माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्र राज्याने माहिती अधिकाराचा आदेश व त्या खालील नियम दिनांक 23 सप्टेबंर 2002 पासून लागू केला होता. दिनांक 15 जून 2005 रोजी केंद्र शासनाने माहितीचा अधिकार कायदा 2005 लागू केला आणि हा कायदा महाराष्ट्र राज्याने 12 आक्टोंबर 2005 पासून लागू केला. या कायद्यामुळे महाराष्ट्र माहिती अधिकार अध्यादेश व नियम 2002 निरासित केला आहे. परंतू 12 आक्टो, 2005 पुर्वीच्या अर्जावर पूर्वीच्या कायद्याप्रमाणे म्हणजेच महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम 2002 प्रमाणे कार्यवाही करावयाची आहे. 12 आक्टो 2005 पासूनच्या अर्जावर नविन माहितीचा अधिकार कायदा 2005 प्रमाणे कार्यवाही सुरू आहे. माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील, कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये अभिलेख, दस्ताऐवज, ज्ञापने, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धीपत्रके आदेश, रोजवह्या, संविदा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने कोणत्याही इलेक्ट्रानिक्स स्वरूपातील अधार, साधनसामुग्री आणि त्यावेळी अमंलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनीक प्राधिकरणास मिळविता येईल अशी कोणत्याही खाजगी निकषाशी संबंधित माहिती याचा संबंध आहे. माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकारणाकडे असलेली किंवा त्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमाद्वारे मिळवता येण्याजोगी माहिती मिळविण्याचा अधिकार असा आहे. मागील लेखा मध्ये आपण माहिती अधिकार कायदा कोणासाठी व कशासाठी? माहिती अधिकार कायद्याची व्याप्ती पाहिली. आता आपण माहितीचा अधिकार (RTI) अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज कसा करायचा हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज:
आपण माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये कोणत्याही सार्वजनिक आस्थापनांकडून (सरकारी संस्था किंवा सरकारी अनुदानप्राप्त संस्था) माहिती मिळवू शकता. यासाठी लागणारा अर्ज हस्तलिखित असू शकतो किंवा टाईप केलेला असू शकतो. अर्ज इंग्रजी, हिंदी किंवा संबंधित राज्याच्या अधिकृत भाषेत असावा.
तुमच्या अर्जात खालील माहिती पुरवा:
1)सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी (पीआयओ) यांचे नाव व पत्ता
2)विषय: माहितीचा अधिकार अधिनियम २००५, सेक्शन ६ (१) अन्वये माहिती मिळविण्यासाठी अर्ज
3)तुम्हाला त्या संस्थेकडून/प्राधिकरणाकडून हवी असलेली विशिष्ट माहिती
4)अर्जदाराचे नांव
5)वडिलांचे/पतीचे नांव
6)वर्ग: अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासवर्गीय, इ.
7)अर्ज फी
8)तुम्ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबापैकी आहात का? हो/नाही
9)पत्रव्यवहाराचा पत्ता (मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी आवश्यक नाहीत)
10)तारीख आणि स्थळ
11)अर्जदाराची सही
12)सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी
माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत नमुना अर्ज:
माहिती अधिकार (RTI) अर्ज करण्यापूर्वी सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी यांचे नाव व पत्ता, उल्लेख केलेली फी व फी देण्याची पद्धत पुन्हा एकदा तपासून पहा.
माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळविण्यासाठी फी आकारण्याची तरतूद कायद्यात आहे मात्र अनुसूचित जाती/जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींकडून फी आकारण्यात येत नाही.
ज्यांना फीमाफी हवी असेल त्यांनी अर्जासोबत अनुसूचित जाती/जमाती/दारिद्र्यरेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
अर्ज स्वतः जाऊन/पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे दाखल करता येतो. जर तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवत असाल तर नेहमी रजिस्टर पोस्टाचाच वापर करा.
खाजगी कोरियर सेवा वापरणे सदैव टाळा. तुमच्या संदर्भासाठी अर्जाच्या (मुख्य अर्ज, फी भरल्याचा पुरावा, सोबत जोडलेली कागदपत्रे, पोस्टाने अर्ज पाठवल्याचा पुरावा, इ.) दोन (2) छायांकित प्रती तयार करा व सुरक्षितपणे ठेवा.
जर तुम्ही अर्ज स्वहस्ते दाखल करणार असाल, तर एक पोचपावती तयार करा व त्यावर संबंधित कार्यालयाचा तारखेनिशी सही-शिक्का घ्या.
जर अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवणार असाल तर ही पोचपावती अर्जासोबत जोडा आणि पोस्टाची अर्ज पाठवल्याची पावती व्यवस्थित जपून ठेवा.
लोकमाहिती अधिकार्याला अर्ज मिळाल्यापासूनच्या दिवसापासून अर्जावर कार्यवाही करून माहिती पुरवण्याची मुदत मोजतात.
माहिती अधिकार (RTI) नमुना अर्ज : माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत नमुना अर्ज PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – माहिती अधिकाराचा अर्ज (RTI) ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा करायचा ?
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!