महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा? जॉब कार्ड यादी मध्ये ऑनलाईन नाव तपासा

महात्मा गांधी रोजगार हमी कायदा 2005, हा एक भारतीय कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचा उद्देश ‘कामाच्या अधिकाराची हमी’ मिळवणे आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारच्या काळात सप्टेंबर 2005 मध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला होता. ज्यांचे वयस्क सदस्य अकुशल मॅन्युअल काम करण्यासाठी स्वयंसेवा करतात अशा प्रत्येक घरात आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांचे वेतन रोजगार उपलब्ध करून ग्रामीण भागात रोजीरोटीची सुरक्षा वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. ज्यात प्रौढ सदस्य अकुशल मॅन्युअल काम करण्यासाठी स्वयंसेवा करतात अशा प्रत्येक घरात, “आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांची मजुरीची हमी रोजगार देऊन ग्रामीण भागात रोजीरोटीची सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने” मनरेगाची सुरूवात केली गेली.

टिकाऊ मालमत्ता (जसे की रस्ते, कालवे, तलाव आणि विहिरी) तयार करणे हे मनरेगाचे आणखी एक उद्दीष्ट आहे. अर्जदाराच्या निवासस्थानापासून 5 किमीच्या आत रोजगार उपलब्ध करुन द्यावा लागेल आणि किमान वेतन द्यावे लागेल. अर्ज केल्याच्या 15 दिवसांच्या आत काम दिले गेले नाही तर अर्जदारांना बेरोजगारी भत्ता मिळण्याचा हक्क आहे. म्हणजेच जर सरकार रोजगार उपलब्ध करण्यात अयशस्वी ठरली तर त्या लोकांना त्या लोकांना बेरोजगाराचे काही भत्ते द्यावे लागतील. अशा प्रकारे मनरेगा अंतर्गत रोजगार हा कायदेशीर हक्क आहे. मनरेगाची अंमलबजावणी प्रामुख्याने ग्रामपंचायतींकडून करण्यात येणार आहे. कंत्राटदारांच्या सहभागावर बंदी आहे.

आपण या लेखात महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) जॉबकार्ड म्हणजे काय? जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा? जॉब कार्ड यादी मध्ये ऑनलाईन नाव कसे तपासायचे ते सविस्तर पाहूया.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) जॉबकार्ड म्हणजे काय?

मनरेगाच्या कायद्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब ओळखपत्र म्हणजेच, जॉबकार्ड आवश्यकआहे. यामध्ये योजनेच्या लाभार्थींचा फोटोसह नोंदणी क्रमांक असतो. जॉब कार्ड हे एक मुख्य कागदपत्र आहे जे मनरेगा अंतर्गत कामगारांच्या अधिकारांची नोंद ठेवते. हे नोंदणीकृत कुटुंबांना कायदेशीररीत्या कामासाठी अर्ज करण्यास सक्षम करते, पारदर्शकता सुनिश्चित करते आणि कामगारांना फसवणूकीपासून संरक्षण देते. मागेल त्याला काम’ या तत्वावर ग्रामीण भागातील कुटुंबातील व्यक्तींना एका आर्थिक वर्षात केंदीय निधीतून  १०० दिवसांची रोजगाराची हमी दिली जाते. तसेच, २६५ दिवसाची हमी राज्य शासनाकडून दिली जाते.

आपल्याला शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे जॉबकार्ड असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत केलेल्या कामांची, मुजुरी भरलेल्या दिवसांची हजेरी आणि मजुरीदराची मस्टरवर नोंद करावी लागते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांच्याकडे जॉबकार्ड नाही त्यांनी हे ग्रामपंचायतमार्फत काढून घेतले पाहिजे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) योजना महाराष्ट्र मजुरी:

केंद्रशासनाने ठरविलेल्या दराप्रमाणे मजूरास मजूरी मिळते, तसेच पुरुष आणि स्त्रियांना सामना रोजगार दर दिला जातो.

 • २०१६ – २०१७ करिता- रु. १९२/- प्रति मनुष्यदिन
 • २०१७-२०१८ करिता- रु. २०१/- प्रति मनुष्यदिन
 • २०१८- २०१९ करिता- रु. २०३/- प्रति मनुष्यदिन
 • २०१९- २०२० करिता- रु. २०६/- प्रति मनुष्यदिन
 • २०२०-२०२१ करिता- रु. २३८/- प्रति मनुष्यदिन   

मनरेगा जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा?

महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्ड काढण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत मध्ये सरपंच/ग्रामसेवक यांच्या नावे अर्ज करावा लागतो. कामासाठी अर्ज केल्याच्या १५ दिवसाच्या आत मोफत जॉब कार्ड दिलं जातं. अर्ज केल्याच्या दिवसापासून १५ दिवसांच्या आत जर रोजगार दिला नाही तर, कायद्यानुसार दैनंदिन रोजगार भत्ता राज्यसरकारने द्यायचा असतो.

१ . मजूर कुटुंबाने नोंदणीसाठी ग्रामसेवकाकडे द्यावयाचा अर्ज

२ . ग्रामसेवक अनुपस्थित असल्यास किंवा ग्रामसेवकाकडे ग्रामपंचायत मध्ये अर्ज देणे शक्य नसल्यास गट विकास अधिकाऱ्यांकडे द्यावा .

३ . छापील अर्ज उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर खालील नमुना १ मधील माहिती लिहून दिली तरी चालेल.

४ . कुटुंब नोंदणी हि वर्षभर सतत चालणारी प्रक्रिया आहे .

अर्ज नमुना-१ खालील प्रमाणे माहिती भरायचे आहे.

१. कुटुंब प्रमुखाचे नाव :-

२. अर्जदाराचे नाव     :-

३. अर्जदाराचा पत्ता ( घर क्र . सहित ) :- मोबाईल क्र.        :-

४. जात प्रवर्ग :-

५. अल्पसंख्याक आहे कि नाही

६. अल्पभूधारक शेतकरी आहे कि सीमांत शेतकरी

७. भूसुधार लाभार्थी आहे कि नाही

८. इंदिरा आवास योजना लाभार्थी आहे कि नाही.

९. आम आदमी बिमा योजना लाभार्थी आहे कि नाही.

१०. राष्ट्रीय स्वास्थ बीमा योजना लाभार्थी आहे किंवा नाही :-

११. दारिद्र रेषेखालील कुटुंब आहे किंवा नाही :-

१२. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम २००६ अंतर्गत जमीन मिळाली आहे का होय किंवा नाही.

त्यानंतर पुढे आपल्या कुटुंबातील अर्जदार प्रौढ व्यक्तींचा पोस्टकार्ड आकाराचा रंगीत फोटो लावायचा आहे.

जॉब कार्ड अर्ज नमुना PDF फाईल:

महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्ड अर्ज नमुना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

जॉब कार्ड यादी मध्ये ऑनलाईन नाव तपासा:

मनरेगा रोजगार हमी योजनेच्या व्यवहारात व कामात अधिक सुगममता यावी म्हणून ऑनलाईन पोर्टल सुरू केली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून योजनेच्या लाभार्थ्यांची यादी, जॉब कार्ड धारकांची यादी, जॉब कार्ड क्रमांक, मनरेगाच्या विविध योजनेअंतर्गत करण्यात आलेली कामे, भरलेल्या कामाचे एकूण दिवस, आणि बँक खात्यात जमा झालेले अनुदान आणि मजुरीचे सर्व माहिती पाहायला मिळेल.

महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्ड ऑनलाईन पाहण्यासाठी खालील मनरेगाच्या अधिकृत पोर्टला भेट द्या.

https://nrega.nic.in/netnrega/home.aspx

 1. मनरेगाची पोर्टल ओपन झाल्यावर मुख्य मेनू मध्ये “Panchayats GP/PS/ZP” या पर्यायावर क्लीक करा.
 2. पुढे “Gram Panchayats” या पर्यायावर क्लीक करा
 3. पुढे “Generate Reports :- JOb Card, Job Slip, MSR Register, Pending Works, UC” या पर्यायावर क्लीक करा.
 4. आपले राज्य निवडा.
 5. रिपोर्ट मध्ये खालील पर्याय निवडा.
 • Financial Year :- आर्थिक वर्ष निवडा.
 • District :-  जिल्हा निवडा.
 • Block :- तालुका निवडा.
 • Panchayat :- ग्रामपंचायत निवडा
 • पुढे “Proceed” वर क्लीक करा.

पुढे एक नवीन वेबपेज ओपन होईल त्यामध्ये R5. IPPE या मेनू मध्ये “Application Register” पर्यायावर क्लिक करा. पुढे आपल्याला गावातील मजूरांची जॉब कार्ड यादी पाहू शकता आणि त्यामधे तुमचे नाव तपासा.

मनरेगा टोल फ्री नंबर / MGNREGA Helpline Number: 1800-110-707

मनरेगा एमआयएस अधिका-यांची संपर्क यादी:

मनरेगा एमआयएस अधिका-यांची राज्यानुसार संपर्क यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे ऑनलाईन कसं पाहायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती – Measurement Book & Mustroll Detail

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.