वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी योजना

आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी असा करा ऑनलाईन अर्ज ! RTE 25% Online Admission 2024-2025

दरवर्षी प्रमाणे सन २०२४-२५ या वर्षांची बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे.

आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी असा करा ऑनलाईन अर्ज ! RTE 25% Online Admission 2024-2025:

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्ष पालकांना दिनांक १६.०४.२०२४ पासून लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  R.T.E. च्या लिंकवर पालकांना आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल.

शाळा खालील कारणांमुळे आरटीई २५ टक्के प्रवेश नाकारु शकेल याची पालकांनी नोंद घ्यावी.
 • अवैध निवासाचा पत्ता
 • अवैध जन्मतारखेचा दाखला
 • अवैध जातीचे प्रमाणपत्र
 • अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • अवैध फोटो आयडी
 • गंभीर दिव्यांग प्रमाणपत्र
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांसाठी सूचना:

१) ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

२) प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरु नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी.

३) भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा.

४) भाडेकरार हा अर्ज भरण्याच्या दिनांकाचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्पयावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरार दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्यापालकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच प्रवेश आरटीई मधून झाला तरी ही संबधित पालकांनी संपूर्ण फी भरावी लागेल.

५) विदयार्थ्यांना निवासस्थानापासून १ किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा आशा सर्व प्रकारच्या शाळा असतील, वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखादया पालकांनी प्रथम प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्रथम प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा निवडता येईल.

६) विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा किंवा शासकीय शाळा नसतील व स्वंयअर्थसहाव्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना २५ टक्के अंतर्गत सोडत पदधतीने प्रवेश दिला जाईल.

७) अपवादात्मक परिस्थितीत विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा नसेल तर विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्याने होतील.

RTE २५% ऍडमिशन साठी पालकांकरीता सूचना (2024-2025):

1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.

4) १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

8) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

11) RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/04/2024 पर्यंत राहील.

12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

13) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

14) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित [email protected] OR [email protected] वर इमेल पाठवावा.

आर.टी.ई. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करा (R.T.E. 25%  Admission Online) :

आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

पहिल्यांदा नोंदणी करत असल्यास New Registration वर क्लिक करून आवश्यक तपशील भरून नोंदणी करावी. नोंदणी झाल्या नंतर आपल्या मोबाईल वर युजर आयडी व पासवर्ड पाठवला जाईल.

युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे. जुना पासववर्ड टाकून नवीन पासवर्ड सेट करावा व पुन्हा नवीन पासवर्ड ने लॉगिन करावे.

पुढे अर्जामध्ये आवश्यक असलेला तपशील अचूक भरावा. ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाच्या तपशील वरील confirm बटन वर क्लिक करणे आवश्यक आहे.

अर्ज भरताना चुकला असल्यास Delete Application बटन क्लिक करून डिलीट करावा.

लॉटरी व्दारे निवड झाली असल्यास विदृयार्थी लॉगीन व्दारे Admit Card या पर्यायावर क्लिक करून Admit Card डाउनलोड करावा व त्याची प्रत घेउन मूळ कगदपत्र व झेरॉक्स प्रती घेउन ब्लॉक कमेटी कार्यालय येथे प्रवेश निश्चित करण्याकरीता दिलेल्या कालावधीत पालकांनी संपर्क साधवा.

जर पालकांना प्रवेशाबाबत काही तक्रारी असतील किंवा शाळा प्रतिसाद देत नसतील तर पालक आपल्या तक्रारी Grievance या पर्याया मार्फत online तक्रारी नोंदवू शकतात.

हेही वाचा – RTE 25% Admission Guidelines : आरटीई प्रवेशाबाबत प्राथमिक शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी असा करा ऑनलाईन अर्ज ! RTE 25% Online Admission 2024-2025

 • Ashutosh shinde

  आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे RTE चे पैसे 4 वर्ष झाले
  एक रुपया पण नाही मीळाले..!!! 7083919127

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.