स्पर्धा परीक्षामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार गणित ई-साहित्य निर्मितीसाठी मान्यता

राज्यात दिक्षा ऍपचा जास्तीत जास्त प्रभावीपणे वापर होण्याकरिता तसेच राज्यातील मराठी माध्यमाच्या इयता १ ली ते १० वी मधील विद्यार्थ्यांना दर्जेदार गणित ई साहित्य निर्मिती करण्याबाबत खालील शासन निणर्यातील संदर्भ क्र.१ अन्वये संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावास खालील शासन निणर्यातील संदर्भ क्र. २ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

शालेय स्तरावर गणित विषयाचे महत्व अनन्य साधारण आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची गणित विषयाची संपादणूक वृध्दिंगत होण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावरुन विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये दीक्षा अॅप वरील ई – साहित्याचे महत्व अधोरेखित आहे. सदर अॅपवरील साहित्य पाठयपुस्तकातील Q.R. Code च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जाते.

सदर दीक्षा अॅप वरील ई – साहित्य अद्ययावत, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करणेसाठी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षक यांच्या मदतीने ई – साहित्य निर्मिती करण्यात येते. सदर प्रक्रियेमध्ये या विषयातील तज्ञ असणाऱ्या विविध अशासकीय संस्थांचे देखील सहकार्य घेण्यात येत असते. याअनुषंगाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे ई – साहित्य निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार गणित ई-साहित्य निर्मितीसाठी मान्यता:

>

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत राज्य अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ई – साहित्य निर्मिती करण्यात येत आहे. सदर निर्मित ई – साहित्य दीक्षा अॅप, पाठयपुस्तकातील Q.R. Code परिषदेची वेबसाईट व यु – ट्यूब चॅनेल यांचे मार्फत होणाऱ्या रु. १६.५० लक्ष इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. तसेच ई – साहित्य निर्मिती करिता आवश्यक साहित्य खरेदी, व्हिडीओ निर्मिती, भाषांतर तज्ञ व इतर अनुषंगिक खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर मान्यता पुढील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

  1. ई – साहित्याची खरेदी Gem पोर्टलवरुन विहित पध्दतीने करण्यात यावी.
  2. उपलब्ध करुन दिलेला निधी त्याच प्रयोजनासाठी उपयोगात आणला जावा.
  3. खर्च विहित मार्गाने नियमानुसार करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे राहील.
  4. खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे तात्काळ सादर करण्यात यावीत.

सदरचा खर्च मागणी क्रमांक. ई -२, २२०२ सर्वसाधारण शिक्षण, ८० पंचवार्षिक योजनांतर्गत योजना ( ०२ ) ( ५१ ) ई – गव्हर्नन्स कार्यक्रम ( २२०२ H ४५४ ) ३१ सहायक अनुदाने या लेखाशिर्षातून सन २०२२-२३ च्या उपलब्ध तरतुदीमधुन भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी व संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, ( विद्या प्राधिकरण ), पुणे तथा संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

सदरचा खर्च राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेतून खर्च केला असल्यास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या तरतुदीमधून समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

हा शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमपुस्तिका -२०१५ दिनांक १७ एप्रिल, २०१५ मधील उपविभाग- २ मधील अनुक्रमांक २७ अ मधील नियम क्र. ७६ अन्वये विभागास प्रदान करण्यात आलेल्या वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.६७४ / २०२२ / व्यय -५, दिनांक ०१.०७.२०२२ अन्वये प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय: इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार गणित ई-साहित्य निर्मितीसाठी प्रशासकिय व वित्तीय मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.