सरकारी योजनाबांधकाम कामगार कल्याणकारी योजनावृत्त विशेष

बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा जाणून घ्या सविस्तर

बांधकाम व इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठया असंघटित वर्गात येतात. कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तींचे नियमन करण्याच्या उद्देशानें तसेच सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने , भारत सरकारने “इमारत व इतर बांधकाम कामगार”(रोजगार व सेवाशर्ती नियमन) कायदा १९९६ ची तरतूद केली आहे. या कायद्याअंतर्गत राज्य सरकारने “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार” (रोजगार व सेवा शर्तीचे नियमन) २००७ देखील मंजूर केले. ह्या कायद्यान्वये महाराष्ट्र शासनानेसुद्धा “महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन ) अधिनियम ” पारित केला. ह्या अधिसूचनेनुसार सुरवातीस महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना ५ शासन प्रतिनिधी नेमून करण्यात आली.

अधिनियम २०११ ,२०१५ व २०१८ नुसार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली व त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्यात आले. मंडळात अध्यक्ष तसेच शासन, मालक व कामगार यांचे प्रत्येकी ३ प्रतिनिधी मंडळात घेण्यात घेण्यात आले. नियम ३५ (१) नुसार मंडळाचा कार्यकाळ ३ वर्षाचा आहे. मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. मागील लेखामध्ये आपण बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते सविस्तर पाहिले आहे. या लेखामध्ये आपण बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा ते सविस्तर पाहूया.

बांधकाम कामगार कल्याणकारी योजना:

1. सामाजिक सुरक्षा योजना:

>
 • पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु ३०,०००/
 • मध्यान्ह भोजन योजना
 • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
 • आवश्यक अवजारे खरेदीसाठी रु. ५०००/
 • प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
 • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
 • पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
 • सुरक्षा संच पुरवणे
 • अत्यावश्यक संच पुरवणे

2. शैक्षणिक योजना:

 • इयत्ता १ ते ७ विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. २५००/
 • इयत्ता ८ ते १० विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. ५०००/
 • इयत्ता १० ते १२ विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. १०,०००/
 • पदवी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. २०,०००/
 • वैद्यकीय पदवी विद्यार्थ्यांसाठी रु. १,००,०००/
 • अभियांत्रिकी पदवी विद्यार्थ्यांसाठी रु ६०,०००/
 • पदविकेमध्ये प्रतिवर्षी रु २०,०००/
 • पदव्युत्तर पदविकेमध्ये प्रतिवर्षी रु २५,०००/
 • MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती

3. आरोग्यविषयक योजना:

 • नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/
 • शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी २०,०००/
 • गंभीर आजाराच्या उपचारार्थ १,००,०००/
 • एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १,००,०००/ मुदत ठेव
 • कायमचे अपंगत्व आल्यास रु. २,००,०००/
 • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
 • आरोग्य तपासणी करणे

4. आर्थिक योजना:

 • कामगार कामावर असताना मृत्यू झाल्यास रु. ५,००,०००/(कायदेशीर वारसास)
 • कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु. २,००,०००/(कायदेशीर वारसास)
 • अटल बांधकाम कामगार आवास योजना रु. २,००,०००/
 • कामगाराचा मृत्यू झाल्यास अंतविधीकरिता रु. १०,०००/
 • कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रु. २४,००००/
 • घर खरेदी किंवा घरबांधणी करीता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम रु. ६,००,०००/ अथवा रु. २,००,०००/ अनुदान

बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) करण्याची प्रोसेस:

वरील विविध बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) करण्यासाठी सर्व प्रथम खालील लिंक वर क्लिक करा.

mahabocw.in

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची पोर्टल ओपन केल्यानंतर वरती पहिल्यांदा आपली मराठी भाषा निवडा. नंतर खालील “बांधकाम कामगार: दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.

बांधकाम कामगार: दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा
बांधकाम कामगार: दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा

आता “Select Action” या बॉक्स मध्ये दोन पर्याय दिसतील १) New Claim २) Update Claim त्यामध्ये नवीन मागणी अर्ज करण्यासाठी New Claim हा पर्याय निवडून नोंदणी नंबर टाका आणि “Proceed to Form” या पर्यायावर क्लिक करा. नंतर रजिस्टर मोबाईल वर ओटीपी येईल तो टाकून Validate करा.

New Claim
New Claim

तुम्ही अगोदरच बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मागणी अर्ज केला असेल आणि तुमच्याकडे त्याचा Acknowledgement नंबर असेल तर तुम्ही तो मागणी अर्ज अपडेट करण्यासाठी “Update Claim” हा पर्याय निवडा.

पुढे अर्जदाराचा तपशील दिसेल, त्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणी सक्रिय असणे गरजेचं आहे. पुढे बांधकाम कामगार कल्याणकारी “योजना श्रेणी आणि योजना” निवडा.

बांधकाम कामगार कल्याणकारी “योजना श्रेणी आणि योजना” निवडल्या नंतर मागणी अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

हेही वाचा – बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.