पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज सुरु ! PM Suryaghar Yojana
सातत्यपूर्ण विकास आणि जनकल्याणाच्या उद्देशानं शासनानं प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना सुरु केली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरमहिन्याला तीनशे युनिट मोफत वीज देऊन कोट्यावधी घरांना उजळून टाकण्याचं उद्दिष्ट आहे. यासाठी ७५ हजार कोटी रुपये गुंतवणुक केली जाणार असून यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढून विजेचे बिल कमी करण्यात मदत होईल.
रोजगारनिर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी नागरिकांनी विशेषतः युवकांनी या संकेतस्थळावर पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करावेत, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.
पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज सुरु ! PM Suryaghar Yojana:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करण्याची घोषणा केली.
” या योजनेच्या अनुदानापासून जे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल. ते मोठ्या सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, लोकांवर कोणत्याही खर्चाचा बोझा पडणार नाही याची खात्री केंद्र सरकार करेल. योजनेतील संबंधित सर्व भागधारकांना राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलवर एकत्रित केले जाईल, त्यामुळे ही योजना राबवणे अधिक सुकर होणार आहे.’’
“या योजनेला तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्ये घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्याच वेळी, या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळवता येईल, त्यांचे विजेचे बिल कमी येईल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होवू शकेल.”
“चला सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देऊया. मी सर्व निवासी ग्राहकांना, विशेषत: तरुणांना ऑनलाइन अर्ज करत पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना दृढ करण्याचे आवाहन करतो. त्यासाठी संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – घरगुती छपरावरील रूफटॉप सोलर अनुदान योजना सुरु, असा करा ऑनलाईन अर्ज – Apply Online for Solar Rooftop
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!