निराधार असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर
विविध शासकीय योजनांसाठी निराधार असल्याचा दाखला खूप महत्वाचा आहे. आपण या लेखामध्ये निराधार असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
निराधार असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:
निराधार असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची”
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.
त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) कशी करायची? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.
आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.
त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.
हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील “निराधार असल्याचा दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर “महाऑनलाईन” हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “निराधार असल्याचा दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
निराधार असल्याचा दाखला – अर्जदाराची माहिती :
इथे अर्जदाराची माहिती हे पेज ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराने स्वतःची पूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, अर्जदाराचे पूर्ण नाव (इंग्रजी), आधार क्रमांक, आणि वय हि सर्व माहिती टाकायची आहे, व “समावेश करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
समावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मॅसेज येईल “तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला” आहे व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो जतन करून ठेवायचा आहे. नंतर “ओके” या पर्यायावर क्लिक करा.
पुढे अर्जदाराचा फोटो आणि कुटुंब प्रमुखाचा मृत्य दाखला अपलोड करायचा आहे.
पुढे शुल्क भरा हा पर्याय येईल, ते शुल्क तुम्ही Wallet ,Net Banking, Credit /Debit Card ,IMPS ,UPI या माध्यमातून भरू शकता.
शुल्क भरल्यानंतर तुम्हाला २० दिवसातच निराधार असल्याचा दाखला आपले सरकार या वेबसाइट वर मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.
हेही वाचा – विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज (Special Assistance scheme)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!