कलाकार मानधन योजना – Kalakar Mandhan Yojana
कलाकारांसाठी मानधनाची महाराष्ट्र शासनाची योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्तमानपत्रातून जिल्हा निवड समितीमार्फत रितसर जाहिरात आणि बातमी प्रसिद्ध केली जाते, त्यानंतर संबंधित कलाकारांनी आपल्या जिल्ह्याच्या निवड समितीकडे अर्ज करावयाचे असतात’ अशी मानधन योजनेची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांतून तसेच काही वर्तमानपत्रांतून “५० वर्षावरील कलावंतांना मासिक मानधन सुवर्णसंधी” अशी बातमी प्रसारित होत आहे. या बातमीच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा खुलासा केला आहे.
कलाकार मानधन योजना – Kalakar Mandhan Yojana :
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकार यांना मासिक मानधन देण्याची योजना सन 1955 पासून राबविण्यात येत आहे. जिल्हा निवड समितीमार्फत सदर योजना राबवली जाते. सदर योजनेसाठी पात्र कलाकार व साहित्यिकांची निवड करण्यासाठी पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे या समितीचे सदस्य सचिव असतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई हे समितीचे सदस्य सचिव असतात तर मुंबई व मुंबई उपनगर साठी समितीची निवड सांस्कृतिक कार्य मंत्री करत असतात.
या जिल्हास्तरीय समितीमार्फत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून कमाल 100 पात्र कलाकार व साहित्यिकांची निवड केली जाते. पात्र कलावंतांना दरमहा श्रेणी निहाय तहहयात मानधन दिले जाते, त्यांच्या पश्चात त्यांच्या जोडीदाराला ते देण्यात येते.
ज्या कलावंताचे वय 50 वर्षे पूर्ण आहे, किमान 15 वर्षे ज्यांनी कलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ सेवा केली आहे व ज्यांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही असे साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवर यांच्यासाठी ही योजना आहे.
संबंधित जिल्हा निवड समिती यांच्यामार्फत दरवर्षी डिसेंबर महिन्या अखेरपर्यंत सदर योजनेसाठी अर्ज मागवण्यात येतात. तसेच अर्ज मागविण्याची मुदत आवश्यकतेनुसार शासन मान्यतेने वाढविण्यात येते, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
योजनेचा उद्देश :
महाराष्ट्र राज्यातील साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे.
मानधन :
अ.क्र. | कलावंतांची वर्गवारी | वर्गीकरण | संख्या |
| ||||
1) | राष्ट्रीय कलावंत | अ वर्ग | 448 |
| ||||
2) | राज्यस्तरीय कलावंत | ब वर्ग | 820 |
| ||||
3) | स्थानिक कलावंत | क वर्ग | 25882 |
| ||||
एकूण- | 27150 |
आवश्यक कागदपत्रे :
- साहित्य कलाक्षेत्रातील पुरावे (सन 2010 च्या आतील कलेचे पुरावे.उदा.कार्यक्रम पत्रिका,पुरस्कार चिन्ह,सत्काराचे फोटो इ.)
- उत्पन्नाचा दाखला
- वयाचा दाखला
- रेशनिंग कार्ड झेरॉक्स
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पति पत्नीचा फोटो जर पत्नी नसेल तर स्वःताचा फोटो
- शिफारस पत्र
- सरकारी लाभ मिळत नसल्याचे नोटिस 100/- रु.च्या स्टॅम्प पेपरवर लेखी.
कलाकार मानधन योजनेच्या पात्रतेचे निकष, अटी व शर्ती :
- रहिवाशी प्रमाणपत्र – अर्जदार किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे.
- वय – स्त्री/पुरुष – वृद्ध साहित्यीक व कलाकार यांचे वय ५० वर्षापेक्षा जास्त असावे.
- अपंगत्व/रोगाबाबत वयाची अट – जे साहित्यिक व कलावंत अधांगवायू, क्षय, कर्करोग, कुष्टरोग इ. रोगांनी आजारी असतील व ज्यांना ४०% शारिरिक व्यंग असेल किंवा अपघाताने ४०% अंपगत्व आले असेल व त्यामुळे ते स्वत: चा व्यवसाय करु शकत नसतील, असे साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात येईल.
- उत्पन्न – कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ४८,०००/- पेक्षा जास्त नसावे.
- कलाक्षेत्र – या योजनेअंतर्गत अमूक एका कलाप्रकाराचा समावेश होईल किंवा कसे, याबाबत अनेकवेळा जिल्हा स्तरावरुन शासनाकडे मार्गदर्शन मागण्यात येते. या अनुषंगाने याठिकाणी असे स्पष्टपणे नमूद करण्यात येते की, कला हे क्षेत्र अत्यंत व्यापक असून या योजनेच्या अंतर्गत पात्र कलाप्रकारांची सुचीबद्ध यादी तयार करुन ओंजळभर कलाप्रकारांसाठीच ही योजना बंदिस्त करणे चुकीचे असल्यामुळे याठिकाणी कलाप्रकारांची यादी बनवून मर्यादित कलाप्रकारांसाठीच मानधन योजना मर्यादित ठेवणे हे योग्य नसल्यामुळे याप्रकरणी कलाप्रकारांची यादी तयार न करता या योजनेअंतर्गत सर्व कला प्रकारांचा मानधन योजनेअंतर्गत अंतर्भाव करण्यात येत आहे.
- पात्रतेची अर्हता: – साहित्य क्षेत्रात किंवा कलेच्या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे तसेच कला आणि वाड्.मय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे असे वृद्ध साहित्यिक/ कलावंत थोडक्यात ज्यांनी साहित्य किंवा कलेसाठी आपले आयुष्य वेचले आहे व यावरच ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता असे मान्यवर.
- कार्याचे पुरावे : – साहित्यक/कलावंत असल्याबाबत तसेच या क्षेत्रात १५ ते २० वर्षे इतका प्रदीर्घ काळ कार्य केल्याबाबतचे परिशिष्ट -१ मधील अ.क्र. १६ मधील अ ते इ या पुराव्यांपैकी किमान दोन पुरावे सादर करावेत.
- हयातीचा दाखला : – प्रत्येक आर्थिक वर्षी मानधनाची रक्कम अदा करण्यापूर्वी संबंधित मान्यवर हयात असल्याबद्दलचा दाखला त्यांच्याकडून उपलब्ध करुन घेणे आवश्यक आहे.
- इतर शासकीय योजनांचा लाभ : – शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेणारी व्यक्ती या मानधन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
- वृद्ध साहित्यिक/कलावंत यांनी जिल्हास्तरावर समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अथवा तालुका स्तवरावर गट विकास अधिकारी यांच्याकडे या योजनेंर्गंत मानधन मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- प्राप्त अर्जांची जिल्हा परिषदेमार्फत खालील निकषांच्या आधारे छाननी करण्यात येईल.
- छाननीअंती योजनेच्या निकषानुसार पात्र ठरणारे अर्ज जिल्हास्तरीय निवड समितीच्या मान्यतेस्तव सादर करण्यात येतील.
कलाकार मानधन योजना अर्ज नमुना PDF फाईल :
कलाकार मानधन योजना अर्ज नमुना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्ज करण्याची पद्धत :
गट विकास अधिकारी / समाज कल्याण अधिकारी / अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती समाज कल्याण खाते या विभागात वृद्ध कलाकार मानधन योजनेचा अर्ज व कागद पत्रांची पूर्तता करून पोच घ्यावी.
हेही वाचा – प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना – Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!