वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी योजनाजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी कामेसरकारी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) मध्ये शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचे ३ हप्ते मिळतात. या PM-Kisan योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास नोंदणी (PM Kisan Yojana Registration) करणं आवश्यक आहे. आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे, या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा झाला आहे की नाही, हे कसं बघायचं? याची माहिती आपण मागील लेखामध्ये घेतली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे ते पाहूया?

पीएम किसान (PM Kisan) म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. भारत सरकारनं सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले. PM-Kisan योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  1. या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रे गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
  2. CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं.
  3. शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव (PM Kisan Yojana Registration) नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.

पीएम किसान योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची? – PM Kisan Yojana Registration:

पीएम किसान योजनेची ऑनलाईन (PM Kisan Yojana Registration) नोंदणी करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला “PM-Kisan Samman Nidhi” वेबसाईट वर जावे लागेल, त्यासाठी खालील वेबसाईट लिंक ओपन करा.

https://pmkisan.gov.in/

“PM-Kisan Samman Nidhi” ची वेबसाईट ओपन झाल्यावर प्रथम वरती “Select Language” मध्ये आपली मराठी भाषा निवडा.

त्यानंतर उजवीकडे तुम्हाला “Farmers Corner” हा पर्याय दिसेल. त्यामध्ये विविध पर्याय तुमच्यासमोर दिसतील. त्यातील “नवीन शेतकरी नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.

नवीन शेतकरी नोंदणी - PM Kisan Yojana Registration
नवीन शेतकरी नोंदणी (PM Kisan Yojana Registration)

या पर्यायावर क्लिक केलं की “नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म – (PM Kisan Yojana Registration)” नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये प्रथम वरती “Select Language” मध्ये आपली मराठी भाषा निवडा.

पुढे तुम्हाला ग्रामीण आणि शहरी भागानुसार “Rural Farmer Registration” आणि  “Urban Farmer Registration” निवडा, तसेच आधार क्रमांक, कॅप्चा कोड, आपले राज्य निवडा आणि “Get OTP” बटन वर क्लिक करा.

नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म - PM Kisan Yojana Registration
नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म – (PM Kisan Yojana Registration)

Get OTP वर क्लिक केलं की ओटीपी टाकून पुन्हा खालील कॅप्चा कोड टाका आणि Submit बटन वर क्लिक करा, पुढे पुन्हा OTP येईल तो टाकून Verify Aadhaar OTP वर क्लिक करा.

त्यानंतर एक रेजिस्ट्रेशन फॉर्म त्यामध्ये सुरुवातीला शेतकऱ्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे. तसेच State म्हणजे राज्य निवडायचं आहे, त्यानंतर District म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. पुढे Sub-District आणि Block या दोन्ही ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव निवडायचं आहे. आणि मग गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे.

त्याखाली आधार कार्ड प्रमाणे Farmer Name म्हणजे शेतकऱ्याचं नाव/लिंग/येईल, पुढे मग कोणत्या प्रवर्गात मोडता (जनरल, एससी, एसटी की इतर) ते निवडायचं आहे.

त्यानंतर फार्मर टाईप मध्ये शेतकऱ्याचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे 1 ते 2 हेक्टरदरम्यान शेती असेल तर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, जास्त असेल तर Other या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आपण नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला असल्यामुळे मोबाईल नंबर, पत्ता, आणि जन्मतारीख आपोआप येईल. जमीन नोंदणी आयडी (Land Registration ID) मध्ये सातबाऱ्यावरील ११ अंकी ULPIN नंबर टाका. शिधापत्रिका क्र. मध्ये १२ अंकी RC नंबर टाकू शकता. किसान मानधन योजना घ्याची असेल किंवा नसेल तर Yes/No वर क्लिक करा.

त्यानंतर Land Holding मध्ये जमिनीच्या मालकीचा प्रकार सांगायचा आहे. यात स्वत: एकट्याच्या मालकीची जमीन असेल, तर single या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि सामूहिक मालकीची शेतजमीन असेल तर joint या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर Add या पर्यायावर क्लिक करून शेतजमिनीची माहिती सांगायची आहे.

आता इथं तुम्हाला सर्व्हे किंवा खाता नंबरमध्ये सातबाऱ्यावरील आठ-अ चा जो खाते क्रमांक आहे, तो टाकायचा आहे. त्यानंतर खासरा किंवा डॅगमध्ये सातबाऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे किती शेतजमीन आहे, ते हेक्टरमध्ये लिहायचं आहे. सातबाऱ्यावर जितकी जमीन नोंदवलेली आहे, तो आकडा इथं टाकायचा आहे.

तुमचा फेरफार कधीचा आहे म्हणजे २०१९ च्या अगोदर कि नंतरचा ते निवडून पुढे फेरफारचा प्रकार कसा आहे ते निवडायचा आहे आणि फेरफाराची तारीख टाका, तसेच Patta No./RFA म्हणजे जमीन वनपट्टाधारक म्हणून मिळाली आहे का ते निवडा.

पुढे आता Add बटन दाबलं की तुमच्या माहितीची तिथं नोंद केली जाते. आता एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन वेगवेगळ्या गट क्रमांक आणि खाते क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. त्यामुळे तुम्ही पुन्हा Add या पर्यायावर क्लिक करून ती माहिती देखील भरू शकता.

आवश्यक कागदपत्रे:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (पी. एम. किसान योजना) नवीन स्वयं नोंदणी (PM Kisan Yojana Registration) करणाऱ्या शेतकऱ्याचे वैयक्तिक तपशील भरल्यानंतर खालील आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन (PM Kisan Yojana Registration) नोंदणी करताना खालील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. (सर्व कागदपत्रे २०० kb फाईल मर्यादेत अपलोड करावीत.

  1. मागील तीन महिन्यांतील डिजिटल / तलाठी सहीचा ७/१२ उतारा.
  2. जमीन नोंदीचा फेरफार (लाभार्थीच्या नावे जमीन धारणा ०१/०२/२०१९ पुर्वीची असणे आवश्यक आहे. अपवाद वारसा हक्काने झालेले जमीन हस्तांतरण).
  3. वारसा नोंद फेरफारवर मयत दिनांक ०१/०२/२०१९ नंतरची असल्यास ज्यांचा नावावरुन वारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन आलेला / असलेला फेरफारही सोबत जोडावा.
  4. पती, पत्नी व १८ वर्षा खालील अपत्यांचे आधार कार्ड (सर्व एकाच पानावर स्कॅन करावीत.)

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Save बटनवर क्लिक करा.

वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंती सदर लाभार्थीना मान्यता मिळेल.

नोंदणीकृत शेतकऱ्याच्या अर्जाची स्थिती पहा:

एकदा फॉर्म भरून झाला की तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता, त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://pmkisan.gov.in/FarmerStatus.aspx

पेज ओपन झाल्यावर आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून  “Search” बटन वर क्लिक करा.

Status Of Self Registered Farmer
Status Of Self Registered Farmer

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन (PM Kisan Yojana Registration) नोंदणी करताना काही अडचण आल्यास तहसीलदार/तलाठी कार्यालयात ऑफलाईन (PM Kisan Yojana Registration) नोंदणी करा किंवा CSC सेंटर मध्ये जाऊन नोंदणी करा.

राज्य नोडल अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील:

पीएम-किसान हेल्प डेस्क क्रमांक: ०११-२४३००६०६, १५५२६१.

अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)
  2. प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
  3. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  4. PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती!
  5. PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
  6. पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !

  • Mayuri Vijay Dhaneshwar

    Very good lines.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.