लोकसभा निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध !
भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी व महायुती कडून अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, तर आघाडीतील घटक पक्षात रस्सीखेच सुरू आहे.
लोकसभा निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध !
या काळात निवडणुकांच्या एक्झिट पोल आणि ओपिनिअन पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल साठी प्रतिबंध लागू राहणार आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.
तसेच आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये”(“DOs & DON’Ts) ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच, या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मॅन्युअल/हस्तपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याशिवाय भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळावर निवडणुकी संदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. तसेच उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : प्रचारासाठी लागणाऱ्या परवानग्या व कागदपत्राची यादी जाहीर !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!