महावितरणच्या वीज बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर !
महावितरण वीज मीटर जोडणी ज्या मालकांच्या नावे आहे, त्याला वीज बिलावरील पत्ता (Online Address Correction Application MSEB) दुरुस्ती करून घ्यायचा असल्यास किंवा घर बदलले आहे, वीज मीटरच्या जोडणीचे नाव बदलायचे आहे, त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे न मारता थेट महावितरणच्या पोर्टलवरून नाव बदल करून घेता येणार आहे, त्यामुळे वीज ग्राहकांचा श्रम, वेळ व पैशांची बचत होणार आहे.
पोर्टलवरून नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणे, वीज बिल पाहणे, ऑनलाईन भरणे, तक्रारी पाठविणे, त्यांचा पाठपुरावा करणे, रीडिंग नोंदवणे, जुन्या बिलांचा इतिहास आदी सुविधा पोर्टलमध्ये आहेत. वीज बिलावरील पत्ता (Online Address Correction Application MSEB) दुरुस्ती करणे, वीज जोडणीच्या नावात बदल करणे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अशा सुविधा नव्याने समाविष्ट आहेत.
महावितरणच्या वीज बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Online Address Correction Application MSEB:
सर्व प्रथम खालील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या पोर्टलला भेट द्या, नंतर तुम्हाला इथे प्रवेश (Login) ऑप्शन दिसेल, प्रवेश (Login) वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचा अकाउंट असेल तर थेट लॉगइन करू शकता जर, तुमचा अकाउंट नसेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा डाव्या साईडला नवीन सदस्य नोंदणी (New User Registration) या नावावरती इथे क्लिक करायचे आहे आणि नोंदणी करा.
https://wss.mahadiscom.in/wss/wss
करताना तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे जो लाईट बिला वरती तुमच्या असेल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल, लॉगिन नाव आणि पासवर्ड टाकून सबमिट करायचा आहे.
नवीन सदस्य नोंदणी (Registration) झाल्यानंतर लॉग इन (Login) बटन वर क्लिक करायचे त्यांनतर Login Name, Password आणि Captcha टाकून Login करायचे आहे.
Login केल्यानंतर Add connection to my account मध्ये आपला ग्राहक प्रकार, ग्राहक क्रमांक, आणि बिलिंग युनिट नंबर कनेक्शन add करा.
ऍड केलेले कनेक्शनवर टिक करून Correction of Address वर क्लिक करा.
बिलिंग पत्त्याची दुरुस्ती अर्ज – (Online Address Correction Application MSEB):
आता पुढील अर्ज भरण्यासाठीच्या सूचना वाचा आणि बिलिंग (Online Address Correction Application MSEB) पत्त्याची दुरुस्ती अर्ज भरा.
- कृपया संबंधित कॉलममध्ये संपूर्ण आणि योग्य माहिती भरा.
- अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसाठी अर्जदार पूर्णपणे जबाबदार असेल
- अर्जदाराने अर्जाच्या भविष्यातील ट्रॅकिंगसाठी विनंती आयडी लक्षात घेण्याची विनंती केली जाते.
- अर्जदारास पडताळणीसाठी (आवश्यक असल्यास) तुम्ही प्रदान केलेल्या ईमेल/मोबाइलवर MSEDCL अधिकारी/कॉल सेंटर प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधता येईल.
बिलिंग पत्त्याची दुरुस्ती (Online Address Correction Application MSEB) अर्जा मध्ये ग्राहकांचे तपशील, विद्यमान बिलिंग पत्ता तपशील असेल आणि पुढे तुमचा नवीन बिलिंग पत्ता तपशील भरा आणि कृपया पडताळणीच्या उद्देशाने मोबाईल आणि ईमेल पत्त्यावर OTP मिळविण्यासाठी “Generate OTP” बटणावर क्लिक करा. OTP टाकून अर्ज सबमिट करा.
महावितरणच्या वीज बिलावरील पत्त्याची दुरुस्ती अर्जाची स्थिती तपासा:
खालील लिंक वरून आपण महावितरणच्या वीज बिलावरील बिलिंग पत्त्याची दुरुस्ती (Online Address Correction Application MSEB) अर्जाची स्थिती तपासू शकतो, त्यासाठी आपला मीटर ग्राहक क्रमांक किंवा अप्लिकेशन नंबर टाकून लॉगिन करा.
https://css.mahadiscom.in/UI/AC/AddressCorrection.aspx
आता आपण खालील अर्जामध्ये Application Status मध्ये Application Received म्हणून अर्जाची स्थिती दिसून येते.
महावितरणच्या वीज बिलावरील बिलिंग पत्त्याची दुरुस्ती अर्जाच्या विनंतीवर प्रक्रिया करण्यासाठी अर्ज भरल्याच्या तारखेपासून साधारणतः ४ ते ५ दिवस लागू शकतात. ४ ते ५ दिवसानंतर आपण पुन्हा अर्जाची स्थिती तपासू शकता.
४ ते ५ दिवसानंतर अर्जाची स्थिती आपण खालील अर्जामध्ये Application Status मध्ये Application Approved म्हणून अर्जाची स्थिती दिसून येते, याचा अर्थ आपला अर्ज मंजूर होऊन पुढील महावितरणच्या वीज बिलावरील बिलिंग पत्त्याची दुरुस्ती होऊन येईल.
आपला बिलिंग पत्त्याची (Online Address Correction Application MSEB) दुरुस्ती अर्ज ४ ते ५ दिवसानंतर मंजूर करत नसतील तर खालील संपर्क यादीतील आपल्या भागातील अधिकारी व कर्मचार्यांच्या नंबरवर फोन करा आणि आपला अर्ज क्रमांक सांगून तो मंजूर म्हणजेच Application Approved करण्यासाठी सांगा.
महाराष्ट्र महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांची संपर्काची माहिती PDF फाईल:
महाराष्ट्र महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांची संपर्काची माहिती PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- राष्ट्रीय टोल-फ्री: १९१२ / १९१२०
- महावितरण टोल-फ्री: १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५
- ऊर्जा मंत्री हेल्पडेस्क: 9833717777 / 9833567777
- ईमेल: customercare@mahadiscom.in / helpdesk_pg@mahadiscom.in
खालील लेख देखील वाचा!
- वीज बिल जास्त आले असेल तर काय करायचे? खराब मीटर बदलून नवीन मीटर कसा घ्यायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना!
- रोहित्र दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा !
- महावितरणच्या ‘गो- ग्रीन’ योजनेंतर्गत नोंदणी करा आणि दरमहा वीजबीलामध्ये 10 रुपये वाचवा – MSEDCL Go Green Ebill Application
- महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती – Online Name Change Application MSEB
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- विजेचे युनिट रेट/आकार आणि वीज ग्राहकांचे अधिकार
- शेतातून वीजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास आता इतका मोबदला मिळणार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!