आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज – Kisan Credit Card Apply Online (KCC Card Registration)

भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरूवात केली असून या लेखात आपण पाहणार आहोत PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे, त्यासाठी खालील लेख संपूर्ण वाचा आणि जाणून घ्या सविस्तर माहिती.

भारत सरकारने काढलेल्या परीपत्रकानुसार भारतामध्ये सुमारे 6.95 कोटी शेतकरी हे किसान क्रेडिट कार्ड वापरत असल्याचे समजते परंतु अनेक शेतकरी हे या किसान क्रेडिट कार्ड वापरत असताना सुध्दा कर्जापासून वंचीत आहेत. त्यामूळे अधिकाधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ व्हावा या दृष्टीने सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सगळ्या लाभार्थ्यांचा केसीसी योजनेत समावेश करण्याची मोहीम हाती घेतली.

या मोहीमेंतर्गत जास्तीज जास्त शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ व्हावा यासाठी केंद्र शासनाने PM Kisan या वेबसाईट वर किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा सुरू केली.

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. केसीसीच्या म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाते.

केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो. पशुपालन (शेळीपालन, मेंढीपालन कुक्कुटपालन इ.) आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ होतो.

किसान क्रेडिट कार्ड व्याज दर:

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिले जाणारे कर्ज हे 3 लाख रुपये पर्यंत दिले जात असून त्याचा व्याज 7 टक्यांपर्यंत दिले जाते परंतु शेतकरी किसान क्रेडिट कार्ड कर्ज हे वर्षभरात फेडणार असेल तर व्याजामध्ये 3 टक्के सवलत दिली जात असून शेतकऱ्यांना 4 टक्के व्याज भरावे लागते.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पीककर्ज योजनेबाबत सुधारित शासन निर्णय ११ जून २०२१ रोजी जारी करण्यात आला, सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

किसान क्रेडिट कार्ड विमा:

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले , तर किसान क्रेडिट कार्ड विमा योजने अंतर्गत त्याला 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते, तसेच इतर धोक्यांसाठी 25 हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

किसान क्रेडिट कार्ड ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्याची प्रोसेस:

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म भरण्यासाठी CSC म्हणजेच (Common Service Centre) किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांकडून ५० रुपये शुल्क CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडून आकारले जाते .

जर तुमच्याकडे CSC सेंटरचा आयडी असेल तर खालील लिंकवर जाऊन फॉर्म भरू शकता.

https://eseva.csccloud.in/kcc/Default.aspx

KCC पोर्टलची वेबसाईट ओपन झाल्यावर “Apply New KCC” या पर्यायावर क्लिक करून लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकून सबमिट वर क्लिक करायचे आहे.

PLEASE INPUT YOUR AADHAAR NUMBER
PLEASE INPUT YOUR AADHAAR NUMBER

त्यानंतर KCC ऑनलाईन फॉर्म भरून प्रिंट काढून घ्या. ती प्रिंट घेऊन बँक मध्ये किसान क्रेडिट कार्ड संदर्भात चौकशी करा.

हेही वाचा – किसान क्रेडिट कार्ड वाटप; किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहीम सुरु ! – Kisan Credit Card

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.