काउंटरवर बुक केलेलं रेल्वेचे तिकीट ऑनलाईन रद्द कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर !
IRCTC योजनेनुसार कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगचे नियम लक्षात घेऊन रेल्वे एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याअंतर्गत आता तुम्ही घरी बसून रेल्वेचे काउंटरवरून घेतलेले तिकीटही (cancel counter train ticket online) रद्द करू शकता.
कसा आहे IRCTC चा नियम :-
IRCTC च्या नव्या नियमानुसार ऑनलाइन तिकीट रद्द (cancel counter train ticket online) केलं जाऊ शकतं, यासाठी महत्वाचे म्हणजे तिकीट खरेदी करताना तुमचा वैध मोबाइल क्रमांक द्यावा लागतो, म्हणजे जर तुम्ही तिकीट काढताना योग्य नंबर दिला नाही तर तुम्हाला काउंटरवरून घेतलेले तिकीट ऑनलाईन रद्द करता येणार नाही.
कसे करू शकतो ऑनलाइन तिकीट रद्द – cancel counter train ticket online:
१) यासाठी आपण www.operations.irctc.co.in/ctcan/SystemTktCanLogin.jsf या लिंक वर जायचे आहे.
२) या पेजवर आल्यावर तुमचा पीएनआर नंबर, ट्रेन नंबर टाकायचा आहे
३) त्यानंतर कॅप्चा कोड टाका व त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
४) नंतर मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाका, हा ओटीपी त्याच नंबरवर येईल जो तुम्ही तिकीट बुक करताना दिला होता.
५) ओटीपी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पीएनआर नंबर वॅलिडेट करावा लागेल.
६) नंतर Cancel Ticket च्या ऑप्शन वर क्लिक करा.
७) यानंतर तुमची रिफंड अमाउंटची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, तसेच त्याचा फोटोही तुम्हाला तिथं मिळू शकेल.
८) यामध्ये जरी तुम्ही तिकीट ऑनलाईन पद्धतीने रद्द केले तरीहि , याची रिफंड तुम्हाला काउंटरवर मिळणार आहे , त्यासाठी हि प्रोसेस झाल्यानंतर तुमचं तिकीट घेऊन पीआरएस काउंटरवर आपल्याला भेट द्यावी लागेल.
हेही वाचा – IRCTC च्या नवीन वेबसाइटवर ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!