य राहील

निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात कृषि अधिकारी भेट देतील तसेच कागदपत्र छाननीअंती पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश ऑनलाईन पध्दतीने निर्गर्मित करण्यात येतील. शेततळ्याला लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुशीने व विनामुल्य द्यावयाची आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी यापुर्वी कुठल्याही शासकीय योजनतून शेततळे, सामुहिक शेततळे या घटकाकरीता लाभ घेतलेला नसावा.

महाडीबीटी प्रणालीवर एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांचे अर्ज येतात. त्यामुळे ज्यांची निवड झाली ते वगळून उर्वरित शेतकऱ्यांची प्रतिक्षा यादी लावली जाते. त्यानुसार टप्प्याटप्प्याने त्यांची निवड केली जात असल्यामुळे प्रत्येकवेळी सबंधित शेतकऱ्यांनी अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज (Apply Online Shettale Subsidy Scheme) महाडीबीटी पोर्टल:

https://mahadbt.maharashtra.gov.in/

महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप: महाडीबीटी शेतकरी अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800

हेही वाचा – मनरेगा अंतर्गत शेततळे अनुदान योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.