कृषी योजनाजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

Crop Insurance Claim : नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग पीक विम्याचा दावा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास नुकसान भरपाई मिळू शकते !

केंद्र सरकारने वादळ, पूर, गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY)’ सुरू केलीय आणि नुकताच प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२२ व रब्बी २०२२-२३ हंगामासाठी लागू करण्याबाबत नवीन शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.

या योजनेसाठी शेतकऱ्यांना कमी आणि एकसारखा प्रीमियम भरून नुकसान भरपाई मिळते. प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) पेरणीच्या आधीपासून ते पिकाच्या काढणीनंतरही संरक्षण देते. या योजनेत पेरणीपासून काढणीपर्यंतच्या हंगामात कोणत्याही नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळते.

पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई कशी मिळवायची? (Crop Insurance Claim)

प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत विम्याचा दावा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी शेतकरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकारे अर्ज करु शकता, तसेच जिल्ह्या नुसार विमा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर फोन करू शकता आणि ईमेल देखील करू शकता.

१) समाविष्ट जिल्हे: अहमदनगर , नाशिक , चंद्रपूर/ जालना , गोंदिया , कोल्हापूर: नियुक्त केलेली विमा कंपनी – एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं . लि . पत्ता : एचडीएफसी हाऊस , पहिला मजला , १६५ १६६ बॅकबे रिक्लेमेशन , एचटी पारेख मार्ग , चर्चगेट , मुंबई- ४०००२० टोल फ्री क्र . १८००२६६०७०० ई – मेल : prmfby.maharashtra@hdfcergo.com

२) समाविष्ट जिल्हे: सोलापूर , जळगाव , सातारा, औरंगाबाद , भंडारा , पालघर , रायगड, वाशिम , बुलडाणा , सांगली , नंदुरबार, यवतमाळ , अमरावती , गडचिरोली, उस्मानाबाद, लातुर: नियुक्त केलेली विमा कंपनी – भारतीय कृषि विमा कंपनी पत्ता : मुंबई क्षेत्रिय कार्यालय , स्टॉक एक्सेंज टॉवर्स , २० वा मजला , दलाल स्ट्रीट , फोर्ट , मुंबई – ४०००२३ टोल फ्री क्र . : १८००४१ ९ ५००४ ई – मेल : pikvina@aloofindia.com

३) समाविष्ट जिल्हे: परभणी , वर्धा , नागपूर हिंगोली , अकोला , धुळे , पुणे: नियुक्त केलेली विमा कंपनी – आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कं . लि . पत्ता : माणिकचंद आयकॉन , ३ रा मजला , प्लॉट नं . २४६ , सी विंग , बंडगार्डन , पुणे- ४११००१ टोल फ्री क्र . : १८००१०३७७१२  ई – मेल : customersupportba@icicilombard.com

४) समाविष्ट जिल्हे: नांदेड , ठाणे , रत्नागिरी , सिंधुदुर्ग – नियुक्त केलेली विमा कंपनी – युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं . लि . – पत्ता : क्षेत्रिय कार्यालय , २ रा मजला , काकडे बीझ आयकॉन , ई – स्क्वेअर जवळ , गणेशखिंड रोड , शिवाजीनगर , पुणे ४११०१६ टोल फ्री क्र . १८००२३३५५५५ ई – मेल : pmfbypune@ulic.co.in

५) समाविष्ट जिल्हे: बीड – नियुक्त केलेली विमा कंपनी – बजाज अलायन्झ जनरल इंन्शुरन्स कं . लि . पत्ता : कॉमर झोन , १ ला मजला , सम्राट अशोक पथ , जेल रोड , येरवडा , पुणे ४११००६ टोल फ्री क्र . : १८००२० ९ ५ ९ ५ ९ – ई – मेल : bagichelp@bajajallianz.co.in

पीक विम्याचा दावा करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा:

 • पावसात खंड पडल्यास विमा मिळणार नाही.
 • कीड व रोगांमुळे नुकसान झाल्यास विमा मिळणार नाही.
 • विमा भरण्याची तारीख सगळ्यात महत्त्वाची
 • नुकसान झाल्यानंतर 72 तासांची मुदत

पीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ७२ तासात माहिती देणं आवश्यक (Crop Insurance Claim):

भारतीय कृषी विमा कंपनीने या विमा योजनेबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. या विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटानंतर ७२ तासाच्या आत संबंधित कंपनीला नुकसान झाल्याची माहिती द्यावी लागेल.

वादळ, भूस्खलन, पूर, गारपीट, नैसर्गिक आग, ढगफुटी यामुळे उभ्या पिकाचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या पिक विम्यातून नुकसान भरपाईसाठी दावा करता येईल. चक्रीवादळ, बेमोसमी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकाच्या काढणीनंतरही नुकसान झालं तरी या विम्याचं संरक्षण मिळतं. दोन्ही परिस्थितीत शेतकऱ्यांना ७२ तासाच्या आत कंपनीला माहिती देणं बंधनकारक आहे.

