जिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना; ९०% अनुदानावर १० शेळ्या १ बोकड

राज्यात शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना सुरु करून ९०% अनुदानावर १० शेळ्या व १ बोकड असा शेळीगट वाटपासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.

ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना; ९०% अनुदानावर १० शेळ्या १ बोकड:

योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ:

  • उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग घरातील अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या व १ बोकड असा शेळीगट वाटप करण्यात येईल.
  • एकूण रक्कम रु. ६६०००/
  • लाभार्थी साठी ९० % शासन हिस्सा ( रु ५९ , ४००/-) व १० % लाभार्थी हिस्सा ( रु. ६६००/-)

पात्रता:

  • अनुसूचित जाती जमाती साठी
  • दारिद्र्य रेषे खालील लाभार्थी
  • अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर पर्यन्त भूधारक)
  • महिलां लाभार्थीनाच प्राधान्य.
  • लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
  • अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी / लोकप्रतिनिधी नसावा.

अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती:

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी १०/१२/२०२२ ते २५/१२/२०२२ पर्यंत.

योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM); शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

One thought on “ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना; ९०% अनुदानावर १० शेळ्या १ बोकड

  • शेख Y स

    अहिल्या शेळी योजना
    महिला अल्पबुधारक दाखला आहे . अर्ज करू शकते का.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.