ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना घ्यावयाची दक्षता !
आपण यालेखात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना घ्यावयाची दक्षता (परिपत्रक क्र.व्हीपीएम २६८९/२२९७/२१ नुसार) विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना घ्यावयाची दक्षता !
महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांबाबत निरनिराळ्या जिल्ह्यातून संकल्पित करण्यात आलेल्या माहितीचे अवलोकन करता शासनाच्या निदर्शनास खालील बाबी आल्या आहेत.
(१) ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना सदरहू ग्रामपंचायतीत किमान किती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची खरोखरच आवश्यकता आहे त्याचा आढावा ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात आलेला नाही.
(२) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी निकष लावण्यात येऊन आवश्यक त्याच कामासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली दिसून येत नाही.
(३) शासनातर्फे असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत की, ग्रामपंचायतीने आपल्या उत्पन्नाच्या फक्त २५ टक्के इतकीच रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करावी. तथापि उपरोक्त आदेशाचे पालन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेले नाही.
उपरोक्त प्रश्नाचा सर्वकष विचार करण्यात येऊन शासनाने खालील आदेश दिला आहे.
(१) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना ग्रामपंचायतींना आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची उपयुक्तता त्याचप्रमाणे कामाची विभागणी याचा सर्वकष विचार ग्रामपंचायतीतर्फे करण्यात यावा व अत्यंत आवश्यक अशाच कामाकरिता किमान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी.
(२) ज्याठिकाणी पूर्णकालीन कर्मचाऱ्यांपेक्षा अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर काम होऊ शकत असेल तेथे अंशकालीन कर्मचारी नेमण्यात येऊन ग्रामपंचायतीचे काम चालविण्यात यावे.
(३) ग्रामपंचायतीने कोणत्याही परिस्थितीत आपल्या उत्पन्नाच्या २५ टक्के पेक्षा जास्त खर्च ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर करू नये.
(४) आवश्यकता नसताना नवीन कर्मचारी नेमू नये व अनावश्यक कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणावी.
सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सूचना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व ग्रामपंचायतीच्या नजरेस आणाव्या.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
परिपत्रक website वर टाका