आपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा !

आपल्या गावातील शासकीय कामे जर होत नसतील, किंवा शासकीय योजना आपल्या पर्यंत पोचत नसतील, तर त्याची तक्रार कोठे करायची याची सविस्तर माहिती आपण येथे घेणार आहोत. या तक्रारीद्वारे शासकीय अधिकाऱ्यांना त्या तक्रारींचे निवारण करावेच लागते, व केलेल्या तक्रारीचा अहवालाची प्रत तुम्हाला पाठवावी लागते. ही तक्रार प्रणाली मुख्यमंत्री यांच्या देखरेखीखाली काम करते.

भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची ऑनलाईन तक्रार करण्याची प्रोसेस:

मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. ऑनलाईन तक्रार करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गूगल प्ले स्टोअर वरून “आपले सरकार” अँप इन्स्टॉल करा किंवा गूगल क्रोम वरून “आपले सरकार” ची खालील वेबसाईट ओपन करा.

आपले सरकार वेबसाईट किंवा मोबाईल अँप:

खालील महाराष्ट्र सरकारची आपले सरकार ही अधिकृत वेबसाईट ओपन किंवा किंवा अँप ओपन करा. मी इथे वेबसाईट ओपन करणार आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरती भाषा पर्यायामध्ये मराठी भाषा निवडा.

https://aaplesarkar.maharashtra.gov.in

Aaple Sarkar/App

पुढे तक्रार निवारण, माहितीचा अधिकार, माझे सरकार ,महा योजना असे पर्याय दिसतील त्यापैकी “तक्रार निवारण” या पर्यायावर क्लिक करा.

तक्रार निवारण
तक्रार निवारण

तक्रार निवारण या पर्यायावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र शासनाची तक्रार निवारण प्रणाली ओपन होईल त्यामध्ये “तक्रार दाखल करा” या पर्यायावर क्लिक करा

तक्रार दाखल करा
तक्रार दाखल करा

नागरिक लॉगिन:

आता नागरिक लॉगिन मध्ये मोबाईल क्रमांकइ-मेल टाईप करून Verify (सत्यापित) करा आणि तक्रार निवारण प्रणाली मध्ये लॉग-इन करा. कृपया तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर/ई मेल आयडी वर प्राप्त झालेल्या वन टाईम पासवर्डची (ओटीपी) नोंद करा.

नागरिक लॉगिन
नागरिक लॉगिन

तक्रार दाखल करा:

नावाची नोंद करा: इथे तुमचे नाव लिहा.

प्रशासन स्तर: गावातील शासकीय तक्रारींचे वेळेत आणि प्रभावी निराकरण होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरा संबधित तक्रारीसाठी प्रशासन स्तर मध्ये “जिल्हा” या पर्यायावर क्लिक करा. पुढे जिल्हातालुका निवडून प्रशासनाचा प्रकारा मध्ये “जिल्हा परिषद” निवडा.

तक्रार दाखल करा
तक्रार दाखल करा

तक्रारीचे स्वरूप:

तक्रारीचे स्वरुपा मध्ये गावातील विविध शासकीय कामे आणि योजना संबंधी तक्रारीसाठी खालील विविध तक्रारीचे स्वरुप पहा किंवा इतरही ग्रामपंचायत संबंधी तक्रारिचे स्वरूप निवडा.

1) ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना

2) ग्रामपंचायत प्रशासन- संबधित बाबी

3) जि.प. प्राथमिक नविन शाळांना मान्यता/वाढीने वर्गांना मान्यता

4) प्राथमिक शाळागृहांची/शैाचालय- दूरूस्ती

5) शालेय पोषण आहार बाबत

6) प्राथमिक शाळाविषयी इतर बाबी

7) माध्यमिक शाळाविषयी इतर बाबी

8) पाळणाघर चालविणे

9) अंगणवाडी इमारत / शौचालय बांधकाम

10) कुपोषित मुला-मुलींसाठी अतिरिक्त आहार.

11) जि.प.शाळेतील इ.5वी ते 7वी तील मुलींना सायकल पुरविणे

12) अंगणवाडी केंद्रातील मुला मुलींसाठी गणवेश पुरविणे

13) प्राथमिक उपचार, प्रतिबंधात्मक सेवा

14) रोगांचे प्रतिबंध व नियंत्रण कार्य

15) प्रजनन व बाल आरोग्य सेवा

16) आरोग्य व आहार विषयक शिक्षण

17) विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम

18) शालेय आरोग्य तपासणी/अंगणवाडी तपासणी.

