अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदभरती – २०२५
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदभरती विविध जिल्ह्यांत (Anganwadi Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरु असून, इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदभरती – Anganwadi Bharti 2025:
अर्जदारासाठी मार्गदर्शक सुचना नियम व अटी खालीलप्रमाणे :-
1) शैक्षणिक पात्रता :-
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता १२वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. तसेच पदवीधर, पदव्युत्तर, डि.एड., बी.एड., एम.एस.सी.आय.टी. यापैकी अतिरिक्त शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास त्यानुसार गुण देण्यात येतील. सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या सत्यप्रती जोडणे बंधनकारक राहील.
2) वास्तव्याची अट / स्थानिक रहिवाशीची अट :-
स्थानिक रहिवाशी असणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडे या क्षेत्रातील रहिवासी यांना स्थानिक समजण्यात येईल. यासाठी रहिवासी असले बाबत विहीत नमुन्यातील स्वयंघोषणापत्रा सोबत स्थानिक रहिवासाचा पुरावा (मतदार ओळखपत्र/आधारकार्ड/रेशनकार्ड/लाईट बील) जोडणे आवश्यक राहील अथवा सक्षम प्राधिकारी तहसीलदार यांचे राहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
3) वयाची अट :-
अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष राहील. तथापि विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष राहील. वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला (टि.सी) किंवा बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहिल. उमेदवाराचे किमान व कमाल वय हे अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास गणना करण्यात येईल.
4) लहान कुटूंब प्रतिज्ञापत्र :-
वरील पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील, लहान कुटूंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असा राहील. उमेदवारास दोन पेक्षा जास्त हयात अपत्य (दत्तक दिलेल्या अपत्यासह) नसावीत, अर्जासोबत विहित नमुन्यात लहान कुटुंबाबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक राहिल. अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. उमेदवाराला दोन हयात अपत्यापेक्षा (दत्तक दिलेल्या अपत्यासह) अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही. जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल, तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य (दत्तक दिलेल्या अपत्यासह) असून देखील तिसरे अपत्ये झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यांत येईल.
5) भाषेचे ज्ञान :-
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करणा-या अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान बंधनकारक राहील. याकरीता इयत्ता १०वी अथवा बारावी/पदवी/पदव्युत्तर पदवी/बीएड/डीएड या शासन निर्णयातील परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हते पैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. ज्या अंगणवाडी मध्ये 50 टक्के पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा (उदा. बंजारा, उर्दू, हिंदी, माडीया, गोंड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकु, तेलगु, भिल्लोरी) इ.पैकी एक भाषा बोलणारी असतील तर तेथील सेविका/मदतनीस पदासाठी सदर भाषेचे ज्ञान (लिहिता व वाचता येणे) आवश्यक राहील.
6) उमेदवार विधवा असल्यास :-
ग्रामपंचायत / नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत किंवा सक्षम प्राधिकारी यांचेकडील पतीचे मृत्यु प्रमाणपत्र व स्वयंघोषणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहिल.
7) उमेदवार अनाथ असल्यास :-
शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकारी विभागीय उपआयुक्त, महिला व बालविकास यांचे अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.
8) मागासवर्गीय / आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील उमेदवार असल्यास :-
मागासवर्गीय उमेदवार अनुसूचित जाती / अनु. जमाती / इतरमागास प्रवर्ग / विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग / सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले स्वतःच्या नावाचे जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे बंधनकारक राहिल. जात प्रमाणपत्र मिळणे करिता तहसिल कार्यालयात अर्जसादर केलेली पावती ग्राहय धरली जाणार नाही.
9) अनुभव :-
शासकिय यंत्रणेतील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका / मदतनीस म्हणुन किमान दोन वर्षाचा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे म्हणजेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त खाजगी व स्वंयसेवी, अनुदानित / विना अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राहय धरला जाणार नाही. उमेदवाराने याबाबत कोणताही युक्तीवाद केल्यास मान्य केले जाणार नाही. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीनंतर कोणतीही कागदपत्रे स्विकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
10) बदली :-
अंगणवाडी कर्मचारी हे एकाकीपद असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहिवाशी असावी या केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचा-यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही.
