कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचे व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान देणारी योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’. तरुण, बेरोजगारांना नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची ही सुवर्णसंधी लाभली आहे. या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते.

शेतकरी कष्टाने पिकवलेला माल विशेषतः नाशवंत शेतमाल बाजारात आल्यावर त्याला योग्य ते मूल्य मिळेलच असे नाही. त्यामुळे त्याच्या कष्टाचे चिज होत नाही. त्यामुळे अशा नाशवंत शेतमालावर प्रक्रिया करून त्यातून त्या शेतकऱ्याला उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण, शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME):

केंद्र शासन सहाय्यित आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme. राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारच्या सहकार्याने अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (एमओएफपीआय) अस्तित्वातील उन्नतीकरणासाठी आर्थिक, तांत्रिक आणि व्यवसाय सहाय्य करण्यासाठी अखिल भारतीय केंद्रीय पुरस्कृत पंतप्रधान औपचारिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्यम योजना (पीएम एफएमई योजना) सुरू केली आहे.

समाविष्ट जिल्हे : महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हे (मुंबई शहर व मुंबई उपनगर समाविष्ट).

  • सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नवे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरु करणे. सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षासाठी संपूर्ण राज्यभर लागू.
  • सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत लाभ (Credit Linked Bank Subsidy)
  • आजारी सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगही बँक कर्ज उपलब्ध होत असल्यास पात्र
  • पारंपारीक / स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन (Vocal For Local व Local To Global)
  • वैयक्तिक लाभार्थी- प्रगतशील शेतकरी, नव उद्योजक, बेरोजगार युवक, महिला वैयक्तिक मालकी/ भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयंसहायता गट (SHG), गैर सरकारी संस्था (NOG), सहकारी संस्था (Cooperative), खाजगी कंपनी (Pvt. Ltd. Companies) इत्यादी.
  • गट लाभार्थी / CIF – शेतकरी उत्पादक संस्था (FPO) / शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), सहकारी संस्था (सहकारी), स्वयंसहायता गट (SHG) आणि त्यांचे फेडरेशन (उदा. MSRLM-CLF, MAVIM-VLF, CMRC/NULM-ALF ) राज्य संस्था
  • एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) किंवा NON-ODOP साठीचे प्रस्ताव सहाय्यासाठी पात्र तथापि ODOP प्रस्तावांना प्राधान्य
  • योजनेमध्ये नाशवंत फळपिके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अन्नधान्ये, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मसाला पिके, गुळ इत्यादींवर आधारित उत्पादने, दुग्ध व पशु उत्पादने, सागरी उत्पादने, मांस उत्पादने, वन उत्पादने इत्यादी उत्पादनांचा समावेश
  • योजनेची सर्व प्रक्रिया Online. संगणकांसोबत मोबाईल वरून देखील अर्ज सादर करता येईल. एकाच लाभार्थ्याला योजनेंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल.

योजनेंतर्गत घटक, लाभार्थी आणि आर्थिक मापदंड:

१. प्रशिक्षण :

  • योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने कर्जमंजूरीसाठी बँकेकडे शिफारस केलेले वैयक्तिक लाभार्थी (३ दिवस प्रशिक्षण)
  • योजनेअंतर्गत बीज भांडवल लाभ मिळालेले स्वयं सहाय्यता गटांचे लाभार्थी (१ दिवस प्रशिक्षण)
  • अनुदान १००%

२. बीज भांडवल :

ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहाय्यता गटातील सदस्य, गट, त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी ( Small Tools) खरेदी करण्यासाठी व खेळते भांडवल (Working Capital) यासाठी प्रति सदस्य कमाल रक्कम रु.४०,०००/- व प्रति स्वयंसहाय्यता गट कमाल रक्कम रु. ४,००,०००/-

३. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग :

वैयक्तिक मालकी/ भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयं सहायता गट (SHG), अशासकीय संस्था (NGO), सहकारी संस्था (Cooperative), खाजगी कंपनी (Pvt. Ltd. Companies) यांना प्रकल्प किमतीच्या ३५%, जास्तीत जास्त १० लाख

४. सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना लाभ (सामाईक पायाभूत सुविधा) :

शेतकरी उत्पादक संस्था (FPO) / शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), सहकारी संस्था (Cooperative), स्वयंसहायता गट (SHG) आणि त्यांचे फेडरेशन (उदा. MSRLM-CLF, MAVIM-VLF, CMRC / NULM-ALF) शासकीय संस्था यांना प्रकल्प किमतीच्या ३५ %, जास्तीत जास्त ३.०० कोटी

५. मार्केटींग व ब्रॅन्डींग :

शेतकरी उत्पादक संस्था (FPO) / शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), उत्पादक सहकारी, स्वयंसहायता गट (SHG) यांचे समूह अथवा SPV यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या ५०%, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल.

६. सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना लाभ (इन्क्युबेशन केंद्र / मुल्यसाखळी) :

शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन (उदा. MSRLM-CLF, MAVIM-VLF, CMRC / NULM ALF), शासकीय संस्था यांना प्रकल्प किमतीच्या ३५%, जास्तीत जास्त ३.०० कोटी

सर्व सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना लाभ तथापि ODOP ना प्राधान्य:

फळे उत्पादने:- पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगांव, सांगली, जालना, बीड, अमरावती, बुलढाणा, नागपूर.

तेलबिया उत्पादने:- वाशिम.

मसाला उत्पादने:- नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा.

मासे व सागरी उत्पादने:- मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड.

भाजीपाला उत्पादने:- नाशिक, पुणे, लातूर

ऊस/गुळ उत्पादने:- कोल्हापूर, सातारा, परभणी.

