रेल्वे मंत्रालयवृत्त विशेषसरकारी कामे

आता खाद्यपदार्थ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ऑनलाइन मागवता येणार : भारतीय रेल्वेने सुरू केली नवी सेवा !

भारतीय रेल्वेचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ मर्यादितने (आयआरसीटीसी) विकसित केलेल्या विशेष  https://www.catering.irctc.co.in या संकेतस्थळाच्या  तसेच ई-कॅटरिंग ॲप फूड ऑन ट्रॅकच्या माध्यमातून ई-खानपान सेवा सुरू केली आहे.

ई-खानपान  सेवा अधिक ग्राहक-केंद्रित बनवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, भारतीय रेल्वेने अलीकडेच रेल्वे प्रवाशांसाठी ई-खानपान  सेवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविण्यासाठी  व्हॉट्सॲप संपर्क  सुरू केला  आहे. यासाठी बिझनेस  व्हॉट्सॲप क्रमांक +91-8750001323 सुरू करण्यात आला आहे.

सुरुवातीला, व्हॉट्सॲप संपर्कांद्वारे  ई-खानपान सेवांची दोन टप्प्यांत अंमलबजावणी करण्याची योजना आखण्यात आली. पहिल्या टप्प्यात https://www.ecatering.irctc.co.in या दुव्यावर  क्लिक केल्यानंतर ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी ई-तिकीट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना बिझनेस व्हॉट्सॲप नंबर संदेश  पाठवला जाईल.

>

या पर्यायासह, ग्राहकांना ॲप डाउनलोड न करताही थेट आयआरसीटीसीच्या ई-खानपान संकेतस्थळाच्या माध्यमातून रेल्वेस्थानकाच्या  मार्गावर उपलब्ध असलेल्या त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांची मागणी त्यांना नोंदवता येईल.

सुरुवातीला, निवडक रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या ई-खानपान सेवेसाठी व्हाट्स अप संपर्क  सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  आणि ग्राहकांचे अभिप्राय आणि सूचनांच्या आधारे, रेल्वे इतर गाड्यांमध्येही ही सुविधा सुरु करेल.

आज, ग्राहकांना दर दिवशी अंदाजे 50000 भोजनाची मागणी  आयआरसीटीसीच्या  संकेतस्थळावरून  तसेच ॲपद्वारे उपलब्ध करून दिलेल्या  ई-खानपान सेवांद्वारे पूर्ण केली जात आहे.

हेही वाचा – रेल्वेचं ऑनलाईन तात्काळ तिकीट बुकिंग कसे करायचे?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.