11) अर्जदाराचे नावात बदल :-
अर्जदाराचे नावात बदल असल्यास दोन्हीही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र अथवा पुरावा सादर करावा.
12) अर्जाबाबत :-
एकाच गावात अंगणवाडी सेविका व मदतनीस अशी दोन्ही पदे भरावयाची असल्यास सदर दोन्ही पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
13) अर्जासोबत जोडावयाचे प्रमाणपत्रांची माहिती :-
- उमेदवाराने अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा,
- किमान बारावी उत्तीर्ण शैक्षणिक प्रमाणपत्र सोबत जोडावे,
- मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र (स्वतःचे नावाचे),
- बारावीनंतर उच्च शैक्षणिक अर्हता असल्यास उदा. पदवीधर, पदव्युत्तरपदवी, डी. एड, बी. एड, एमएससीआयटी किंवा समकक्ष व इतर शैक्षणिक कागदपत्रे सोबत जोडावे.
- अनुभव विधवा, अनाथ असल्यास सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
(टिप :- गावाचे नांव व पदाचे नांव नमुद केलेले नसणे, अर्ज अपूर्ण, अर्जामध्ये खाडा-खोड केलेले, विहित ठिकाणी स्वाक्षरी नसलेले तसेच अर्जासोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या सक्षम प्राधिका-यांकडून साक्षांकितकेलेल्या प्रति नसणे इत्यादिकारणामुळे अर्ज अपात्र ठरविण्यांत येतील व त्याबाबत उमेदवारास स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही.)
14) निवड कार्यपध्दती :-
शासन निर्णयानूसार उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांवरुन इयत्ता बारावी / पदवी/ पदव्युत्तर / डीएड /बीएड / संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणांनुसार तसेच विधवा, अनाथ, अनुभव, जातप्रवर्ग, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणीक मागास वर्ग इत्यादिसाठी त्यांचे प्रमाणपत्रावरुन मिळालेल्या एकुण गुणांनुसार गुणांनुक्रमाने पात्र उमेदवारांची गावातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यांत येईल. टपाल / ईमेलने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार न करता फक्त समक्ष कार्यालयास सादर केलेल्या अर्जाचाच विचार केला जाईल.
- या पदांकरिता लेखी अथवा मौखिक मुलाखत घेतली जाणार नाही.
- अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांनुसार शासन निर्णयात नमुद केल्यानुसार उमेदवारांना गुण देवून प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यांत येईल,
- विहीत मुदतीनंतर प्राप्त तक्रारीची शहानिशा करुन अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना निकाला बाबत कळविण्यांत येईल. इतर उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- अंतिम निवड यादी जाहिर झाल्यानंतर गुणानुक्रमे अंगणवाडी सेविका / मदतनीस यांची निवड करण्यांत येईल. निवड झालेल्या उमेदवारांना नेमून दिलेल्या अंगणवाडी केंद्रावरच विहीत मुदतीत हजर व्हावे लागेल.
- उमेदवाराची एकदा नियुक्ती झाल्यावर रकोणत्याही परिस्थितीत त्यांची इतर ठिकाणी बदली करता येणार नाही.
- त्याचप्रमाणे नियुक्ती झालेल्या ठिकाणी सतत गैरहजर राहिल्यास त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल.
- निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याहीक्षणी उमेदवाराने अर्जात किंवा अर्जासोबत दिलेली माहिती अथवा खोटी कागदपत्रे सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्यावर किवा निवड झाल्यानंतरही रद्द करण्यांत येईल,
- निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीवेळी मुळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहिल. अन्यथा निवड प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यांत येईल.
- एखादया उमेदवाराने त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणल्यास त्या उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्यांत येईल.
- अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर अंतिम निवड झाल्यास उमेदवारास पंचायत राज संस्था, जि. पं. पं. स. सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल.
15) मानधन :-
अंगणवाडी सेविका व मदतनीस हे मानधनी स्वरुपाचे पदे असून या पदाकरीता मानधन इत्यादी बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/परिपत्रक (ध्येय/धोरणे) लागु राहतील.
16) सेवा समाप्ती व वयाचीअट :-
दिनांक 02.02.2023 च्या शासन निर्णयानुसार नियुक्त होणा-या अंगणवाडी सेविका / मदतनीस यांची सेवा वयाची 60 वर्षे पुर्ण होई पर्यंत किंवा त्या शारिरीकदृष्टया काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत सेवा सुरु ठेवण्यात येईल.
17) कागदपत्र पडताळणी :-
शासन निर्णया नुसार ज्या उमेदवाराची निवड होईल त्याउमेदवाराने अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मुळप्रतींची उमेदवारास हजर करुन घेण्यापुर्वी पडताळणी / तपासणी केली जाईल. ज्या प्रकरणी कोणत्याही प्रकारची शंका असेल असे प्रकरण संबंधीत सक्षम प्राधिका-यांचे निदर्शनास आणूण दिले जाईल. निवड झाल्यानंतर खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे निदर्शनास आल्यास झालेली निवड रद्द करण्यात येईल. तसेच कामावर रुजु करुन घेतले असेल तर कामावरुन कमी करण्यात येईल. जाहिराती मधील कोणत्याही मुददयाबाबत साशंकता किंवा संदिग्धता निर्माण झाल्यास संबंधित शासन निर्णयातील तरतुदी अंतिम राहतील.
18) पत्रव्यवहार :-
भरती (Anganwadi Bharti) प्रक्रियेसंबंधी अर्जदारास कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. सर्वसुचना जाहिरातीमधील अटी व शर्तीप्रमाणे असुन वेळोवेळी देण्यात येणा-या सुचना कार्यालयाच्या नोटिसबोर्डवर लावण्यात येतील.
20) महत्वाची सुचना :-
भरती प्रक्रिया (Anganwadi Bharti) शासननिर्णयातील तरतुदीनूसार अन्वये राबविण्यात येणार असुन निवड व नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे. करिता उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना अथवा अफवांना बळी पड्डु नये. मा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे आदेश जा.क्र.एवाविसेयो/अंगणवाडी /का-7/2024-25/517 दिनांक 31/01/2025 नूसार पुर्वीच्या निकषांनूसार जाहिरात देवून निवड समितीने अंतिम गुणवत्ता पडताळणी यादी प्रसिध्द केलेली नसल्याने अगोदर सुरु असलेली भरती (Anganwadi Bharti) प्रक्रिया या जाहिर प्रगटनाव्दारे रदद घोषीत करण्यात येत आहे तरी यापुर्वी कार्यालयास प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नसून अर्जदारांनी या जाहीर प्रगटनातील तरतुदीनूसार पुन्हा अर्ज करावे. पुर्वीच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
काही जिल्ह्यानुसार जाहिरात ((Anganwadi Bharti Notification):
- लातूर जिल्हा जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- रत्नागिरी जिल्हा जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- सातारा पूर्व जिल्हा जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- सातारा पश्चिम जिल्हा जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- सोलापूर शहर पूर्व जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- सोलापूर शहर पश्चिम जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
सूचना: अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदभरती (Anganwadi Bharti) जाहिरात प्रत्येकाने आपल्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर पाहावी, तसेच ऑफलाईन देखील कार्यलयात जाऊन चौकशी करू शकता.
या लेखात, आम्ही अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Bharti) पदभरती – २०२५ विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- अंगणवाडी सेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, पात्रता, अटी व शर्ती.
- अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा!
- आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे.
- ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना
- आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी 10 लाख, अपंगत्वासाठी 5 लाख !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!