महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

ग्रामपंचायत मधील मनरेगाच्या कामांचं स्टेटस ऑनलाईन कसं पाहायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती – Gram Panchayat MGNREGA Work Expenditure

ग्रामपंचायत मध्ये मनरेगा अंतर्गत वैयक्तिक तसंच सार्वजनिक कामांच्या माध्यमातून जसं की शेततळं बांधणं, फळबागेची लागवड या कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. पण, रोजगाराची हमी मिळाल्यानंतर तुमच्या गावात मनरेगाअंतर्गत कोणती कामं सुरू आहेत, त्यांचं स्टेटस काय आहे, सोबतच मनरेगाच्या मजुरीचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरतं. आता आपण घरबसल्या ही माहिती फोनवर ऑनलाईन पाहू शकतो, ती कशी हेच आपण आता सविस्तर जाणून घेऊया.

मनरेगाच्या कामांचं स्टेटस ऑनलाईन कसं पाहायचं?

सर्व प्रथम खालील लिंक वर क्लिक करून महात्मा गांधी नॅशनल रुरल इम्प्लॉयमेंटची वेबसाइट (नरेगा) ची वेबसाइट ओपन करा.

https://nrega.nic.in/netnrega/HomeGP.aspx

नरेगाची वेबसाइटओपन केल्यानंतर Panchayats(GP/PS/ZP) या पर्यायावर क्लिक करा.

Panchayats(GP/PS/ZP)
Panchayats(GP/PS/ZP)

त्यानंतर एका नवीन पेजवर तुम्हाला Gram Panchayats, Panchayat Samiti आणि Zilla Panchayats हे तीन पर्याय तुम्हाला दिसतील.

यांतील Gram Panchayat या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

 Gram Panchayat
Gram Panchayat

त्यानंतर एक नवीन रकाना तुमच्यासमोर ओपन होईल. यांतील दुसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे (जनरेट रिपोर्ट्स) Generate Reports – Job Card, Job Slip , MSR Register , Pending Works, UC यावर क्लिक करायचं आहे.

Generate Reports
Generate Reports

मग तुमच्यासमोर देशातल्या सगळ्या राज्यांची नावं ओपन होतील. यांतील महाराष्ट्र (MAHARASHTRA) या नावावर क्लिक केलं की, Gram Panchayat Module नावाचं नवीन पेज तुम्हाला तिथे दिसेल.

आता इथे सुरुवातीला फायनान्शियल ईयरमध्ये आर्थिक वर्ष निवडायचं आहे, त्यानंतर जिल्हा, तालुका आणि मग गाव निवडायचं आहे.

हे सगळं निवडून झालं की मग Prossed यावर क्लिक करायचं आहे.

 REPORTS
REPORTS

यानंतर Gram Panchayat Reports नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर R1, R2, R3, R4, R5, R6 असे रकाने दिलेले असतील.

यांतल्या R5. IPPE या रकान्यातल्या कामाची यादी(List of work) पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर Work Expenditure नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

List of work
List of work

इथं सुरुवातीला कामाचा वर्ग म्हणजेच प्रकार निवडायचा आहे. तुम्हाला गावातल्या सगळ्या कामांचं स्टेटस जाणून घ्यायचं असल्यास ALL हा पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर कामाची स्थिती (Work Status) या पर्यायासमोर तुम्ही नवीन कोणती काम सुरू आहेत, किती कामांना मंजुरी मिळाली, किती पूर्ण झाली हे पाहू शकता. पण जर ही सगळी माहिती एकदाच पाहायची असल्याने  मी ALL या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

शेवटी आर्थिक वर्ष (Financial Year) या रकान्यातील ALL या रकान्यांसमोर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या गावातील गेल्या काही वर्षांतील मनरेगाच्या कामांची यादी दिसून येईल.

Work - Expenditure
Work Expenditure

पण, समजा तुम्हाला 2020-21 या एकाच वर्षातील कामे पाहायची असेल तर आर्थिक वर्ष (Financial Year) समोर 2020-21 हा पर्याय निवडायचा आहे.

यानंतर तुमच्यासमोर एक टेबल ओपन होईल. यात सुरुवातीला कामाचं नाव, कामाचं स्टेटस, आर्थिक वर्ष, कामाचा प्रकार इत्यादी माहिती दिलेली असेल.

सदरील काम मंजूर झालं असेल तर अप्रूव्ह, सुरू असेल तर ऑनगोईंग आणि पूर्ण झालं असेल तर कम्प्लिटेड अशा प्रकारचं स्टेटस तिथं तुम्हाला पाहायला मिळेल.

हेही वाचा – महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा? जॉब कार्ड यादी मध्ये ऑनलाईन नाव तपासा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.