वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनसरकारी कामे

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अकाउंटचे केवायसी अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !

आपण या लेखामध्ये आपल्या ईपीएफ अकाउंट मध्ये ऑनलाईन केवायसी (PF KYC Update) कशी अपडेट करायची याची सविस्तर माहिती घेणार आहोत. आता नोकरदारांसाठी प्रोव्हिडंट फंडामधून पैसे काढणं सोपं झालंय, याचं मुख्य कारण तुम्ही ऑनलाईन पीएफ क्लेम करू शकता. पण अजून तरी 50 टक्के कर्मचाऱ्यांनी आपली KYC युनिव्हर्सल नंबराला ( UAN ) जोडलेली नाही. त्यामुळे पीएफ खाताधारक EPFO चा ऑनलाईन सेवेचा फायदा घेऊ शकणार नाही. सरकारनं ईपीएफओच्या सीमेत येणाऱ्या कंपनीज आणि संस्थांच्या पीएफधारकांना केवायसी (PF KYC Update) 100 टक्के पूर्ण करायला सांगितलंय.

आपले ज्या खात्यामध्ये PF चे पैसे आहेत त्याची जर केवायसी (PF KYC Update) पूर्ण झालेली असेल तर त्यात PF चे पैसे लगेच ट्रान्सफर होणार आहेत. जर PF खात्यामध्ये बँक डिटेल्स नसतील, तर Claim Request रद्द होऊ शकते. तसेच केवायसी (PF KYC Update) पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला SMS द्वारे कुठलाही अलर्ट मिळणार नाही.

भविष्य निर्वाह निधी अकाउंटचे केवायसी अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस – PF KYC Update:

केवायसी (PF KYC Update) अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम ईपीएफओ युएएन पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जाऊन तुम्ही लॉगिन करा.

लॉगिन करण्यासाठी तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करायचे आहे. पहिल्यांदाच लॉगिन करत असाल तर UAN नंबर ऍक्टिव्हेट करावा लागेल.

केवायसी अपडेट (PF KYC Update) करताना Manage टॅब मध्ये खालील पर्याय मध्ये बदल करायचा आहे.

  • Basic Details
  • Contact Details
  • KYC
मूलभूत तपशील सुधारित करा:
  • जर तुम्हाला आधार नंबर ,नाव ,जन्म तारीख ,लिंग व कंपनीचे नाव यामध्ये बदल कसा करायचा असेल तर Manage या ऑपशन वर जाऊन Basic Details ऑपशन वर क्लिक करा.
  • यामध्ये तुम्ही आधार नंबर ,नाव ,जन्म तारीख ,लिंग व कंपनीचे नाव यामध्ये बदल करू शकता.
  • सर्व माहिती टाकल्यावर Update या ऑपशन वर क्लिक करा व नंतर जो Confirmation Massage येईल तिथे Yes वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमची माहिती व्हेरिफाय होईल.
संपर्क तपशील बदला:

जर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि मेल ID अपडेट करायचा असेल तर पुन्हा Manage या ऑपशन वर जाऊन Contact Details या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

तिथे तुम्हाला Change Mobile NumberChange Mail id वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि मेल id टाकायचा आहे. व Get Authorization Pin वर क्लिक करा व OTP नंबर टाका.

त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID अपडेट होतील.

पूर्ण केवायसी अपडेट कशी करायची? (PF KYC Update):
  • पूर्ण केवायसी (PF KYC Update) अपडेट करण्यासाठी पुन्हा Manage या ऑपशन वर जाऊन KYC या ऑपशन वर क्लिक करा.
  • पॅन, आधार, बँक अकाउंट या सेक्शनमध्ये जाऊन एक एक पर्यायावर क्लिक करा.
  • तुमची माहिती भरा आणि सबमिट करा.
  • तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होईल ते पडताळून पाहायला तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सांगू शकता.
  • ते व्हेरिफाय झालं की ऑनलाईन सुविधा सुरू होईल.

युएएनशी संबंधित केवायसी (PF KYC Update) मध्ये आधार नंबर, बँक अकाउंट नंबर, पॅन आणि मोबाइल नंबर लागतो. जेव्हा PF खातेधारक केवायसी युएएनसोबत लिंक करतो, तेव्हा PF संबंधी माहिती मोबाइलवर मिळवू शकतो. केवळ आधार कार्ड, पॅन यासारख्या सत्यापित केवायसीची सेवा कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी विचारात घेण्यात येईल. तुम्हाला PF काढायचा असेल आणि केवायसी (PF KYC Update) अपडेट असेल तर 3 दिवसांत पैसे मिळू शकतात.

पुढील लेख देखील वाचा!

  1. ईपीएफओ पोर्टल वरून यूएएन (UAN) नंबर कसे सक्रिय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
  2. आपले ईपीएफ पासबुक (EPF Passbook) कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
  3. भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन कसा काढावा? जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस (PF-Provident Fund)
  4. ईपीएफ मध्ये ई-नामांकन कसे जोडावे? जाणून घ्या सविस्तर माहिती – Add E-Nomination in EPF
  5. भविष्य निर्वाह निधी अकाऊंट संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
  6. EPFO : जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्ड आता अग्राह्य ‘कर्मचारी भविष्य निर्वाह’ चा निर्णय !
  7. EPFO New Rule 2024 : आता तुमच्या पीएफ खात्यातून ५० हजारांऐवजी १ लाखांपर्यंत अँडव्हान्स पैसे काढू शकता !
  8. भविष्य निर्वाह निधी – पीएफ देत आहे ७ लाख रुपयांचे विमा संरक्षण, जाणून घ्या सविस्तर माहिती !
  9. PF Loyalty Bonus : EPFO तर्फे खातेधारकांना मिळणार ५० हजार रुपयांचा बोनस !
  10. भविष्य निर्वाह निधीवर 8.25% दराने व्याजदर देण्याचा विश्वस्त मंडळाचा निर्णय
  11. भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यातून मिळणारे व्याजच्या नवीन आयकर नियमामध्ये मोठा बदल
  12. पीएफ सदस्याचे सदस्य प्रोफाइल अपडेट किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी ऑनलाइन फाइलिंगसाठी नवीन सॉफ्टवेअर कार्यप्रणालीचा प्रारंभ !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.