प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी तात्काळ करा हे काम ! – PM Kisan Yojana 13th Installment Update
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा माहे डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी पी.एम. किसान योजनेतील पात्र लाभार्थी यांची बँक खाती आधारशी जोडणी करणे बंधनकारक केले असून सदर लाभ आधारशी सलंग्न बँक खात्यामध्येच प्राप्त होणार आहे. तथापि, अद्यापही ज्या लाभाच्यांनी बँक खाते आधारशी संलग्न केलेले नसेल अशा प्रलंबित लाभार्थ्याचे बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) खाती उघडण्याची कार्यवाही शासनाकडील सुचनांनुसार पोस्ट खात्याकडून करण्यात येत आहे. तसेच अशा प्रलंबित लाभाव्यांच्या याद्या त्या गावच्या संबंधित पोस्टमन, पोस्ट मास्तर यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत.
त्याअनुषंगाने सदर बाबत गावोगावी प्रचार प्रसिध्दी करणेसाठी खालील नमुद नमुन्यानुसार गावोगावी दवंडी देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे व त्याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर केला जाणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी तात्काळ करा हे काम ! – PM Kisan Yojana 13th Installment Update:
“PM-KISAN योजनेयोजनेअंतर्गत तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी बँक खाती आधारशी जोडणी करणे बंधनकारक केले असुन सदर लाभ आधारशी सलंग्न बँक खात्यामध्येच प्राप्त होणार आहे. त्यानुसार अद्यापही ज्या लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही अशा लाभाथ्र्यांच्या याद्या आपल्या गावच्या पोस्टमन / पोस्टमास्तर यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत.
अशा प्रलंबित लाभार्थ्यांचे बैंक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत उघडून घेण्याची कार्यवाही पोस्ट खात्याकडून करण्यात येत आहे. तरी ज्या लाभार्थ्याचे सदर यादीमध्ये नांव नमुद असेल फक्त अशाच लाभार्थ्यांनी संबंधित पोस्टमन / पोस्टमास्तर यांचेशी संपर्क साधुन दिनांक 01 ते 07 फेब्रुवारी 2023 दरम्यान आपले बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत उघडुन घेण्यात यावे.”
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!