आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन TEC कोर्स (Telecentre Entrepreneur Course)

आपण या लेखामध्ये Telecentre Entrepreneur Course (TEC) कोर्स म्हणजे काय? TEC कोर्स करून आपण काय करू शकतो ? तसेच TEC कोर्स चे काय फायदे आहेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत .

TEC कोर्स कशासाठी उपयोगी आहे?

नवीन CSC सेंटर घेण्या साठी हा TEC कोर्स एक महत्वाची पात्रता पूर्ण करतो.

>

TEC कोर्स मध्ये काय नवीन आहे ?

जर आपल्याला नवीन सीएससी सेंटर सुरू करण्याचा विचार करत असाल तर या पोस्टचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तसेच नवीन नियम प्रणालीनुसार सीएससी सेंटर घेण्यासाठी अर्जदार हा TEC परीक्षा पास असणे खूप महत्वाचे आहे, Telecentre Entrepreneur Course (TEC) हा CSC VLE बनण्यासाठी आवश्यक आहे.

जर आपण Telecentre Entrepreneur Course (TEC) कोर्स केला तरच आपण सीएससी सेंटर साठी अँप्लिकेशन करू शकता.

हा कौर्स CSC अकॅडमी द्वारा तयार करण्यात आला आहे यामध्ये CSC VLE होण्यासाठी कोणत्या ज्ञानाची आवश्यकता आहे याची माहिती या अभ्यासक्रमात देण्यात आली आहे व विविध ऑनलाइन सेवेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.

हा कौर्स पूर्ण केल्यास व्हीएलई सीएससी सेंटर (CSC Center) घेण्यासाठी प्रमाणित केला जाऊ शकतो (पात्र होतो) या कोर्स द्वारे सीएससी व्हीएलई (CSC VLE) होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामान्य ज्ञांनाची माहिती व्हीएलई (VLE) ला या कोर्स द्वारे मिळेल.

नागरिकांचा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रवेश:

TEC हा कोर्स केल्यानंतर नागरिकांना इंटरनेट,संगणक ऑनलाइन सुविधा व इतर डिजिटल तंत्रज्ञान मध्ये प्रवेश करण्यास मदत करतो.त्यामुळे त्यांचे ज्ञान वाढते.

तसेच हा कोर्स केल्यानंतर सेंटर मध्ये आलेल्या लोकांना कसे सामोरे जायचे आहे त्यांच्याशी कसा वार्तालाप करायचा आहे आणि त्यातून आपले चांगले नेटवर्क कसे उभे करायचे याचे ज्ञान या कोर्स मध्ये देण्यात आलेले आहे.

गाव डिजिटल होण्यास मदत:

VLE हे गावातील नागरिकांना शासनाच्या तसेच खाजगी विविध सेवा एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे नागरिकांची सोय होते आहे व यातून CSC व्हीएलई हा प्रत्येक गाव डिजिटल (Digital Vilage) बनवण्यात हातभार लावत आहेत.

CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन TEC कोर्स (Telecentre Entrepreneur Course):

TEC कोर्स साठी अँप्लिकेशन कसे करावे?

या कोर्स साठी अर्ज करण्यासाठी आपण त्याच्या अधिकृत वेबसाइट http://www.cscentrepreneur.in/ या ठिकाणी जावून माहिती घेवू शकता.

जरी यापूर्वी आपण CSC सेंटर घेतले असेल तरी सुद्धा हा कोर्स आपणास करणे आवश्यक आहे.

इथे टीईसी कोर्स साठी अर्ज करण्यासाठी दोन पर्याय दिसतील 1) CSC VLE 2) सामान्य नागरिक जर तुम्हाला या आधीच CSC ID मिळाला असेल तर login with Digital Seva Portal लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.

आपण जर आपणाकडे सीएससी आयडी नसेल तर Public Users लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता. या मध्ये लॉगिन /रजिस्टर मध्ये जाऊन आपली माहिती भरावी व रजिस्टर करावे.

TEC कोर्स साठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक माहिती, फोटो (Size 50 KB पेक्षा कमी साइज) हे डॉक्युमेंट लागतात.

TEC Registration साठी आपले नाव, मोबाईल नंबर , ईमेल, वडीलाचे नाव/पतीचे नाव, संपूर्ण पत्ता, जन्म तारीख आणि आपला फोटो उपलोड (Size 50 KB) पेक्षा कमी असावी) करावा व सबमीट करावे.

या नंतर पुढे फी पेमेंट पेज ओपन होईल इथे कोर्स फी 1479 रुपये पेमेंट करावे लागते. हे पेमेंट आपण क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड,नेट बँकिंग याच्या माध्यमातून ऑनलाइन करावे.

पेमेंट झाल्यानंतर आपल्याला नवीन पेज वर आपणास एक युजर आयडी मिळेल, व पासवर्ड हा आपला रजिस्टर करताना टाकलेला मोबाईल नंबर असेल.

आपले पेमेंट यशस्वी झाल्यावर आपल्याला पुढील महिती साठी http://www.cscentrepreneur.in/userlogin येथे जाऊन आपणास मिळालेला युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.

TEC परीक्षा माहिती:

TEC Exam आपण आपल्या घरी बसून ऑनलाइन ही परीक्षा देऊ शकतो. आता तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये हिन्दी व इंग्रजी मध्ये काही PDF व व्हिडिओ मिळतील त्याचा तुम्हाला अभ्यास करून प्रत्येक मोड्यूल अभ्यास केल्यानंतर त्याच्या समोर असलेल्या असायमेंट यशस्वी रित्या पूर्ण करून त्या मध्ये दिलेल्या 10 मोड्यूल असायमेंट पास करायच्या आहेत. TEC कोर्स अभ्यासक्रम 40 तासाचा आहे.

असायमेंट पास झाल्यावर तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये TEC सर्टिफिकेट नंबर मिळेल व आपण त्या लॉगिन मधून सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. Tec Exam पास झाल्यावर सर्टिफिकेट मिळण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात. हे प्रमाणपत्र मिळाल्यावर तुम्ही CSC सेंटर साठी अर्ज करू शकता.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.