अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा!
एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) व अंगणवाडी मदतनीस या मानघनी कर्मचा-यांच्या नियुक्तीसंदर्भातील अटी शर्ती दिनांक ०२.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आल्या आहेत. तदनंतर सदर शासन निर्णयामधील अटी शर्तीमध्ये खालील नमूद केलेल्या शासन निर्णयांन्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळसेवेने नियुक्ती करण्यासाठी खालील शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०२३ मधील परिशिष्ट “अ” नुसार गुणांकन करून कार्यवाही करण्यात येत होती. त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा – Anganwadi Sevika:
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळसेवेने नियुक्ती करण्याकरिता खालील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) व अंगणवाडी मदतनीस यांची सरळसेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) व मदतनीस यांच्या नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेल्या सुधारणांव्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ती ह्या दिनांक ०२.०२.२०२३ व तदनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील.
सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांमधील ज्या प्रकल्पांमध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषांनुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी (Anganwadi Sevika) सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत, त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे, अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस शैक्षणिक अर्हता:
बाब | एकूण गुण | अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस (किमान अर्हता १२ वी उत्तीर्ण) | |
शैक्षणिक अर्हता | द्यावयाचे गुण | ||
शैक्षणिक अर्हता | ८० गुणांपर्यंत | १) बारावी | |
८०% पेक्षा जास्त | ६० | ||
७०.०१ ते ८०% | ५५ | ||
६०.०१ ते ७०% | ५० | ||
५०.०१ ते ६०% | ४५ | ||
५०% ते ४० % | ४० | ||
टिप:- ज्या उत्तीर्ण उमेदवारांना ४०% पेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी ३५ गुण ग्राह्य धरण्यात येतील. | |||
२) पदवीधर | १० | ||
३) पदव्युत्तर | ४ | ||
४) डी.एड. | २ | ||
५) बी. एड. | २ | ||
६) शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS-CIT) अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरविलेला संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास | २ | ||
अतिरीक्त गुण | २० गुणांपर्यंत | ||
विधवा/अनाथ | १० | ||
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | ५ | ||
इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग / सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग | ३ | ||
अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास | ५ |
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय – Anganwadi Sevika GR:
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
खालील लेख देखील वाचा!
- आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे!
- अंगणवाडी सेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, पात्रता, अटी व शर्ती!
- आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी 10 लाख, अपंगत्वासाठी 5 लाख !
- गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ !
- महिला व बाल विकास विभागाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Anghanvadi