नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना – Health Scheme for Registered bandhkam kamgar
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत योजनांचा लाभ घेण्याकरिता वय वर्षे १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. इमारत व इतर बांधकामाच्या व्याख्येत २१ कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना – Health Scheme for Registered bandhkam kamgar:
- नोंदित लाभार्थी स्त्री व पुरुष बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५ हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २० हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य.
- लाभार्थी कामगार व त्याच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ १ लाख रुपये एवढे वैद्यकीय सहाय्य.
- नोंदित लाभार्थी कामगार अथवा त्याच्या पती किंवा पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुदत बंद ठेव.
- नोंदित लाभार्थी कामगारास ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास २ लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य. तथापि, नोंदीत बांधकाम कामागाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ अनुज्ञेय.
- व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरीता ६००० रुपये अर्थसहाय्य.
ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- छायाचित्र ओळख पुराव्यासाठी आधारकार्ड, पारपत्र, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी एक.
- रहिवासी पुराव्यासाठी आधारकार्ड, पारपत्र, वाहनचालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याचे वीज देयक, ग्रामपंचायत दाखला यापैकी एक.
- वयाबाबतचा पुरावा आधारकार्ड, पारपत्र, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक. (पूर्ण जन्मतारीख नमुद असणे आवश्यक).
- स्वयंघोषणापत्र.
- आधार संमतीपत्र.
- मागील वर्षात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याबाबत नियोक्त्याचे, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगरपालिकाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
- बँक पासबुकची छायांकित प्रत.
संपर्क: बांधकाम कामगारांनी अधिक माहितीसाठी नोंदणी करण्याकरिता येथे क्लिक करा आणि योजनेच्या लाभाचा अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा. तसेच अपर जिल्हा कामगार आयुक्त, येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक : (022) 2657-2631 ई-मेल : info@mahabocw.in
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!