सरकारी कामेआपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेष

लहान मुलांचे आधार कार्ड कसे बनवाल? काय आहेत कागदपत्रे ? जाणून घ्या सविस्तर

आधार कार्ड हे आजकाल सर्वांसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे लहान मुलांचेही आधार कार्ड जरूर बनवले पाहिजे. जर तुमच्या मुलांचे आधार कार्ड बनवलेले नसेल तर तुम्हाला अनेक ठिकाणी अडचणी येऊ शकतात. नवीन शाळेसाठी मुलांची प्रवेश प्रक्रिया सुरु होताना, पालकांना त्याबाबतची पळापळ देखील सुरु करावी लागते. कारण त्यासाठी अनेक कागदपत्रांची देखील आवश्यकता पडणार आहे. ज्यामधील एक आधार कार्ड देखील आहे. यामुळेच सध्या UIDAI ने लहान मुलांचे आधार बनवता येईल असे एप्लिकेशन सुरु केले आहे.

लहान मुलांचे आधार कार्ड बनवण्याचे फायदे:

 • आधार कार्ड हे मुलांचे ओळखपत्र म्हणून काम करेल. लहान मुलांचे ड्रायव्हिग लायसन्स किंवा मतदान कार्ड बनत नाही. त्यामुळे आधार कार्डच लहान मुलांचे ओळखपत्र असते.
 • शाळेत देखील आता प्रवेशासाठी आधार नंबर मागितला जातो. ज्या मुलांचे आधारकार्ड नसेल त्यांना शाळेतून देखील विशिष्ट कालावधित आधारकार्ड बनवण्यास सांगितले जाते.
 • शिष्यवृत्तीसारख्या अन्य योजनांसाठी देखील आधार कार्डची आवश्यकता असते.
 • लहान मुलांच्या नावे बॅंकेत बचत खाते उघडण्यासाठीही आधार कार्ड जरूरी असते.

5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी खालील कागदपत्र लागतात:

 • जन्म प्रमाणपत्र किंवा हाॅस्पिटलने दिलेले डिस्चार्ज कार्ड.
 • आई किंवा वडिल यांपैकी एकाचे आधार कार्ड.

5 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांच्या आधारकार्डसाठी कागदपत्र:

 • बर्थ सर्टिफिकेट, स्कूल आयडी (शाळेचे लेटर हेड), किंवा व्हॅलिड प्रुफ आयडी,
 • आई- वडिलांचे आधार कार्ड

मुलांच्या आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता.

सूचना –

 • 5 वर्षाखालील मुलांचे बायोमट्रिक डिटेल्स घेतल्या जात नाहीत, केवळ फोटो घेतला जातो.
 • मुलं जेव्हा पाच वर्षाचे होईल त्यानंतर बायोमेट्रिक डिटेल्स घेतल्या जातात.
 • मुलं मोठी झाल्यावर बायोमेट्रिक्स मध्ये बदल होतात. त्यामुळे मुलं जेव्हा 15 वर्षाचे होईल तेंव्हा डिटेल्स अपडेट करणे गरजेचे असते.
 • लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेशन मोफत आहे. बायोमेट्रिक अपडेशनसाठी कोणतेही कागदपत्र लागत नाही.

हेही वाचा – आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Aadhaar PVC card)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.