इंडिया पोस्ट ऑफिस विमा योजना; २९९ आणि ३९९ रुपयांच्या हप्त्यात दहा लाखांचे विमा कवच!
भारतीय डाक विभागाने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करून प्रति वर्ष २९९ किंवा ३९९ च्या हप्तामध्ये विमाधारकास दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले आहे. टपाल विभागाने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही नवीन योजना आणली आहे.
ही योजना १८ ते ६५ वयांतील व्यक्तीसाठी आहे. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी पोस्टमन व आवश्यक असणारे कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांना या योजनेत सहभागी करून घेतील.
ज्यामध्ये व्यक्ती फक्त २९९ किवा ३९९ रुपयांच्या हप्तामध्ये एका वर्षात १० लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवू शकतात. यामध्ये विमाधारकाचा करता अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल. याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास ६० हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास ३० हजार रुपयांपर्यंतचा दावादेखील येईल. त्याचबरोबर रुग्णालयाच्या खर्चासाठी १० दिवस तुम्हाला प्रति दिन एक हजार रुपयेदेखील मिळतील.
कुटुंबाला वाहतुकीसाठी २५ हजार रुपयांपर्यंतचा खर्चदेखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.
- अपघाती मृत्यु – 10 लाख
- कायमचे अपंगत्व – 10 लाख
- दवाखान्याचा खर्च – 60 हज़ार रुपये
- मुलाच्या शिक्षनासाठी खर्च – 1 लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त 2 मुलाना )
- अड्मिट असेपर्यंत दररोज़ – 1,000 रुपये (10 दिवस)
- OPD खर्च – 30000
- अपघाताने पॅरालीसीस झाल्यास – १० लाख
- कूटुंबाला दवाखाना प्रवासखर्च – 25000
२९९ व ३९९ च्या पॉलिसी मधील फरक:
या दोन्ही योजना सारख्याच असून, ३९९ च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना १ लाखांपर्यंतची मदतही शिक्षणासाठी मिळू शकते. त्याचबरोबर अपघातानंतर दवाखान्यात येण्या जाण्यासाठी कुटुंबीयांना १० दिवसांपर्यंत प्रतिदिन १ हजार रुपये मिळतात.
वाहतूक खर्च २५ हजार व मृत्यूनंतर ५ हजार अंत्यसंस्कार खर्च मिळेल, पण हे २९९च्या योजनेला शिक्षण खर्च, प्रतिदिन १ हजार, वाहतूक खर्च २५ हजार व अंत्यसंस्कार खर्च ५००० लागू नाहीत.
योजनेचा कालावधी :
या योजनेचा कालावधी हा एक वर्षांचा असून एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी विमा योजनेचे तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नूतनीकरण करावे लागेल.
असा करा अर्ज
तुम्हालाही या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही नव्याने खाते काढून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
योजना टाटा एआयजीने सुरु केली असून, टपाल खात्याने त्यांच्याशी करार केला आहे. देशभरात काही लाखांच्यावर विमाधारक जोडले गेले आहे.
यांना ही योजना लागू नाही:
१. साहसी खेळांमध्ये सहभाग (बंजी जंपिंग, स्कीइंग, रेसिंग, इ.)
२. लष्कर, नौदल, हवाई आणि पोलीस दलातील व्यक्ती
३.आरोग्यासंदर्भात असलेली कोणतीही पूर्व विद्यमान स्थिती, आजार, अपंगत्व इत्यादीमुळे झालेला अपघात.
४. उपचार करणारे डॉक्टर, जे स्वतः विमाधारक व्यक्ती असेल किंवा या पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबाचा जवळचा सदस्य असेल.
५. आत्महत्या, ड्रग्ज, अल्कोहोल किया इतर मादक पदार्थाच्या सेवनाने झालेला अपघात.
६. बाळंतपणामुळे किंवा गर्भधारणेमुळे होणारे कोणतेही नुकसान.
७. प्रत्यक्ष केलेल्या किवा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यातील सहभाग, उदा. दंगल, गुन्हा, गैरवर्तन,
८. कोणत्याही विमान किंवा विषारी, स्फोटक इतर – असलेल्या व्यवसायातील कर्मचारी.
९. वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसताना रुग्णालयात घेतलेला उपचार.
१०. कोणत्याही ड्रायव्हिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, (व्यावसायिक ड्रायव्हर्स)
११. ऑस्टियो पोरोसिसमुळे (हाडांचा ठिसूळपणा) होणारे कोणतेही नुकसान.
१२. खाण कामगार, बांधकाम कामगार.
संपर्क: 155299
ईमेल: contact@ippbonline.in
हेही वाचा – पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना – Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!