मनरेगा योजनेंतर्गत कामांवरील हजेरीपट (e-muster) ग्राम पंचयातस्तरावरून निर्गमित करण्याची कार्यपध्दती !
महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ (सुधारित सन २०१४) पासून रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ महाराष्ट्रामध्ये लागू केला आहे. याअंतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामावरील हजेरीपट (e-muster) प्रचलित पद्धतीप्रमाणे न काढता त्यासाठी ग्रामपंचायतीला प्राधिकृत करणे व ग्रामपंचायत पातळीवरच ई-मस्टर निर्गमित करण्याची कार्यवाही करणे, त्यासाठी ग्रामपंचायतीला क्षमताबांधणी करणे व ई-मस्टर निर्गमित करण्याची कार्यवाही आपले सरकार पोर्टल मार्फत करण्याबाबतची कार्यपद्धती प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील ३५ तालूक्यामध्ये राबविण्यात आली होती.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांचे हजेरीपट (e-muster) ग्रामपंचायत स्तरावरून निर्गमित करण्याबाबतची कार्यपध्दती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लागु केल्यास मजुरांची कामाची मागणी प्राप्त झाल्यानंतर ग्राम पंचायत स्तरावरून Demand Upload करून ई-मस्टरची प्रत वेळीच प्राप्त करून घेणे शक्य आहे. तसेच, ग्राम रोजगार सेवकाला तालुका स्तरावर कामाची मागणीनुसार मजुराची यादी तालुक्याला पोहचण्याकरिता लागणारा कालावधी, हजेरीपट (e-muster) प्राप्त करून घेण्याकरिता लागणारा वेळ देखील वाचेल. परिणामी डाटा एंट्री करिता होणारा विलंब टाळता येईल. सबब महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत हजेरीपट (e-muster) ग्रामपंचायत स्तरावरून निर्गमित करण्याबाबतची कार्यपध्दती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र या योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरून मजुरांचे हजेरीपट (e-muster) निर्गमित करण्याबाबतची कार्यपध्दती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात यावी.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये मजूरांना अकुशल वेतन त्या कामाचे हजेरीपट बंद झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. विहित मुदतीमध्ये वेतन मजुरांना प्रदान करताना कार्यालयीन यंत्रणेला सुलभता व्हावी व त्याचप्रमाणे या योजनेच्या कामामध्ये पारदर्शकता रहावी व प्रत्येक हजेरीपटाची नोंद MIS वर करून हजेरीपटाचे संनियंत्रण करता यावे यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेवरून हजेरीपट (e-muster) पद्धती अंमलात आली आहे.
ई-मस्टर निर्गमित करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती अवलंबिणे आवश्यक आहे.
१) सदर कामावर हजर राहणा-या अपेक्षित मजूरांची यादी प्राप्त झाल्यानंतर www.nrega.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरुन GP Login मध्ये जावून demand upload करणे. (D.३ Works Demand- demand for work entry)
२) Demand upload झाल्यानंतर याच संकेतस्थळावरुन यादीतील मजुरांना Work allocation ची प्रक्रिया पूर्ण करणे (D.५ Works Allocation- work allocation entry) व तालुका स्तरावरील ई- मस्टरशी संबंधीत ऑपरेटरला दुरध्वनीवरुन व ई-मेलद्वारे बाबीची सुचना देणे.
३) प्राप्त झालेल्या Demand नुसार तालुका स्तरावरील ऑपरेटर PO Login मधुन E-muster तयार करील (D.७.१-Generate E-muster Roll) सदर ई-मस्टरची प्रिंट GP Login मधून काढणे. (D.७.२-E-Muster Roll-print E-Muster Roll)
४) प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर ७ दिवसांच्या कामांचे मोजमापानुसार मजुरी दराची नोंद घेऊन पूर्ण भरलेले ई-मस्टर ग्राम रोजगार सेवक डेटा एंट्री करेल (D.७.२-E-Muster Roll- Fill E- Muster Roll) व Wage list Generate (D. Wage List- Generate wage list for payment) व मजुरी प्रदानाच्या पुढील कार्यवाहीकरीता AAO Login ला पाठवेल. (D.८ Wage List Add payment details to wage list & send).
जिल्हा MIS समन्वयक यांनी स्वतः तालुकास्तरावर जाऊन ग्रामपंचायतस्तरावर ई-मस्टर निर्गमित करण्याबाबतच्या प्रक्रियेबाबत संबंधीत ग्राम पंचायतीतील, सर्व संबंधित व्यक्तींना प्रशिक्षण देतील. तसेच, सर्व ग्राम पंचयातींचे GP Log in करिता User Name व Password उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तालुका स्तरावरील नरेगा सेल मार्फत करण्यात येईल.
ग्रामपंचायतस्तरावर ई- मस्टर निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही सुरळीतपणे होण्यासाठी सर्व संबंधितांमध्ये समन्वयाकरीता आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र, नागपुर या कार्यालयामार्फत वेळोवेळी आढावा घेऊन सुचना करण्यात येतील. तसेच, सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी व संनियंत्रण देखील सदर कार्यालयामार्फत करण्यात येईल.
नियोजन विभाग शासन निर्णय : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवरील हजेरीपट (e-muster) ग्राम पंचयातस्तरावरून निर्गमित करण्याची कार्यपध्दती संपुर्ण राज्यात राबविणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!