वृत्त विशेषउद्योगनीतीमहाराष्ट्र ग्रामपंचायतसरकारी योजना

मिनी राईस मिल योजना – Mini Rice Mill Scheme

राईस मिल (गिरणी) ही अन्न-प्रक्रिया सुविधा आहे जिथे तांदूळ (unmilled rice) बाजारात विकण्यासाठी तांदूळावर प्रक्रिया केली जाते. संपूर्ण उत्पादन भातशेतीतून खरेदी केले जाते, आधुनिक यंत्रसामग्री आणि धूळमुक्त वातावरणात स्वच्छतेने दळणे आणि प्रक्रिया केली जाते आणि वर्गीकरण मशीनद्वारे साफ केली जाते.

मिनी राईस मिल योजना – Mini Rice Mill Scheme:

राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान – भात या कर्यक्रमामध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामध्ये नाशिक, पुणे, सातारा, नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर व गडचिरोली या 8 जिल्ह्या मध्ये मिनी राइस मिल ही योजना राबविण्यात येत आहे.

दुर्गम भागामध्ये भात भरडाई केंद्राची(राईस मिल) पूरेशी उपलब्धता नसल्याने शेतकरी यांना भात भर डाई साठी अडचणी निर्माण होतात.

>

सदर समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात विजेवर तसेच विजेशिवाय चालणारे मिनी राइस मिल चा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

मिनी राईस मिल योजने अंतर्गत अनुदान:

मिनी राइस मिल साठी येणारा प्रत्यक्ष खर्चाच्या कृषि यांत्रिकीकरण उपअभियानच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 60 टक्के किंवा कमाल रु. 2 लाख इतके अनुदान या योजनेत देय आहे,

तसेच कृषि यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत सर्व जिल्हांसाठी मिनी राईस मिल साठी अनुदान आहे.

१) अल्प/अत्यल्प/महिला/अजा/अज भूधारक  ६० टक्के किंवा कमाल रुपये २. ४० लाख.

२) बहू भूधारक – ५० टक्के किंवा कमाल रुपये २. ०० लाख.

अर्ज कोण करू शकतात:

शेतकरी/महिला गट मिनी राईस मिल योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कुठे करावा:

अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालया मध्ये संपर्क करून तेथे अर्ज करावा.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.