EPFO : जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्ड आता अग्राह्य ‘कर्मचारी भविष्य निर्वाह’ चा निर्णय !
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे जाहीर केले आहे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारल्या जाणाऱ्या वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड वगळण्यात आले असून, आता ‘ईपीएफओ’ (EPFO) मध्ये जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारऐवजी दूसरा पुरावा द्यावा लागणार आहे. आधार कार्ड जारी करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (यूआयडीएआय) सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्ड आता अग्राह्य ‘कर्मचारी भविष्य निर्वाह’ चा निर्णय ! EPFO :
‘ईपीएफओ – EPFO’ ने नुकतेच एक परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे. या परिपत्रकाला केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडून मंजुरी मिळाली आहे. अलीकडे काही न्यायालयांनी दिलेल्या निकालांमध्येही जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे. ‘ईपीएफओ’ (EPFO) च्या परिपत्रकानुसार आधार कार्डच्या साह्याने जन्मतारखेची पडताळणी केली जाऊ शकते, मात्र ते जन्मतारखेचा पुरावा ठरत नाही.
‘ईपीएफओ’ कडे जन्मतारखेतील दुरुस्तीसाठी आता जन्म प्रमाणपत्र, सरकारी मंडळाकडून किंवा विद्यापीठाकडून मिळालेली गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळा बदलीचा दाखला आदी कागदपत्रे वापरता येणार आहेत. त्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.
वैध कागदपत्रे:
- कोणत्याही मान्यताप्राप्त सरकारी मंडळाने किंवा विद्यापीठाने जारी केलेली गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला / शाळा हस्तांतर प्रमाणपत्र (टीसी)/ नाव आणि जन्मतारीख असलेले एसएससीचे प्रमाणपत्र
- सेवा नोंदींवर आधारित प्रमाणपत्र
- पॅन कार्ड, पासपोर्ट
- केंद्रीय राज्य सरकारची पेन्शन पेमेंट ऑर्डर
- शासनाने जारी केलेले अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल)
- सरकारी पेन्शन
- सिव्हिल सर्जनने जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र
हेही वाचा – आपले ईपीएफ पासबुक (EPF Passbook) कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!