सरकारी कामेमहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेष

डिजिटल स्वाक्षरीचा ८अ खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर

८-अ खाते उतारा हवा असेल तर आता तुम्हाला तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही, कारण आता डिजिटल सही असलेला ऑनलाईन ८-अ खाते उतारा PDF फाईल मध्ये उपलब्ध होणार आहे. महसुल विभागाने राज्यातील सर्व जमीनीचे ८-अ खाते उतारा, सातबारा संगणकीकृत करून दिले आहेत.

डिजिटल स्वाक्षरीचा ८-अ खाते उतारा ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस:

खालील महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट लिंक ओपन करा.

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in

>

आता तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, म्हणजे या अगोदर सातबारा काढला असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील इतर सेवांचा लाभ घेऊ शकता.

पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथे आला असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे New User Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे. खालील प्रमाणे “Regular Login” या पर्याय निवडून नोंदणी करा किंवा “OTP” लॉगिनचा पर्याय निवडा.

एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला खालील माहिती भरायची आहे.

  • वैयक्तिक माहिती – Personal Information
  • पत्ता माहिती – Address Information
  • लॉगइन माहिती – Login Information

यानंतर तुमच्या समोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल. त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे.

त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर “Digitally Signed 8-A” हा दुसरा पर्याय तुम्ही पाहू शकता.

प्रत्येक 8-अ साठी 15 रुपये शुल्क आकारले जाईल आणि ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील. आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेले असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसते. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणे गरजेचे असते. ते कसे करायचे तर त्यासाठी खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 15 रुपये इतकी रक्कम टाकून Pay Now या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पुढे confirm या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम अँप असेल तर त्याद्वारे जमा करू शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले असतात. त्यानंतर डिजिटल 8-अ च्या फॉर्मवर परत गेले, तर तिथे तुम्हाला 15 रुपये तुमच्या खात्यात जमा झाल्याचे दिसेल.

पुढे आपल्याला डिजिटल स्वाक्षरीचा ८-अ खाते उतारा ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खालील माहिती भरायची आहे. यात जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर, तुमचं पहिलं, मधलं किंवा शेवटचं नाव यापैकी काही एक माहिती टाकायची आहे.

  • जिल्हा (District):
  • तालुका (Taluka):
  • गाव (Village):
  • खाता नंबर भरा (Enter Khata No.):

पुढे तुम्हाला ८-अ खाते उतारा डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन दिसेल त्यावर क्लिक करून PDF फाईलमध्ये डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.

Download 8A
Download 8A

या ८-अ खाते उताऱ्यावर हा ८-अ खाते उतारा कोणत्या तारखेला डिजिटल स्वाक्षरीसह तयार झाला आहे, याची माहिती ८-अ खाते उताऱ्याच्या खालच्या बाजूला दिली असेल. हा ८-अ खाते उतारा डिजिटल स्वाक्षरीने तयार केला असल्यामुळे या ८-अ खाते उताऱ्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज लागणार नाही. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हा ८-अ खाते उतारा तुम्ही अधिकृतरित्या वापरू शकतो. अशा प्रकारे तुम्ही काही मिनिटातच डिजिटल स्वाक्षरीचा ८-अ खाते उतारा घर बसल्या काढू शकता.

हेही वाचा – 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.