शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस मुदत वाढ !
सलोखा योजना (Salokha Scheme) ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे, जी शेतजमिनीवरील वाद मिटवण्यासाठी व सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. सलोखा (Salokha Scheme) योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या एकमेकांच्या जमिनीची अदलाबदल अधिकृत व कायदेशीररित्या करता येते, आणि त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्कात मोठी सवलत दिली जाते.
महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरुन होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेत जमीन मोजणीवरुन होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणावरुन होणारे वाद, शेती वहीवाटीचे वाद, भावा-भावांतील वाटणीचे वाद, शासकिय योजेनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणांमुळे शेतजमीनीचे वाद समाजामध्ये आहेत.
शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस मुदत वाढ ! Salokha Scheme:
शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयातील व प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी सदर वाद वर्षानुवर्षे चालू आहेत. शेतजमिन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशिल विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे. सदर वादांमुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून, आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्ठात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाही.
शासनाने शेतजमिनीचा ताबा व मालकीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु. १०००/- व नोंदणी फी नाममात्र रु. १०००/- आकारून मुद्रांक शुल्क व नोंदणी फी मध्ये सवलत देण्याची “सलोखा योजना (Salokha Scheme)” राबविण्यास दिनांक ३.१.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे.
शासन निर्णयामध्ये सलोखा (Salokha Scheme) योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबातची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाचा राहील असे नमुद केले आहे. त्यानुसार सदर योजनेची मुदत दिनांक ०२.०१.२०२५ रोजी संपुष्टात येत आहे. सलोखा (Salokha Scheme) योजनेस आणखी दोन वर्षाची मुदतवाढ देण्याची बाब सदर नस्तीवर विचाराधीन होती.
शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु. १०००/- व नोंदणी फी नाममात्र रु. १०००/- आकारण्याबाबत सवलत देण्याबाबतच्या “सलोखा (Salokha Scheme) योजनेचा कालावधी आणखी दोन वर्षांनी म्हणजेच दि. ०२.०१.२०२५ पासून दि.०१.०१.२०२७ पर्यंत वाढविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
सलोखा (Salokha Scheme) योजनेच्या इतर अटी व शर्ती तसेच अनुषंगिक बाबी शासन निर्णय दिनांक ०३.०१.२०२३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कायम राहतील.
अर्जाची प्रक्रिया:
- तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मदतीने जमीन ताबा व उपयोग याचा पंचनामा करा.
- तहसील कार्यालयात अर्ज सादर करा.
- संबंधित कागदपत्रांची पडताळणी.
- मुद्रांक व नोंदणी शुल्क भरून अदलाबदल नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
महसूल व वन विभाग शासन निर्णय (Salokha Scheme GR):
सलोखा (Salokha Scheme) योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही सलोखा (Salokha Scheme) योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- (Salokha Scheme) : शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना
- शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या नोंदणीबाबत सूचना (महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ८५ नुसार) आणि शेतजमीनी वाटणीपत्र अर्ज नमुना
- महसूल विभागाची जिवंत सातबारा मोहिम : ७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार, वारसांची नावे लागणार!
- जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.
- गाव नमुना ६-क (वारसा प्रकरणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 6K
- गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
- 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर!
- सातबारा (7/12) वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर
- सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
- सर्व्हे नंबर, भूमापन क्रमांक आणि गट नंबर याबाबत सविस्तर माहिती !
- जमिनीची सरकारी किंमत ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर
- जमीन किंवा बिगर शेती जमीन (NA Plot) खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ? जाणून घ्या सविस्तर
- जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती
- डिजिटल स्वाक्षरीचा ८अ खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर
- डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!