शेतकऱ्यांना ७२ तासाच्या आत विमा कंपनीला पीक नुकसान भरपाई माहिती देण्यासाठी चार पर्याय उपलब्ध:

 1. केंद्र सरकारच्या पीक विम्याच्या मोबाईल अॅप्लिकेशनवर नुकसानीची माहिती नोंदवता येते.
 2. समजा शेतकऱ्याकडे मोबाईल नसेल तर विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर ही माहिती नोंदवता येते.
 3. तेही शक्य नसेल तर विमा कंपनीच्या तालुका कार्यालयात जाऊन तिथं सूचना फॉर्म भरता येतो.
 4. तेही शक्य नसल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा ज्या बँकेतून विम्याची रक्कम भरलीय, त्या बँकेत ही माहिती देता येते.

पीक विम्याच्या मोबाईल पीक विमा अ‍ॅपवर नुकसानीची माहिती नोंदवा – Crop Insurance App:

शेतकऱ्यांनी झालेल्‍या पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीस देणे गरजेचे आहे. त्‍यासाठी पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्‍ले स्‍टोअर वरुन Crop Insurance App डाउनलोड करा किंवा खालील लिंकवर क्लिक करून मोबाईल मध्ये Crop Insurance App डाउनलोड करा आणि यामध्‍ये आपल्‍या नुकसानीची माहिती भरु शकता.

https://play.google.com/store/apps/Crop_Insurance

पीक विमा अ‍ॅपची वैशिष्ट्ये: (Crop Insurance App)

 • आपले धोरण तपशील पहा.
 • स्वतःच्या धोरणांचे पीडीएफ डाउनलोड करा.
 • अर्ज करण्यापूर्वी प्रीमियमची गणना करण्यासाठी विमा प्रीमियम कॅल्क्युलेटर.
 • प्रत्येक चरणावर अनुप्रयोगाची स्थिती तपासा.
 • पीक तोट्याची माहिती.
 • समस्यांना सबमिट करण्यासाठी डेस्कला मदत करा.
 • सामान्य प्रश्न.

Crop Insurance App ओपन झाल्यावर प्रथम “Change Language” या पर्ययावर क्लिक करून आपली मराठी भाषा निवडा आणि त्यामध्ये लॉगिन करण्यासाठी तीन पर्याय आहेत. १) शेतकरी म्हणून नोंदणी करा २) पॉलिसीसाठी प्रवेश करा ३) नोंदणी खात्याशिवाय काम सुरु ठेवा, या पैकी एक पर्याय निवडून लॉगिन करा.

Crop Insurance App
Crop Insurance App

Crop Insurance App मध्ये लॉगिन केल्यानंतर पीक विम्या अंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी “पीक नुकसान” या पर्यायावर क्लिक करा. पुढे “पीक नुकसानीची पूर्वसूचना” या पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाका.

पुढे पिकाचा हंगाम, वर्ष, योजना आणि राज्य निवडा.

पीक विमा कुठून भरला तो “नोंदणीचा स्रोत” निवडा आणि अर्ज/पॉलिसी नंबर टाकून “यशस्वी” (Done) वर क्लिक करा.

जर पॉलिसी नंबर टाकल्यानंतर जर “Entered Application/Policy Number not available” असा एर्रोर मॅसेज आला तर इतर पर्याय निवडा आणि त्यामध्ये राज्य, तालुका, ग्रामपंचायत, पिकाचे नाव, सर्वे नंबर, खाते नंबर, आणि पीक नुकसानीची माहिती भरून पीक नुकसानीचा फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करून विमा क्लेम सबमिट करायचा आहे.

शेत नुकसानीचे पंचनामे:

एकदा का शेतकऱ्यानं त्याच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवली की मग नुकसान भरपाईसाठीची प्रक्रिया सुरू होते. विमा कंपनी, कृषी विभाग यांचे प्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करतात. यात तीन गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातात.

 1. नैसर्गिक आपत्तीमुळे किती क्षेत्र बाधित झालं त्याची टक्केवारी निश्चित केली जाते.
 2. त्यामुळे मग त्या शेतकऱ्याच्या उत्पादनात किती घट होईल, हे पाहिलं जातं.
 3. आणि मग पीक वाढीची अवस्था काय आहे ते पाहिलं जातं. पीक वाढीच्या अवस्थेनुसार उत्पादन खर्च बदलत असतो.

ही पाहणी केल्यानंतर मग त्यानुसार नुकसान भरपाईचा दावा निश्चित केला जातो.

विमा कंपनी संपर्क: विमा कंपनी संपर्क यादीसाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.