आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी मंत्रालयकृषी योजनाग्राम विकास विभागजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीचे स्टेटस ऑनलाईन कसे चेक करायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती!

शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतीच्या विकासासाठी आणि सरकारी योजनांचा सहज लाभ घेण्यासाठी शासनाने ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ (Agristack Farmer ID) म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या क्रमांकामुळे आपल्या जमिनीची माहिती आधार क्रमांकाशी जोडली जाईल आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळणार आहे. मागील लेखामध्ये ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? याची सविस्तर माहिती पहिली आहे, या लेखात आपण ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीचे स्टेटस (Agristack Farmer ID Status) ऑनलाईन कसे चेक करायचे? त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ॲग्रिस्टॅक योजना Agristack Yojana:

राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक (Agristack Farmer ID Yojana – Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत पीएम किसान, किसान क्रेडिट कार्ड, पिक विमा, कृषि कर्ज, वित्त, निविष्ठा आणि शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) च्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्यांची वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही.

फार्मर आयडी – Farmer ID:

फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र. फार्मर आयडी हा प्रत्येक शेतकऱ्याला आता मिळणार आहे. तसेच भरपूर शेतकऱ्यांनी आपले फॉर्म सुद्धा भरलेले आहेत पण तुमचा फार्मर आयडी हा तयार झालेला आहे का नाही म्हणजेच तुमचा फार्मर आयडी बनलेला आहे का नाही हे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता.

ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीचे स्टेटस ऑनलाईन चेक करण्याची प्रोसेस – Check Agristack Farmer ID Status:

ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी बनला आहे का? त्याचे स्टेट्स (Agristack Farmer ID Status) पाहण्यासाठी सर्वप्रथम खालील वेबसाई लिंकवर क्लिक करा.

https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/

वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरती तीन ऑपशन दिसतील त्यातील Check Enrollment Status या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Check Agristack Farmer ID Status
Check Agristack Farmer ID Status

Enrollment Status आपण दोन प्रकारे चेक करू शकतो ते म्हणजे Enrollment ID किंवा Aadhaar Number टाकून Check पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Check Enrollment Status
Check Enrollment Status

त्यानंतर तुमचा फार्मर आयडी Approval Status मध्ये APPROVED आहे का ते दाखवेल व फार्मर आयडी बनलेला आहे का त्याचे (Agristack Farmer ID Status) स्टेटस Central ID समोर दाखवेल.

Agristack Farmer ID Status
Agristack Farmer ID Status

ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीचे स्टेटस (Agristack Farmer ID Status) आपण ग्रामपंचायत कार्यालय, CSC सेंटर (कॉमन सर्व्हिस सेंटर), आपले सरकार सेवा केंद्र व तलाठी कार्यालय मध्ये देखील पाहू शकता.

या लेखात, आम्ही ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीचे स्टेटस (Agristack Farmer ID Status) ऑनलाईन कसे चेक करायचे? या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  2. ॲग्रिस्टॅक योजना (Agristack Farmer ID) : डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने मिळणार !
  3. लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार !
  4. ‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार!
  5. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  6. PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!
  7. किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
  8. आंबिया बहार फळ पीक विमा योजना : फळ पीक विमा योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
  9. E-Peek Pahani DCS App : ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन -३ ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध!
  10. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – PoCRA Scheme.
  11. PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)
  12. प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
  13. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  14. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  15. PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
  16. पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.