आधार क्रमांक आठवत नाही ? असा मिळवा ऑनलाईन ! – Retrieve EID/Aadhaar Number
आधार कार्ड हे ओळखपत्रासारखे झाले आहे. आधार कार्ड सध्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचे डॉक्यूमेंट बनले आहे, कुठेही गेलात तरी आधार कार्ड लागतेच. त्यामुळे कोणी थेट आधार कार्डच जवळ बाळगते तर कोणी फोटोकॉपी, मात्र, असाही प्रसंग ओढवतो की यापैकी काहीच जवळ नाही. त्यातच आधारचा एवढा मोठा क्रमांक आठवण्याचे काही कारणच नाही. अशावेळी काय करायचे. अशा वेळी जर तुमचा आधार क्रमांक ऑनलाइन परत कसा मिळवायचा असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर हा लेख संपूर्ण वाचा.
आधार कार्ड हरवले किंवा विसरले तर ?
- आधार कार्ड हरवले असेल किंवा कुठेतरी विसरले गेले असेल तर ते पुन्हा मिळवता येते, परंतु त्यासाठी आधार कार्डवरील नंबर पाठ असणे आवश्यक आहे.
- आधार नंबर माहीत नसेल तर तो मिळवता येतो, त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट जोडणी असलेला मोबाइल असणे गरजेचे आहे.
कसा शोधाल आधार नंबर ?
तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा नावनोंदणी क्रमांक (EID) ऑनलाइन शोधण्यासाठी, तुम्हाला या पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. प्रथम खालील UIDAI पोर्टलवर जा.
- त्यावरील My Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
- स्क्रोल करत खाली जा आणि Aadhaar Services या विभागात जा.
- आता या ठिकाणी Retrieve EID / Aadhaar number या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल जेथे तुम्हाला या दोन पर्यायांपैकी कोणताही एक निवडा – १) आधार क्रमांक (UID) पुनर्प्राप्त करा किंवा २) आधार नोंदणी क्रमांक (Enrolment ID) पुनर्प्राप्त करा.
- त्यानंतर तुमचा वैयक्तिक तपशील जसे की नाव, तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी एंटर करा.
- पुढे पेजवर Captcha कोड एंटर करा.
- पुढील स्टोपमध्ये ‘Send OTP‘ वर क्लिक करा, जे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर सहा अंकी OTP पाठवेल.
- पोर्टलवर सहा-अंकी OTP एंटर करा.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर किंवा ई-मेल पत्त्यावर तुमचा १२ अंकी आधार क्रमांक पाठवला जाईल.
ज्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी त्यांच्या आधार कार्डसोबत नोंदणीकृत केलेला नाही, त्यांना EID किंवा UID क्रमांक पुनर्प्राप्त करण्यासाठी जवळच्या कायमस्वरूपी नावनोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!