सरकारी योजनावृत्त विशेष

चर्मकार समाजासाठीच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन !

चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी २०२३-२४ या वर्षासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या अनुदान योजना ५० हजार रुपये आणि बीज भांडवल योजनेंतर्गत रु. ५०,००१ ते ५ लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. मार्फत मुदती कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, सुक्ष्म पत पुरवठा योजना, शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जाणार आहेत.

एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्यामार्फत मुदती कर्ज योजनेंतर्गत २.५० लाखावरून ५ लाखापर्यंत महिला समृद्धी योजना ५० हजार रुपये वरून १.४० लाखापर्यंत, लघुऋण वित्त योजना ५० हजार रुपये वरून १.४० लाखापर्यंत व महिला समृद्धी योजनेंतर्गत ५० हजार रुपये कर्ज देण्यात येणार आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

>
  • जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा).
  • अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला.
  • चालू वर्षाचा (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा),
  • नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो तीन प्रती जोडाव्यात,
  • अर्जदाराचा शैक्षणिक दाखला,
  • रेशनकार्ड झेरॉक्स प्रत,
  • ओळखपत्र-आधार कार्ड,
  • मतदान कार्ड,
  • पॅनकार्ड प्रत,
  • व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन).,
  • व्यवसाय ज्या ठिकाणी करायचे आहे त्या जागेची भाडेपावती/करारपत्रे किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. 8),
  • वीजबिल,
  • टॅक्स पावती इ,
  • बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल व दोन सक्षम जामीनदार,
  • वाहनासाठी लायसन्स,
  • बॅच परवाना,
  • व्यवसायाचे ग्रा.पं./न.पा. यांचे नाहरकत प्रमाणपत्र,
  • व्यवसायाचे तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला,
  • अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्रावरील कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र.

जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.