वृत्त विशेषनिवडणूकसरकारी कामे

मतदार यादीत नाव नसेल तर, मतदारांना अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी !

निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार. मतदान करण्यासाठी पात्र असलेला आणि मतदानाची इच्छा असलेला कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये. हयासाठीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदार यादीत नाव असायला पाहिजे. आपण राहतो तिथल्या मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहे. त्याचा वापर करुन प्रत्येकच मतदाराने आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करायला हवी. आपल्याला मतदानासाठी कोणत्या ठिकाणी जावे लागेल, ते सुध्दा पाहून ठेवावे. म्हणजे मग ऐन वेळेची धावपळ होणार नाही.

मतदार यादीत नाव नसेल तर, मतदारांना अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी !

निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादी अद्ययावत करण्यात येत आहे. त्यात दुबार, स्थलांतरित तसेच १८ वर्ष पूर्ण झालेल्या पात्र मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार आहे.

राज्यात पाचव्या टप्प्यात दि. २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघांसाठी नामनिर्देशन सादर करण्याची अखेरची तारीख ३ मे २०२४ आहे.

त्यानुसार, या लोकसभा मतदार संघातील ज्या पात्र नागरिकांनी दि. १ एप्रिल २०२४ रोजीपर्यंत आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असतील व त्यांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नसेल, अशा नागरिकांनी या मतदारसंघामध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज केल्यास (ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने) त्यांची नावे मतदार यादीत (अन्यथा पात्र असल्यास) समाविष्ट होऊ शकतील. यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासून, जर नाव नसल्यास त्वरीत दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ भरावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

नाव नोंदणीसाठी अर्जाचे नमुने:

१. प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदार संघात स्थलांतर केले असल्यास अर्ज क्रमांक ६.

२. अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ अ.

३. इतर नावाबाबत आक्षेपासाठी, स्वत:चे किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७.

४. मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरस्त्या करण्यासाठी अर्ज क्रमांक ८.

५. मतदार संघातील निवासाचे ठिकाण बदलेले असल्यास अर्ज क्रमांक ८ अ भरावा लागतो.

मतदार यादीत नाव कसे तपासावे?

voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline अॅपचा वापर करून मतदार यादीत आपले नाव शोधा.

वैयक्तिक तपशिलाच्या पर्यायांतर्गत नाव, आडनाव, वडील किंवा पतीचं नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या तपशिलाच्या आधारे किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे किंवा मोबाइल क्रमांकाच्या आधारे ( तो जर तुमच्या मतदार ओळखपत्राशी जोडला असेल तर) किंवा Voter Helpline App वर मतदार ओळखपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करूनही मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

मतदार नोंदणीचा अर्ज कसा भरावा?

अर्ज क्र. ६ – नवमतदार नोंदणी

ऑनलाइन पद्धतीने – voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline App चा वापर करून मतदार नोंदणीचा अर्ज भरा.

ऑफलाइन पद्धतीने- आपले छायाचित्र, तसेच वय आणि सर्वसाधारण निवासाच्या स्वतःची स्वाक्षरी असलेल्या पुराव्यासह आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाला भेट द्या. अधिक तपशिलांसाठी लिंक: https://ceoelection.maharashtra.gov.in/SearchInfo/VHCs.aspx

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचे निकालपत्र या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून भारतीय पासपोर्ट, आधारकार्ड, राष्ट्रीय, श्येड्युल्ड बँक किंवा टपाल विभागाचे खात्याचे चालू पासबूक, पाणी, वीज तसेच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे किमान एका वर्षाच्या आतील देयक, नोंदणीकृत भाडे करार, नोंदणीकृत विक्री करार या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

निवडणूक प्रक्रियेविषयीच्या शंका किंवा प्रश्नांसाठी १८०० २२ १९५० या मतदार मदत क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही वाचा – अंतिम मतदार यादी 2024 वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती – Final Electoral Roll (Voter list) 2024 PDF (Part Wise)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.