आपले सरकार - महा-ऑनलाईनबांधकाम कामगार कल्याणकारी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

बांधकाम कामगारांना मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा !

राज्यातील बांधकाम क्षेत्र हे अनेक मजुरांसाठी उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. या मजुरांचे जीवन अधिक सुलभ व्हावे, त्यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने “घरगुती वस्तूंचा संच योजना (MBOCWWB Household Item Kit)” सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या उपयोगासाठी स्वयंपाकघरात लागणाऱ्या भांडी, टोपली व अन्य वस्तूंचा संच मोफत वितरित केला जातो.

ही योजना राज्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाद्वारे राबवली जाते. आज आपण या योजनेचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत आणि घरबसल्या ऑनलाइन अर्ज कसा करायचा, याबद्दल टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणार आहोत.

बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा संच योजना – MBOCWWB Household Item Kit:

या योजनेचा मुख्य हेतू बांधकाम मजुरांच्या जीवनमानात सुधारणा करणे, त्यांना घरातील मूलभूत सुविधा पुरवणे आणि त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक भार कमी करणे हा आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू दिल्यामुळे मजुरांना वेगळी खरेदी करण्याची गरज राहत नाही आणि त्यामुळे बचतही होते.

कोण पात्र आहेत?

घरगुती वस्तूंचा संच (MBOCWWB Household Item Kit) योजना ही महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत मजुरांसाठीच आहे. यासाठी काही अटी आहेत:

  • कामगाराची BOCW (Building and Other Construction Workers) नोंदणी वैध असणे आवश्यक आहे.

  • अर्ज करताना नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.

  • नोंदणी केलेला मोबाईल नंबर कार्यरत असावा.

  • आधार क्रमांक आणि इतर वैयक्तिक माहिती बरोबर भरलेली असावी.

बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस – MBOCWWB Household Item Kit:

बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा (MBOCWWB Household Item Kit) संच योजनेसाठी अर्ज ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने करता येते:

टप्पा 1: नोंदणी क्रमांक मिळवा:

बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा (MBOCWWB Household Item Kit) संच योजनेसाठी नोंदणी क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://iwbms.mahabocw.in/profile-login

पोर्टल ओपन केल्यनानंतर आपला आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि ‘Proceed to Form’ वर क्लिक करा.

MBOCWWB Registration Number
MBOCWWB Registration Number

आता तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो टाकून ‘Validate OTP’ करा. पुढे तुमचा BOCW नोंदणी क्रमांक मिळेल, तो कॉपी करून किंवा लिहून ठेवा.

टप्पा 2: कामगार – वैयक्तिक तपशील:

नोंदणी क्रमांक भेटल्यानंतर आता वैयक्तिक तपशील भरण्यासाठी खालील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://hikit.mahabocw.in/appointment

पोर्टल ओपन केल्यनानंतर  “कामगार – वैयक्तिक तपशील” हे पेज उघडेल. मिळवलेला नोंदणी क्रमांक टाका.

MBOCWWB Worker Personal Details
MBOCWWB Worker Personal Details

नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर ‘बाहेर क्लिक’ करा म्हणजे आपली सर्व माहिती आपोआप भरली जाईल.

पुढे Select Camp / शिबिर निवडा – आपल्याजवळील केंद्र निवडा आणि Appointment Date निवडा – उपलब्ध तारीख निवडा.(सूटीच्या दिवशी किंवा फुल्ल झालेल्या स्लॉटवर नियुक्ती मिळणार नाही.)

टप्पा 3: स्वघोषणपत्र अपलोड करा
  1. तुमचे Self Declaration Form डाउनलोड करून प्रिंट काढा आणि सर्व आवश्यक तपशील भरून स्कॅन करा किंवा मोबाईलने फोटो काढा.

  2. स्कॅन किंवा मोबाईलने स्व-घोषणापत्राचा फोटो काढलेला ऑनलाइन फॉर्ममध्ये स्व-घोषणापत्र फाईल अपलोड करा.

टप्पा 4: अपॉइंटमेंट प्रिंट घ्या
  1. पुढे ‘PRINT APPOINTMENT’ वर क्लिक करा.

  2. दिलेल्या तारखेचा अपॉइंटमेंट स्लिप प्रिंट करून ठेवा.

  3. निवडलेल्या दिवशी संबंधित शिबिरात उपस्थित राहा आणि घरगुती वस्तूंचा संच (MBOCWWB Household Item Kit) प्राप्त करा.

घरगुती वस्तूंच्या संचात काय-काय मिळते? (MBOCWWB Household Item Kit):

योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वस्तूंमध्ये खालील वस्तूंचा समावेश असतो. वस्तूंची यादी शिबिर व जिल्ह्यानुसार थोडीफार बदलू शकते:

  • स्टीलचे भांडे सेट

  • तांब्याचे किंवा स्टीलचे ताट, वाटी, गिलास

  • मोठी आणि लहान टोपली

  • डब्बे, झाकण, करंडी

  • स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इतर वस्तू

महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा.

  • नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक बरोबर असणे आवश्यक आहे.

  • अपॉइंटमेंटची प्रिंट घेऊनच शिबिरस्थळी जा.

  • दिलेल्या दिवशी वेळेत उपस्थित राहा.

योजना का उपयुक्त?

  • दैनंदिन गरजेच्या वस्तू मोफत मिळतात.

  • मजुरांचे आर्थिक बचत होते.

  • शासनाकडून थेट मदतीचा लाभ मिळतो.

  • योजनेचा अर्ज सहज ऑनलाइन करता येतो.

घरगुती वस्तूंचा संच (MBOCWWB Household Item Kit) योजना ही बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नाही, तर एक प्रकारचा सन्मान आहे त्यांच्या कष्टाचा. आपण अथवा आपल्या ओळखीतील कोणी बांधकाम क्षेत्रात काम करत असल्यास, त्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि या योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करा.

जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा अर्ज करताना अडचण येत असेल, तर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील कामगार कल्याण अधिकारी किंवा शिबिर कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

या लेखात, आम्ही बांधकाम कामगारांना मोफत घरगुती वस्तूंचा संच (MBOCWWB Household Item Kit) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील लेख देखील वाचा !

  1. बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप सुधारित योजना
  2. बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर!
  3. बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा नोंदणी अपडेट!
  4. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा जाणून घ्या सविस्तर.
  5. ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देऊन नोंदणी करणेबाबत शासन नियम
  6. UMANG पोर्टल वरून असे बनवा ई-श्रम यूएएन कार्ड !
  7. ई-श्रम यूएएन कार्डसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी!
  8. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
  9. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना
  10. अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण!
  11. अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य !
  12. बांधकाम कामगारांनी अमिषाला बळी पडू नये; कामगार मंडळाचे आवाहन !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.