पौष्टिक तृणधान्य उत्पादने:- ठाणे, नंदूरबार, सोलापूर.

तृणधान्य उत्पादने:- औरंगाबाद, भंडारा, गोंदिया, चंदपूर.

दुध व दुग्धजन्य पदार्थ:- अहमदनगर.

कडधान्य उत्पादने:- उस्मानाबाद, अकोला.

किरकोळ वन उत्पादने:- गडचिरोली.

लाभार्थी निवडीचे निकष:

१) वैयक्तिक लाभार्थी निवडीचे निकष

१. अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार (प्रोपायटरी / भागीदारी/प्रायव्हेट लि.) असावा.

२. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.

३. सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करुन देण्याची तयारी असावी.

४. प्रकल्प किंमतीच्या किमान १०% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी.

२) गट लाभार्थी निवडीचे निकष

१. सर्व अन्न प्रक्रिया उद्योगांच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट / कंपनी / स्वयं सहाय्यता गट / उत्पादक सहकारी संस्थांना लाभ देय आहे.

२. प्रकल्प किंमतीच्या किमान १०% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी.

अर्ज करण्याची पद्धत:

वैयक्तिक लाभार्थी ऑनलाईन प्रक्रिया-

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील केंद्र सरकारच्या संकेतस्थळाला भेट द्या https://pmfme.mofpi.gov.in आणि या MIS Portal वर नोंदणी व अर्ज सादर करा.
  2. जिल्हा संसाधन व्यक्तींमार्फत कार्यवाही.
  3. जिल्हास्तरीय समितीची कार्यवाही.
  4. बँक कर्ज मंजूरी प्रक्रिया.
  5. बँकेद्वारे कर्ज वितरण.
  6. पात्र प्रकल्पांना अनुदान वितरण.

सामाईक पायाभूत सुविधा (CIF) साठी ऑनलाईन प्रक्रिया:

  1. वरील MIS Portal वर नोंदणी व अर्ज सादर करा.
  2. जिल्हा संसाधन व्यक्तींमार्फत कार्यवाही, DRP निवड ऐच्छिक.
  3. राज्य नोडल एजन्सी मार्फत SLAC च्या मान्यतेने शिफारस.
  4. बँक कर्ज मंजुरी प्रक्रिया.
  5. बँकेद्वारे कर्ज वितरण.
  6. पात्र प्रकल्पांना अनुदान वितरण.

स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना बीजभांडवलसाठी ऑनलाईन प्रक्रिया:

१) ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना द्यावयाचे लाभ-

  • कार्यवाही – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM).
  • समुदाय संसाधन व्यक्ती.
  • प्रभागसंघ / ग्रामसंघ उपजीविका समिती कार्यवाही.
  • प्रभागसंघ / ग्रामसंघ कार्यकारी समिती मान्यता.
  • तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यवाही.
  • https://nrlm.gov.in या MIS पोर्टलवर नोंदणी.
  • जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यवाही.
  • राज्य ग्रामिण उपजीवविका अभियान (SRLM) कार्यवाही.
  • राज्य नोडल एजन्सी (SNA) पुणे मार्फत मंजुरी.
  • MSRLM यांना अनुदान वितरण.
  • पात्र प्रकल्पांना अनुदान वितरण.

२) शहरी भागातील DAY-NULM अंतर्गत स्थापन सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग व्यवसाय संबंधित स्वयं सहाय्यता बचत गटांना बीज भांडवलाचा लाभ-

  • कार्यवाही राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, महाराष्ट्र (DAY-NULM).
  • पात्र स्वयंसहाय्यता गट ( SHGs).
  • अभियान समुदाय संघटक (COs), समुदाय संसाधन – व्यक्ती (CRP), संसाधन संस्था (RO) यांच्याद्वारे कार्यक्षेत्रीय कार्यवाही.
  • शहर अभियान व्यवस्थापन कक्ष (CMMU) महापालिका व नगरपरिषद कार्यवाही.
  • https://nulm.gov.in या MIS पोर्टलद्वारे नोंदणी करा.
  • राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष (SMMU) DAY-NULM महाराष्ट्र कार्यवाही.
  • राज्य अग्रणी संस्था / State Nodal Agency द्वारे मंजुरी (DAY-NULM).
  • राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष यांना बीज भांडवल वितरण.
  • शहर स्तरीय संघ / वस्ती स्तरीय संघ यांना बीज भांडवल वितरण.
  • पात्र प्रकल्पांना अनुदान वितरण.

गट लाभार्थी ऑनलाईन प्रक्रिया:

  1. https://pmfme.mofpi.gov.in या MIS Portal वर नोंदणी व अर्ज सादर करा.
  2. जिल्हा संसाधन व्यक्तींमार्फत कार्यवाही.
  3. जिल्हास्तरीय समिती मार्फत पात्र प्रकल्पांची शिफारस.
  4. राज्य नोडल एजन्सी मार्फत बँकेकडे सादर.
  5. बँक कर्ज मंजुरी प्रक्रिया.
  6. बँकेद्वारे कर्ज वितरण.
  7. पात्र प्रकल्पांना अनुदान वितरण.

अधिक माहिती व संपर्क:

  • अध्यक्ष, राज्य कार्यकारी समिती (PMFME) तथा आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य.
  • राज्य नोडल अधिकारी (PMFME) तथा संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
  • विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा नोडल अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती.
  • उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण / शहरी जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण / शहरी विकास यंत्रणा, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, समुदाय संस्था.
  • संकेतस्थळ https://pmfme.mofpi.gov.in / https://krishi.maharashtra.gov.in

हेही वाचा – आत्मा योजने अंतर्गत शेतकरी गटाची नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर – Atma Shetkari Gat

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.