सरकारी कामेमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा

जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

आपल्या शेतात जाण्यासाठी एखादा नवा रस्ता काढायचा असेल किंवा आपल्या जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असतं. आता महाराष्ट्र सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा किंव्हा शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा?, तो वाचायचा कसा आणि सरकारचा ई-नकाशा हा प्रकल्प काय आहे, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस:

आपल्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला खालील महाभूनाकाशाची वेबसाईट ओपन करायची आहे.

http://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp 

  • त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location (स्थान) हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी (Category) मध्ये Rural आणि Urban असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर Rural हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर Urban हा पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी Village Map यावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर आपली जमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा ओपन होतो.
  • होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.
  • त्यानंतर डावीकडील + किंवा या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता येतो.
  • पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे.
Village Map
Village Map

आता जमिनीचा नकाशा कशा काढायचा ते पाहूया?

त्याच वेबसाईटवर Search By Plot Number या नावानं एक रकाना दिलेला आहे.

इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.

आता डावीकडे Plot Info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते.

ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी Map Report नावाचा पर्याय असतो.

यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा Plot Report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.

त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 481 या गटाशेजारी 480, 482, 483, 484, 487, 479 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात.

आणि मग खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

Search By Plot No:
Search By Plot No:

ई-नकाशा प्रकल्प काय?

महाराष्ट्र भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले असतात. याच नकाशांच्या आधारे जमिनीच्या हददी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात.

पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच 1880 पासून तयार केलेले असल्यामुळे ते नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ई-नकाशा हा प्रकल्प हाती महाराष्ट्र सरकारनं हाती घेतला आहे.

या अंतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे इ. नकाशांचं डिजिटायजेशन करण्यात येत आहे.

त्यामुळे डिजिटल सातबारा, डिजिटल आठ-अ यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशाही ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे.

हेही वाचा – सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? जाणून घ्या महत्वाच्या बाबी

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.