बांधकाम कामगारांनी अमिषाला बळी पडू नये; कामगार मंडळाचे आवाहन !
बांधकाम कामगारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता नोंदणी व नुतनीकरण करुन घ्यावे, फसवणूक झाल्यास कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. तसेच अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नजिकच्या पोलिस ठाण्यात परस्पर तक्रार नोंदवावी, असे आवाहन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटित कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजनांच्या लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे ऑनलाईन पद्धतीने केले जाते.
या कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी अथवा एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आली नाही. संबंधित कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक एक रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. त्याची रीतसर पावती देण्यात येते. या व्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कळविले आहे.
हेही वाचा – बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!