19) मदत गट

20) इंदिरा आवास योजना

21) पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम

22) दारिद्र्य रेषेखाली असणार्‍या कुटुंबांकरीता कल्याणकारी योजना राबविने

23) कृषी संबधी

24) पाणीपुरवठा योजनेंतर्गत अस्तीत्वातील विहीरींचे रुंदीकरण व खोलीकरण/दुरुस्ती

25) नविन पाणी पुरवठा योजना

26) विंधन विहीर (हातपंप)

27) ग्रामीण रस्ते- मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व दुरुस्ती

28) तिर्थक्षेत्र/ पर्यटन विकास कार्यक्रम

29) स्मशानभुमी/ अंगणवाडी इमारत बांधकामे

30) अभिकरण (वि. प. स./ वि. स. स./डोंगरी/ खासदार निधी)

31) १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमतेचे पाझर तलाव, साठवण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे

32) जवाहर विहिरी

33) जनावरांना उपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया इ.

34) दलितवस्ती सुधार योजना

35) अपंगांना शाळा, मागास विद्यार्थींना शिष्यवृत्या, अनुदानित वसतिगृहे इ.

36) ग्रामीण भागातील बेरोजगार मुलीं व महिलां साठीच्या योजना

37) मुलींना स्वसंरक्षणा साठी व त्यांच्या शारीरिक विकासा साठी प्रशिक्षण योजना

38) महिलां साठी समुपदेशन केंद्र चालविणे

39) महिलांना कायदेशीर / विधी विषयक सल्ला देणे

40) विविध कामांच्या देयकांची रक्कम संबधितांना अदा करणे

41) कर्मचारी नेमणूका, पदोन्नती, जिल्हा बदल्या/नियतकालिक बदल्या इ.

42) जिल्हा परिषद मालकीच्या इमारतींचे देखभाल व दुरुस्ती

43 इतर

तुमची तक्रार: या पर्यायामध्ये तुमचे नाव, ग्रामपंचायत गावाचे नाव लिहून, वरील एका तक्रारीच्या स्वरूपा नुसार कमाल 2000 शब्दामध्ये तक्रारींचे विवरण करा.

तक्रारीचे स्वरूप
तक्रारीचे स्वरूप

प्रतिमा अपलोड करा: या पर्यायामध्ये तक्रारीचा प्रतिमा (फोटो) पुरावा म्हणून अपलोड करू शकता (फाईल्स २ एमबी पेक्षा कमी असाव्यात. मान्य फाईल प्रकार: png jpg jpeg.).

दस्तऐवज अपलोड करा: या पर्यायामध्ये तक्रारीच्या PDF फाईल पुरावा म्हणून अपलोड करू शकता (फाईल्स २ एमबी पेक्षा कमी असाव्यात.मान्य फाईल प्रकार: PDF.).

प्रतिमेतील कोड प्रविष्ट करा (केस सेन्सेटिव्ह): या पर्यायामध्ये वर दिलेला प्रतिमेतील कोड प्रविष्ट करा.

पुढे “”Preview“” वर क्लिक करून आपण करत असलेल्या तक्रारीचे पूर्वावलोकन पहा आणि योग्य “प्रशासन पातळी”, “प्रशासन प्रकार” आणि “तक्रारींचे स्वरूप” निवडलेली नसल्यास कृपया दुरुस्त (Edit) करा.

आपली तक्रार पूर्वावलोकन “Preview” मध्ये योग्य दिसत असेल तर तक्रारीची पुष्टी करण्यासाठी “Confirm & Submit” वर क्लिक करा.

प्रतिमा - दस्तऐवज अपलोड करा
प्रतिमा – दस्तऐवज अपलोड करा

सबमिट झाल्यावर तुमची तक्रार SAVE झाल्याचा आपल्याला एक टोकन मॅसेज येतो.

तक्रारीची स्थिती:

आपल्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करून तक्रार यादीतून तक्रार निवडा किंवा टोकन नंबर नोंदवा.

https://grievances.maharashtra.gov.in/mr/track-grievances-status

प्रलंबित तक्रारींबाबत संपर्क क्रमांक:

आपली तक्रार २१ दिवसांमध्ये निकाली न निघाल्यास शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०१६ दि २४ ऑगस्ट २०१६ मधील भाग- ब, अनु. क्र. ६ नुसार आपण संबधित नोडल अधिकाऱ्यांना विचारणा करू शकता, संपर्क क्रमांकासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://grievances.maharashtra.gov.in/mr/officers-contact

तक्रार दाखल करताना तांत्रिक सहाय्य हेल्पलाईन:

तक्रार दाखल करताना काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास कॉलसेंटर/हेल्पलाईनवर संपर्क साधा : 1800 120 8040.

हेही वाचा – माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन मोबाईलद्वारे माहिती मिळवण्यासाठी विंनती अर्ज कसा करायचा?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.