आपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

डिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती (Digitally Signed eFerfar)

फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते. फेरफारांची नोंदवहीला ‘हक्काचे पत्रक’ किंवा ‘फेरफार रजिस्टर’ असेही म्हणतात. जमिनीच्या अभिलेखात सातत्य राखण्यासाठी, कोणत्याही जमिनीच्या हक्कामध्ये सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय बदल होता कामा नये आणि झालेला कायदेशीर बदल हा गाव दफ्तरी, योग्य ती प्रक्रिया पार पाडून नोंदविण्यात यावा हा अधिकार नोंदणीचा मूळ उद्देश आहे. फेरफार नोंदीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १४७ ते १५९ अत्यंत महत्वाची आहेत. त्यांचे नेहमी वाचन करावे. गाव नमुना ६ (फेरफार नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती मागील लेखामध्ये पाहिली आहे.

आपण घरबसल्या मोबाईलवर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार उतारा (Digitally Signed eFerfar) डाऊनलोड कसा करू शकतो, याचीच माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

डिजिटल स्वाक्षरीत फेरफार ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस (Digitally Signed eFerfar):

डिजिटल स्वाक्षरीत फेरफार (Digitally Signed eFerfar) ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी प्रथम खालील महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट लिंक ओपन करा.

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in

आता तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील विविध सेवांचा लाभ घेऊ शकता.

पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथे आला असाल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे New User Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे. खालील प्रमाणे “Regular Login” या पर्याय निवडून नोंदणी करा किंवा “OTP” लॉगिनचा पर्याय निवडा.

New User Registration करताना एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला खालील माहिती भरायची आहे.

  • वैयक्तिक माहिती – Personal Information
  • पत्ता माहिती – Address Information
  • लॉगइन माहिती – Login Information

यानंतर तुमच्या समोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल. त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे.

लॉगिन केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर “Digitally Signed eFerfar” हा पर्याय तुम्ही पाहू शकता, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर “डिजिटल स्वाक्षरीत फेरफार (Digitally Signed eFerfar)” नावाचे एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका आणि तुमचे गाव निवडायचे आहे आणि मग फेरफार नंबर टाकायचा आहे.

सगळ्यात शेवटी डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा.

Digitally Signed eFerfar download
Digitally Signed eFerfar download

त्यानंतर RS.15 will be deducted from your available balance for Ferfar download, असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. त्याखालच्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार तिथं डाऊनलोड होईल.

यात सुरुवातीला फेरफाराचा क्रमांक, त्यानंतर अधिकाराच्या स्वरुपात काय बदल झाला, याची सविस्तर माहिती दिलेली असते. पुढे परिणाम झालेले गट क्रमांक आणि अधिकाऱ्याचं नाव आणि शेरा दिलेला असतो.

हा फेरफार उतारा डिजिटल स्वाक्षरीत (Digitally Signed eFerfar) असल्यामुळे यावर कोणाच्याही सही-शिक्क्याची आवश्यकता नाही. शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी वापरता येईल. आता डिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारा (Digitally Signed eFerfar) काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात जायची गरज पडणार नाही.

सूचना : प्रत्येक eFerfar डाउनलोड करण्यासाठी 15 रुपये आकारले जातील. ही रक्कम उपलब्ध शिल्लकमधून वजा केली जाईल. जर उपलब्ध शिल्लक रक्कम (रु. १५) कापली गेली आणि जर ईफेरफार डाउनलोड करता आले नाही तर पेमेंट हिस्ट्री पर्यायावर जा आणि ईफेरफार डाउनलोड करा, हे डाउनलोड फक्त 72 तासांसाठी उपलब्ध असेल.

हेही वाचा – गाव नमुना ६ (फेरफार नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 6 (Ferfar Nondvahi)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.