वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र ग्रामपंचायत

ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्रचालक (ऑपरेटर)साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस

महाराष्ट्रात प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये शासनाने ग्रामपंचायतीची सर्व कामे ऑनलाइन करण्यासाठी व विविध ऑनलाइन सेवा प्रत्येक गावात ग्रामपंचायत मध्ये मिळाव्या यासाठी संगणक परिचालक/आपले सरकार सेवा केंद्रचालक (ऑपरेटर) यांची नियुक्ती केलेली आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालक म्हणून नियुक्त करून यांना आता ७००० मानधन दिले जाणार आहे. यात त्यांना ग्रामपंचायतीची माहिती विविध सॉफ्टवेअर व वेबसाइट वर भरावी लागते. या लेखामध्ये आपण ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्रचालक रिक्त जागांची माहिती आणि ग्रामपंचायत संगणक परिचालक (ऑपरेटर) साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सविस्तर जाणून घेऊया.

ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्रचालक (ऑपरेटर)साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर प्रोसेस.

कामाचे स्वरूप: ब्लॉक आपले सरकार सेवा केंद्रचालक

  • सर्व जी टू जी विभाग व ग्रामपंचायतींअंतर्गत चालणाऱ्या सर्व योजनांसाठी डाटा एन्ट्री काम.
  • आपले सरकार सेवा केंद्र कडून सर्व जी २ सी, बी २ सी व सी २ सी सेवा पुरविणे.
  • संगणकाशी संबंधित विविध डेटा फीडिंग व कागदपत्र तयार करण्यासाठी ग्रामसेवक व जी.पी. यांना सहाय्य करणे.
  • ग्रामपंचायत साठी पत्रे टाईप करा
  • ग्रामपंचायत रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे
  • ई-पीआरआय सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंग डेटा प्रविष्ट करणे
  • ई-पीआरआय प्रोजेक्टशी संबंधित ग्रामसेवकाच्या निर्देशानुसार विविध कामे

ऑपरेटरसाठी अनिवार्य कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बायोडाटा
  • एमएससीआयटी प्रमाणपत्र

ग्रामपंचायत संगणक परिचालक (ऑपरेटर)साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस:

ग्रामपंचायती संगणक परिचालक (नोंदणी) Register करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://mh.gov2egov.com/NewTheme/login.aspx

संगणक परिचालक/आपले सरकार सेवा केंद्रचालक (ऑपरेटर) नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर टाकून (नोंदणी) Register करा.

राज्यातील ग्रामपंचायती मधील संगणक परिचालक/आपले सरकार सेवा केंद्रचालक (ऑपरेटर) साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://mh.gov2egov.com/GeneralPages/HomeNew.aspx

वेबसाईट ओपन झाल्यावर त्यामध्ये “User Login” पर्यायावर क्लिक करा.

User Login करण्यासाठी इथे “Normal Login” हा पर्याय निवड आणि युजरनेम, पासवर्ड आणि व्हेरिफिकेशन कोड टाकून “Login” बटन वर क्लिक करा.

युजर लॉगिन झाल्यावर नोंदणी अर्जामध्ये General Details, Education Details, आणि Address टाका.

General Details:

अर्ज करण्यापूर्वी “General Details” मध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, ई – मेल आयडी, मोबाइल नंबर, जन्म तारीख, लिंग, आईचे नाव, वडीलांचे नावं, मुलं किती त्याचा अंक, लग्न झाले असेल तर जोडीदाराचे नाव, आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक टाकून अर्जदाराचा फोटो अपलोड करा.

Education Details

“Education Details” मध्ये अर्जदाराचे शिक्षणाचा प्रकार, विद्यापीठ / मंडळ, विद्यापीठ / महाविद्यालयाचे नाव, पात्रता, उत्तीर्ण होण्याचे वर्ष, एकूण गुण प्राप्त, Out Of Mark, टक्केवारी, Class/Grade प्राप्त, ठिकाणचे नाव, इत्यादी माहिती भरा आणि Save बटन वर क्लिक करा.

Address:

“Address” मध्ये राज्य, तालुका, ग्रामपंचायत, सध्या राहत असलेला पत्ता, पिन कोड इत्यादी माहिती भरा आणि वरील प्रमाणेच पर्मनंट पत्ता असेल तर “Check If Same as Above” या पर्यायावर क्लिक करा, पर्मनंट पत्ता आणि सध्याचा पत्ता वेगळा असेल तर त्या पर्यायावर क्लिक करू नका. सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह करा.

रिक्त पदासाठी अर्ज करा:

राज्यातील ग्रामपंचायती मधील रिक्त केंद्राचालक जागांची माहिती पहा आणि रिक्त पदासाठी अर्ज करा.

रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम वरती “Apply For Vacancy” बटन वर क्लिक करा.

“Apply For Vacancy” बटन वर क्लिक केल्यानंतर कृपया राज्यस्तरासाठी राज्य, जिल्हास्तरीय जिल्हा, तालुका स्तरासाठी तालुका आणि जीपी स्तरावरील रिक्त स्थानाकरिता जीपी म्हणजे तुमची ग्रामपंचायत निवडा आणि खाली चित्रा मध्ये दाखवल्या प्रमाणे इथे जागा रिक्त आहे म्हणून “Aple Sarkar Seva Kendra Chalak” हा पर्याय दिसतो आहे म्हणून मी आता त्यावर क्लिक करतो.

आता तुम्हाला “Job Description‘ दिसेल PDF फाईल डाउनलोड करून कामाचे स्वरूप पहा आणि “Apply” वर क्लिक करा.

नंतर वरील आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि Apply बटन वर क्लिक करा. आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी वरती “Career” पर्यायामध्ये “Application Status” वर क्लिक करा.

आपल्या अर्जाची स्थिती जरी “In Process” दाखवत असेल तरी हि एखादा तालुका पंचायत समिती मध्ये या अर्जाबाबत चौकशी करा आणि आपण ऑनलाईन अर्ज केल्याचे त्यांना माहिती द्या. पुढील प्रोसेस ते तुम्हाला तिथे सांगतील व आपले सरकार सेवा केंद्र पोर्टलचा लॉगिन आयडी देतील.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.