Madhmashi Palan : मधमाशा पालनासाठी 50 टक्के अनुदान ; 20 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (Madhmashi Palan) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनेद्वारे मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
मध केंद्र योजना – Madhmashi Palan:
मधमाशा पालन – Madhmashi Palan हा एक वैशिष्ट्यपूर्ण बहुउद्देशिय उद्योग आहे. मधमाशा पालन (Madhmashi Palan) उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी राज्यात राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील मध उद्योगाच्या विकासासाठी असणारे पोषक वातावरण लक्षात घेता व्यावसायिक तत्वावर मध उद्योगाचा व्यवसाय करणारे मधपाळ निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मधमाशा पालनासाठी प्रमुख घटक आणि पात्रता:
मधमाशा पालनासाठी 50 टक्के अनुदानासाठी पात्र व्यक्ती व संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी जास्तीत जास्त शेतकरी, कातकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी दि. 20 जुलै, 2024 पर्यंत अर्ज करावेत. मध केंद्र (Madhmashi Palan) योजनेंतर्गत मधमाशा पालनासाठी प्रमुख घटक आणि पात्रता खालील प्रमाणे आहे.
वैयक्तिक मधपाळ योजना :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा.
- स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य,
- वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजना :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती वैयक्तिक केंद्र चालक असावा.
- शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास असावी.
- वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे.
- अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन,
- लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
केंद्र चालक संस्था :
- योजनेचा लाभ घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी.
- संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडेतत्वावर घेतलेली किमान एक एकर शेत जमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी.
- संस्थेकडे मधमाशीपालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली संस्था असावी.
वरील योजनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे तसेच निश्चित ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
वैयक्तिक केंद्र चालकासाठी अटी:
- या योजनेसाठीचा अर्जदार हा किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीकडे स्वतःच्या नावे एक एकर जमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली असावी.
- त्याच्याकडे नवीन लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा व क्षमता असावी.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- उत्पनाचा दाखला
- मधमाशी पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
- बँक पास बुक
- मोबाईल नंबर
- जन्माचा दाखला
- शाळेचा दाखला
अर्ज करण्याची पध्दत :
- प्रथम आपणाला जवळच्या जिल्हा कार्यालयातील खाडी व ग्रामुद्योग विभागात जावे लागेल.
- तिथून आपणाला मध केंद्र अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्या अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरावी लागेल.
- त्यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्या लागतील.
- नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
मध केंद्र योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे:
- मध केंद्र योजनेचा (Madhmashi Palan) अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्याल त्याचा अर्ज रद्द होतो.
- अर्जदार व्यक्तीने अर्जात खोटी अथवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होतो.
- यापूर्वी अर्जदाराने शासनाच्या कोणत्याही योजने अंतर्गत मधमाशी पालन योजनेचा लाभ घेतलेला असल्यास, त्याचा अर्ज रद्द होतो.
हेही वाचा – Udyogini Scheme : उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Yes educated
Yes I am intrased in this policy and I am educated and proper trining in honey bee handing and
I went to saport to farmer and vilege in my famly